श्री स्वामी समर्थांचा मनातल्या मनात धावा करीत असता बुवांना असा भास झाला की हात धरून कोणी तरी चिखलातून त्यांना बाहेर काढले दोन तासांनी बुवा सावध झाले तेवढयात घोडेस्वार घोड्यासह चिखला बाहेर आला घोडा व कपडे धुवून ते सायंकाळपर्यंत गाणगापुरात पोहोचले या प्रवासाने दोन दिवस बुवांचे हात पाय दुखत होते नंतर त्यांनी सात दिवसात सात श्री गुरुचरित्राची पारायणे केली देवपूजा ब्राह्यण भोजन वगैरे करुन दुसरे दिवशी भीमा अमरजाचे संगमावर स्नानास गेले स्नान करीत असताना त्यांचा पाय घसरुन ते भालाभर पाण्यात गेले त्यांना पोहता येत नसल्यामुळे बर्याच गटांगळ्या खाऊन पाणीही प्याले संगमावरील दोन चार सेवेकर्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले त्यांना सावध होण्यास दोन प्रहर लागले आणि त्यांना संगमावरच मुक्काम करावा लागला नंतर अक्कलकोटास येऊन श्री स्वामींना साष्टांग नमस्कार करुन बुवा उभे राहताच चिखलात पाण्यात बुडून जिवंत आलात का हे स्वामींचे उदगार ऐकून बुवांनी महाराजांची प्रार्थना करुन कबुल केले की महाराजांच्याच कृपेने आलो त्या दिवसापासून अक्कलकोट सोडून कोणत्याही तीर्थक्षेत्रास जावयाचे नाही असा वामनबुवांनी निश्चय केला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वैद्य (वाम्बोरीकर) यांच्याबद्दल या अगोदर पुष्कळ माहिती आलेली आहे श्री स्वामी समर्थांच्या वचनाचा त्यांना चिखलात रुतणे त्यातून कुणीतरी हात धरून वर काढत आहे या रुपाने चांगलाच प्रत्यय आला श्री स्वामी समर्थांचा धावा करीतच ते गाणगापूरला पोहोचले तेथेही त्यांना अमरजाच्या संगमावर पाण्यात पडून बुडत असल्याचा आणि दोन चार सेवकांनी वाचविल्याचा अनुभव आला या अनुभवातून बुवांची पक्की खात्री झाली की श्री सदगुरु श्री स्वामी समर्थ हेच सर्व तीर्थक्षेत्रांचे तीर्थक्षेत्र आहे त्यांचेपुढे अन्य सारी तीर्थक्षेत्रे निरर्थक आहेत श्री स्वामी विना अन्य दैवत नाही या भावनेने ते लगोलग गाणगापुराहून अक्कलकोटी आले श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घालून उभे राहताच अंतर्ज्ञानी श्री स्वामींनी बुवास ऐकविले चिखलात पाण्यात बुडून जिवंत आलात का बुवांनी ओशाळल्यागत होकारार्थी मान डोलाविली श्री स्वामींच्याच कृपाशीर्वादाने आपण किती वेळा बचावलो याची त्यांनी मनोमन कबुली दिली आता अक्कलकोट सोडून अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री व अन्य देवदेवता शोधीत फिरायचे नाही असा त्यांनी निश्चय केला आणि खरोखर त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ सोडून अन्य कोणत्याही दैवताचा त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार केला नाही त्यांच्या या अपार गुरू निष्ठेतूनच श्री गुरुलीलामृतसारखा अजरामर ग्रंथ त्यांच्या लेखणीतून उतरला आणि ते अजरामर झाले.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या