श्री स्वामींनी तिघास तीन श्लोक सांगितले हरिभाऊंनी चांदीच्या पादुका महाराजांपुढे ठेवल्या महाराजांनी त्या लगेच पायात घातल्या सतत चौदा दिवस महाराजांनी त्या पादुका आपल्याजवळ ठेवल्या होत्या चौदाही दिवस ते नित्य मोठ्या प्रेमाने त्या पादुका पायात घालीत या चांदीच्या पादुका आपणास मिळाव्या म्हणून सेवेकरी लोकांनी बहुत खटपट केली परंतु महाराजांनी त्या कुणासही दिल्या नाहीत समर्थ म्हणत की हे माझे आत्मलिंग आहे मी ते कोणासही देणार नाही पुढे चौदावे दिवशी हरिभाऊ दर्शनास गेले असता त्यास आपणाजवळ ओढून घेऊन महाराज म्हणाले तू माझा सूत आहेस तू आपला धंदा रोजगार सोडून बेदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर नंतर त्या पादुका महाराजांनी आपल्या हातास पायास तोंडास वगैरे सर्व अवयवास लावून हरिभाऊस हात जोडून उभे राहण्यास सांगितले व पादुका मस्तकावर घेण्यास सांगितले मग काय विचारावे हरिभाऊचा आनंद त्रिभुवनात मावेना ते श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करीत आनंदाने नाचू लागले बर्याच वेळाने हरिभाऊ त्यांच्या बिर्हाडी गेले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

हा लीला भाग हरिभाऊ तावडेंशी संबंधित आहे अतिशय भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांसाठी हरिभाऊंनी पादुका तयार करुन घेतल्या मोठ्या आत्मियतेने त्यावर वेलबुट्टीसारखे आकर्षक नक्षीकाम करवून घेतले त्यांचे आत्मचित्त आता श्री स्वामी दर्शनाकडे मार्गदर्शन आणि अनुग्रहासाठी लागले होते त्या सम्मोहित स्थितीतच त्यांनी त्या पादुका श्री स्वामी समर्थांपुढे ठेवल्या हरिभाऊंच्या मनातला भक्तिभाव श्री स्वामींच्या लक्षात आलेला होता त्यांनी त्या पादुका लगेचच पायात घातल्या हरिभाऊंचे समाधान व्हावे म्हणून तोंड देखल्याप्रमाणे त्या घातल्या नाहीत तर अखंड चौदा दिवस त्यांनी त्या पादुका पायात घालून ते वावरले हरिभाऊस हे भाग्य का मिळाले याचा मथितार्थ काय श्री स्वामी चरणी हरिभाऊंची निष्काम निर्मोही दृढ भक्ती हेच या प्रश्नाचे उत्तर श्री स्वामींच्या पायातील या पादुका प्रसाद म्हणून पूजेसाठी मिळाव्यात यासाठी अनेक सेवेकर्यांनी प्रयत्न करुनही महाराजांनी त्या त्यांना दिल्या नाहीत महाराज पादुका मागणार्यास ऐकवत या पादुका म्हणजे माझे आत्मलिंग आहे मी ते कुणासही देणार नाही चौदाव्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी दर्शनास आलेल्या हरिभाऊस जवळ ओढून घेत त्या पादुका दिल्या त्या देताना त्यांना पुत्र म्हणून मानले कामधंदा रोजगार सोडण्यास सांगितले नंतर मुंबईस जाऊन मठ स्थापन करावयास सांगून ध्वजा उभारण्यास सांगितले किती हे हरिभाऊवर श्री स्वामींचे प्रेम पिता पुत्राचेच नाते हा लीलाभाग बारकाईने वाचल्यास त्यातील मथितार्थ उलगडू लागतो श्री स्वामींनी चौदाही दिवस त्या पादुका पायात घातल्या मागणार्यासही त्यांनी ते त्यांचे आत्मलिंग आहे म्हणून सांगितले त्यांना त्या पादुका हरिभाऊसच द्यायच्या होत्या त्यांच्या दृष्टीने हरिभाऊची आध्यात्मिक पात्रता आता पूर्ण झाली असावी इतरांची ती पूर्ण झाली नसावी एकट्या दुकट्याच्या देवघरात त्या आत्मलिंग पादुका पूजेत राहण्यापेक्षा त्या अधिकाधिक लोकांसाठी असाव्यात असा त्यांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय दृष्टिकोन होता स्वतःच्या सर्व अवयवास त्या पादुकांचा स्पर्श करुन हरिभाऊच्या शिरावर मस्तकावर ठेवल्या याचा संक्षिप्त स्वरुपात मथितार्थ असा की श्री स्वामींच्या स्पर्शाने त्या पादुका अभिमंत्रित झाल्या होत्या त्या पादुकांचा उल्लेखही त्यांनी त्यांचे स्वतःचे आत्मलिंग म्हणून केला आहे अशा त्या पावन पादुका हरिभाऊंच्या शिरावर मस्तक डोके यावर ठेवून श्री स्वामींनी स्वतःतील सामर्थ्यांचा काही अंश लोक कल्याणासाठी हरिभाऊस संक्रामित केला त्याच हरिभाऊंनी पुढे स्वामीसुत या नावाने श्री स्वामींना अपेक्षित असलेले कार्य मुंबईत मठ (किल्ला) उभारुन चालू ठेवले.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या