एक कुष्ठग्रस्त कुष्ठ निवारण व्हावे म्हणून बरेच दिवस गाणगापूरात सेवा करीत होता त्याला अक्कलकोटला जाण्याचा दृष्टांत झाला त्याप्रमाणे त्याने अक्कलकोटात येऊन बरेच दिवस श्री स्वामींची सेवा केली कुष्ठाने त्रस्त झाल्याने श्री स्वामींची कळवळून प्रार्थना केली महाराज माझ्याच्याने या कुष्ठाच्या वेदना सहन होत नाहीत जर मला मृत्यू आला तरच या वेदनांतून मी मुक्त होईन श्री स्वामींस त्याची दया येऊन ते म्हणाले विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञा प्रमाण असे म्हणून श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून तो उठला त्याने विचार केला की विष्ठा अंगास लावायची तर इतर दुसऱ्याची कशाला श्री स्वामी समर्थांच्याच विष्ठेचा कुष्ठावर का लेप देऊ नये त्यानुसार त्याने श्री स्वामींच्या विष्ठेचा सर्वांगास लेप केला काही वेळाने अंग धुवून टाकले असे चार दिवस त्याने केले कुष्ठरोगाच्या जखमा बर्या होऊन त्याचे शरीर पूर्ववत झाले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीलेतील कुष्ठरोगी ब्राम्हणास सुद्धा गाणगापूरला दत्तप्रभूंची सेवा करीत असता अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचा दृष्टांत झाला यावरुन इ.स.१८५७ ते १८७८ च्या दरम्यान दत्तप्रभू सदेह स्वरुपात श्री स्वामी समर्थ रुपाने अक्कलकोटात वावरत होते त्या कुष्ठपीडिताने येथे येऊन श्री स्वामी समर्थांची सेवा केली त्यांना त्याच्या पीडेबाबत प्रार्थना करताच श्री स्वामींनी त्यावर आगळे वेगळे औषध सांगितले कोणते विष्ठेचा लेप देण्याचे त्यांनी हे औषध का सांगितले याचा मथितार्थ शोधला पाहिजे विष्ठा म्हटल्यावर तो हा किळसवाणा घाणेरडा उपाय करतो की नाही हे श्री स्वामींना पाहायचे होते त्याची निष्ठा किती पक्की आहे हेही त्यांना तपासावयाचे होते परंतु त्याची श्री स्वामींवरील निष्ठा इतकी पक्की होती की इतरांची विष्ठा लावण्याऐवजी श्री स्वामींच्याच विष्ठेचा लेप देण्याचे ठरविले त्याप्रमाणे त्याने श्री स्वामींच्याच विष्ठेचा चार दिवस लेप दिला त्याचा कुष्ठरोग बरा झाला श्रद्धा आणि निष्ठा यात फरक असतो श्रद्धा भावनाशील असते तर निष्ठा कृतिशील असते श्रद्धेचा संबंध भावनेशी असतो भावना प्रसंगानुसार आणि व्यक्तिपरत्वे विचलित होते डळमळते अथवा तिचा आवेग कमी जास्त होऊ शकतो परंतु निष्ठेबाबत असे होत नाही ती जर पक्की असेल तर कोणत्याही प्रसंगात ती डळमळत नाही विष्ठा घेऊन अंगास लाव हा आगळा वेगळा उपचार सांगण्या मागे श्री स्वामींना त्या कुष्ठरोग्याची त्यांच्या आदेशावरची निष्ठाच पाहवयाची होती पण त्याची ही निष्ठा इतकी पक्की होती की लोक काय म्हणतील याची त्याने यत्किंचितही पर्वा केली नाही तसा विचारसुद्धा मनात येऊ दिला नाही शिवाय विष्ठाच लावण्याचा उपाय श्री स्वामींनी सांगितला आहे तर इतरांची विष्ठा कशाला श्री स्वामींचीच विष्ठा लावण्याचे त्याने ठरविले त्यातच दैवी औषधी गुण आहेत असे त्याने मनोमन जाणले त्याचा कुष्ठरोग बरा होऊन त्याची कांती पूर्ववत सतेज आणि तेजस्वी झाली एकाच देवावर अथवा सदगुरुवर निष्ठा पराकोटीची असावी (अर्थात ते सदगुरुही तेवढेच उच्च पराकोटीचे असावेत) तशी ती असेल तर कितीही परीक्षा अथवा कसोट्या पाहिल्या तर निष्ठावान साधक त्यात उत्तीर्ण होतोच हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या