एके दिवशी बाळाप्पास श्री स्वामी म्हणाले जप करतो परंतु हिशोब असू दे बरे तेव्हा राणीसाहेबास सुंदराबाईने सांगितले की बाळाप्पा महाराजांजवळ येऊन दंगा करतो तेव्हा राणीसाहेबां कडून गंगूलाल जमादार येऊन त्याने बाळाप्पास दर्शनास येऊ नये अशी ताकीद दिली ते ऐकून बाळाप्पास अतिदुःख झाले त्याला असे वाटले की बायको पोरे सोडून सदगुरु सेवेकरता येथे आलो पण येथे सेवा तर नाहीच परंतु दर्शनही नाही असे आपले काय प्राक्तन आहे कोण जाणे असे म्हणून बाळाप्पा दूर उभे राहून श्री समर्थांची मोठ्याने रडत रडत प्रार्थना करीत आहे तोच महाराज पुढे छातीवर हात ठेवून म्हणाले अगं तुझी खबर घेतो बरे असे त्रिवार म्हणाले थोड्याच दिवसात बाईच्या पायास इजा होऊन ति अगदी पराधीन झाली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

सर्वसाक्षी श्री स्वामी बाळाप्पा आणि सुंदराबाईचे वर्तन कसे होते हे जाणून होते तिच्या पूर्व पुण्याईच्या बळावर हे सर्व चालले होते हे श्री स्वामी जाणतही होते आणि तटस्थ वृत्तीने बघतही होते माया मोह अनिवार इच्छा आकांक्षेत बुडालेल्या सुंदराबाईस सांगूनही काही उपयोग नव्हता कारण तिच्या देहबुद्धीत हे सर्व दुर्गुण पक्के भिनले होते श्री स्वामी समर्थ रुपाने प्रत्यक्ष परमेश्वर सान्निध्य सेवा करण्याची संधी लाभूनही त्या दुर्गुणांचा हळू हळू का होईना निचरा करण्याचा प्रयत्न ती करीत नव्हती तिचे दुर्भाग्य दुसरे काय पण बाळाप्पाच्या बाबतीत श्री स्वामींनी काढलेले उदगार जप करतो परंतु हिशोब असू दे बरं यातून श्री स्वामींचे बाळाप्पाच्या उपासनेवर बारीक लक्ष असल्याचे दिसते येथे सदगुरु रुपी विवेक हा सतप्रवृत्त विरक्त बाळाप्पाच्या साधनेस पुष्टीच देत होता आपण सुद्धा येथे कोणाची प्रतिमा स्वीकारायची आणि आचरणात आणावयाची हे ठरवावयाचे आहे सुंदराबाई बाळाप्पा विषयी राणीसाहेबांकडे खोटा कांगावा करते कोणताही सारासार विचार न करता खरे काय आणि खोटे काय याची शहानिशा न करता मायावी सुंदराबाईच्या प्रभावाखाली येऊन राणीसाहेब गंगूलाल जमादाराकरवी बाळाप्पास श्री स्वामींच्या दर्शनास येऊ नये अशी ताकीद देतात येथेही वरिष्ठांनी न्यायनिवाडा कसा करावा हा प्रश्न आहे परंतु दुष्ट प्रवृत्तीने येथे सतप्रवृत्ती विरक्तीवर मात केलेली दिसते म्हणून अनेकदा आपणही सहजच म्हणतो खर्याची दुनिया नाही पण हे सदासर्वदा यशस्वी होऊ शकत नाही विरक्ती सतप्रवृत्ती क्षणिक पराभूत होऊ शकते परंतु कायमची कधीच पराजित होत नाही अंतिमतः सत्याचा सतप्रवृत्तीचा विरक्तीचाच विजय होतो हे सर्वमान्य सत्य येथे बाळाप्पाच्या रुपाने अधोरेखित होते ह्रदय सिंहासनावर स्थापित केलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास प्रतिबंध केल्याचे बाळाप्पास फार दुःख होते त्याचे हे उन्मयी दुःख बायको पोरे सोडून सदगुरु सेवेकरता येथे आलो पण येथे सेवा तर नाहीच परंतु दर्शनही नाही असे आपले काय प्राक्तन आहे कोण जाणे याउदगारातून स्पष्टच दिसते बाळाप्पाचे आर्त रडणे कळवळा श्री स्वामींना समजल्या शिवाय कसा राहील निष्ठावान भक्ताच्या पियाला काटा जरी टोचला तरी सदगुरुच्या डोळ्यात टचकन पाणी येते असे भक्तिमार्गात मानतात त्यामुळेच तर महाराज छातीवर हात ठेवून सुंदराबाईच्या अंतर्यामी देहबुद्धीला आवर घालण्यासाठीच त्रिवार म्हणाले अग तुझी खबर घेतो बरे म्हणजे राणीसाहेबास तुझे बाळाप्पा विषयीचे लबाडीचे सांगणे आमच्या लक्षात आले बरे पण तिला हे कळले नाही थोड्याच दिवसात श्री स्वामींच्या ब्रह्यवाक्याची प्रचिती सुंदराबाईस आली तिच्या पायास इजा होऊन ती परावलंबी झाली यावरुन सत्य पलभर के लिए पराजित हो सकता है लेकिन हमेशाके लिए नही अखेरीस सत्याचाच विजय झाला सुंदराबाईच्या हकालपट्टीची चिन्हे सर्वांनाच दिसू लागली बाळाप्पास श्री स्वामींचा उत्तराधिकारी म्हणून सन्मान मिळाला कुप्रवृत्तीचा विजय क्षणिक असतो सतप्रवृत्तीचा विरक्तीचा विजय कायम असतो हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या