दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार गोविंदस्वामी आणि इतर मंडळी श्री स्वामींच्या दर्शनास आली तेव्हा त्यांनी दादूमियाँ नावाच्या मुसलमानास इधर आव चपाती और बेसन लाव अशी आज्ञा केल्यावर त्याने चपाती आणि बेसन आणून ठेवले तेव्हा श्री स्वामी समर्थ मोठ्याने बोलले आव जी अभेद परमहंस भिक्षा लेव खाव हे ऐकून गोविंदस्वामी चकित झाले पश्चात्तापपूर्वक प्रार्थना करु लागले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हा अर्थ महाराज आपणास शोभतो आपण साक्षात परब्रह्यमूर्ती निःसंशय आहात ही माझ्या मनाची खात्री झाली परोपदेशे पांडित्यम् या म्हणीप्रमाणे आम्ही लोकांस फार उपदेश करतो तसे आचरण मात्र करीत नाही तुकोबाची एक उक्ती आहे "तुका म्हणे करु उपदेश लोकां!नाही झालो एकादोषापरता!!म्हणून आमचे भाषणाचे तेज लोकात पडत नाही आम्हा कोणालाही आपली बरोबरी स्वप्नातदेखील करता येणार नाही तदनंतर समर्थ म्हणाले "आपण एकच आहोत"हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामीस व सर्वत्रास आनंद झाला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीला कथा भागात श्री स्वामी समर्थांना गोविंद स्वामींस प्रबोधित करावयाचे होते एका संन्याशाने दुसऱ्या संन्याशाला भोजन भिक्षेचे निमंत्रण देणे हे अनुचित आहे हे श्री स्वामींनी सुचविले होते तरीही त्यांनी जाणून बुजून गोविंदस्वामींच्या भोजन भिक्षेच्या निमंत्रणाचा स्वीकार केला दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार गोविंद स्वामी आणि इतर मंडळी श्री स्वामी समर्थांकडे येताच त्यांनी दादूमियाँ या मुसलमानाकडून चपाती आणि बेसन मागून घेतले आणि ते गोविंद स्वामींपुढे ठेवले आणि मोठ्याने बोलले आव जी अभेद परमहंस भिक्षा लेव खाव संन्याशाला कशाचाच भेद नसतो हे आदले दिवशीच गोविंद स्वामी म्हणाले होते त्यावरच नेमके बोट ठेवून त्यांनी एका मुसलमानाकरवी ही कृती केली होती त्याक्षणी गोविंदस्वामींना श्री स्वामी समर्थांच्या या कृतीचा आणि उदगाराचा उलगडा झाला श्री स्वामी समर्थांसारखी आपली वृत्ती निर्लेप निरिच्छ निरलस अद्यापही झालेली नाही याची जाणीव गोविंदस्वामीस झाली त्यांनी या लीला भागात पश्चात्तापपूर्वक जे मनोगत व्यक्त केले आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपली बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही हे खरोखरच प्रत्येकासाठीच चिंतनीय मननीय आणि आचरणीय आहे वरील मूळ लीलेतील भाग आपणा सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे शब्द वाचाळवीर खूप असतात पण तशी कृत्ये करणारे श्री स्वामी समर्थांसारखे मोजकेच लालित्यपूर्ण रसाळ भाषणाने दिपवून टाकणारे अनेक असतात पण त्यांचा प्रभाव श्रोत्यावर पडतोच असे नाही आणि पडलाच तर तो श्रोत्यांवर टिकून राहात नाही लोका सांगे ब्रह्यज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाणच फार असतात परंतु श्री स्वामींचा आचार विचार हा बोले तैसा चाले असाच कायम असल्याचे गोविंद स्वामीस जाणवले तसे प्रांजळपणे त्यांनी बोलूनही दाखवले गोविंद स्वामींना योग्य बोध मिळाल्याचे श्री स्वामींच्या लक्षात आल्यानंतर मोठ्या मनाने आणि उदार अंतःकरणाने ते गोविंदस्वामीस म्हणाले आपण एकच आहोत श्री स्वामींच्या या कृतीतून आपण काय बोध घेणार उदार अंतःकरण सर्वांप्रती ममत्वाची भावना एखाद्याला एखादी गोष्ट तत्त्व बोध कृतीतून सहजगत्या समजून देणे असे बरेच काही असे करुन सुद्धा कोणताही अहंभाव नाही कर्तेपणाचा तोरा नाही.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या