मोगलाईतील मोरगावचे नागूआण्णा कुलकर्णी म्हणून वकिलीचा व्यवसाय करीत असत चाळीसावे वर्षी त्यांचे डोळे गेले पुष्कळ औषधोपचार केले आणि पुष्कळ पैसेही खर्च केले पण गुण आला नाही दैवी सेवेशिवाय डोळे (दृष्टी) येणार नाही म्हणून एका बारा वर्षांच्या मुलीस आणि एका मनुष्यास घेऊन ते तुळजापुरास देवीच्या सेवेसाठी आले त्यांनी पुजार्यास व इतर लोकांस देवीच्या सेवेबाबत विचारले तेव्हा सर्वानुमते देवळाच्या अंतर्गाभ्यात देवीस प्रदक्षिणा रुप अनुष्ठान करावे असे ठरले त्याप्रमाणे त्यांनी मुलीचा हात धरून दोन प्रहरापर्यंत प्रदक्षिणा घालून तिसऱ्या प्रहरी भोजन करण्याचा नियम चालू ठेवला त्यांच्या या उपासनेस जवळपास सहा महिने होत आले तरीही देवीचा दृष्टांत वगैरे त्यांना झाला नाही त्यामुळे ते काळजीत पडून आता काय करावे असा विचार करु लागले परंतु थोड्याच दिवसात त्यांना स्वप्न दृष्टांतात शुभ्र पातळ नेसलेली एक पोक्त वयाची बाई अंगात जरीची चोळी गळ्यात मोत्याचा हार व कपाळास भव्य कुंकू लावलेली येऊन म्हणाली आता येथे राहू नकोस अक्कलकोटास जा असे सांगून निघून गेली तिला काही विचारणार तोच नागूआण्णा जागृत झाले त्यांनी हा स्वप्नदृष्टांत पुजार्यास सांगितल्यावर त्याने सांगितले की तुम्हास (देवीची) आज्ञा झाली अक्कलकोटास जावे आज्ञा झाली खरी परंतु तेथे जाऊन काय करावे वगैरे देवीने स्पष्ट काही सांगितले नाही सहा महिने पूर्ण होण्यास थोडा अवधी आहे तर आरंभिलेले अनुष्ठान पुरे करुनच जाऊ असा विचार करुन त्यांनी अनुष्ठान सुरुच ठेवले सहा महिने भरताच नागूआण्णास पुन्हा स्वप्नदृष्टांत तीच बाई परंतु यावेळी तिच्या हातात एक पितळी त्यात थोडा भात एक कानोला असे अन्न एका बाजूस चोळीचा खण व कुंकवाची पुडी अशा जिनसा घेऊन अरे नागोबा ऊठ ऊठ हा प्रसाद घे असे म्हणून पितळी त्याच्या हातात दिली आणि अक्कलकोटास स्वामी महाराजांकडे जा उगीच संशयात पडू नकोस असे सांगून बाई अदृष्य झाली त्यांनी हा स्वप्नदृष्टांत पुजार्यास सांगताच तो म्हणाला तुम्हास आता स्पष्ट आज्ञा झाली आहे आता तुम्ही येथे राहू नये.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
ह्या लीलाभागात वर्णन केलेला नागूआण्णा कुलकर्णी हा तुमच्या आमच्यासारखाच एक प्रापंचिक जीव आहे त्यामुळे त्यास प्रपंचातील सर्व आधी व्याधी कमी अधिक प्रमाणात असणारच तशा त्यासही होत्या प्रपंच सुख दुःखात व्यस्त असलेल्या जीवास परमेश्वराचा आठव हा त्याचे दुःख नाहीसे व्हावे आणि सुख मिळावे म्हणूनच अन्यथा देवाकडे लक्ष देण्यास त्यास वेळ कुठे असतो प्रपंच करण्यातच मोह ममता मायाने तो आंधळा झालेला असतो हा आंधळेपणा बहुतेकांना खरी खुरी सेवा उपासना सुचू देत नाही दिसू देत नाही हा अंधपणाचा रोग कठीण आणि हानिकारक असतो अशा या मथितार्थाने नागूआण्णास याच रोगाने त्रस्त केले होते सर्वच उपाय संपल्यावर त्यांच्या प्रारब्ध कृपेने देवीची उपासना करण्याची त्याला उपरती झाली त्यानुसार तो तुळजापुरात देवीची उपासना करीत असतानाच सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी त्याला स्वप्न दृष्टांतात आदेश झाला आता (तुळजापुरात) राहू नकोस अक्कलकोटास जा त्याच्यात आज्ञाधारकपणा नव्हता देवीच्या या आदेशाबाबतही देवीने स्पष्ट काही सांगितले नाही तेथे जाऊन काय करावे याचे सुस्पष्ट मार्गदर्शन नाही या विचाराने तो सहा महिने कालावधी पूर्ण होईपर्यंत उपासना करीत राहिला तेव्हा मात्र देवीने त्यास सुस्पष्ट शब्दात बजावले अक्कलकोटास स्वामी महाराजांकडे जा उगीच संशयात पडू नकोस आता मात्र त्याच्या मनातला संशय मिटला आपणास स्वार्थाचे सुखाचे स्वहिताचेच दिसते अन्य काही स्वहित नसलेले नुकसानीचे दिसत नसते पण परमेश्वरास सारे काही दिसते याचे भान मात्र आपण सर्वांनीच ठेवावयास हवे तेच नेमके विविध प्रकारच्या अविवेकी उन्मादात आपणास राहत नाही हेच मोठे अंधत्व आहे त्यावर आपणास काही उपाय शोधता येतील का हा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या मगदुरा प्रमाणे शोधायचा आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या