एकदा जयाजीराव शिंदे अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात होते जयाजीराव शिंदे यांच्याबरोबर प्रख्यात गोविंबुवा नाशिककर स्वामी हे ही होते शिंदेसरकारचे शुद्ध अंतःकरण ओळखून महाराज प्रातःकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वडाच्या झाडाखाली बसले हे शिंदे यांना कळताच राजभोग टाकून एकटेच पायी घाई घाईने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले श्री स्वामींपुढे श्री फलादी प्रसाद ठेवून दर्शन घेतले जयाजीराव शिंदे यांच्या मनात ज्या काही शंका होत्या त्याची सर्व यथासांग उत्तरे महाराजांनी दिली आणि त्यांना काही खुणाही दाखविल्या आजपर्यंत बहुत साधू पाहिले व ऐकले परंतु असे तेज किंवा भाषण आणि प्रश्नांची मार्मिक उत्तरे देणारा भेटला नाही तस्मात् हे अवतारी आहेत यात संशय नाही अशी जयाजीराव शिंदे यांच्या मनाची खात्री झाली आणि आपण आल्याचे सार्थक झाले महाराजांचे दयाळुत्व अंतःसाक्षित्व निःस्पृहत्व वगैरे पाहून आति समाधान पावले आणि म्हणाले या अपूर्व दर्शनाने मी खरोखर पुनीत झालो वाहवा वाहवा अशी मूर्ती महदभाग्यानेच पाहिली धन्य माझे नेत्र असे म्हणून एक घटका ते स्तब्ध उभे राहिले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीला भागात श्री स्वामी समर्थांची थोरवी आणि जयाजीराव शिंदे यांचे गुणवर्णन आलेले आहे जयाजी शिंदे यांच्यासारखा एक संस्थानिकसुद्धा श्री स्वामींपुढे कसा वागतो बोलतो त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी काय भावना आहेत श्री स्वामींचा जयाजीराव शिंदे सरकारवर कसा प्रभाव पडला याची कल्पना येते जयाजीराव शिंदे हे धर्मनिष्ठ नीतिमान दयाळू उदार आणि भाविक होते त्यामुळे ते स्वतः संत-महात्मे अवतारी पुरुषांचे दर्शन स्वतः जाऊन घेत त्यांना राजसत्ता लक्ष्मीचा गर्व नव्हता ते जेव्हा अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास आले तेव्हा श्री स्वामी महाराज अक्कलकोटच्या राजवाड्यात होते जयाजीराव शिंदे हे सुद्धा संस्थानिक राजे असल्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांना श्री स्वामींचे दर्शन अगदी सहज राजवाड्यात जाऊन घडले असते घेता आले असते परंतु जयाजीराव शिंद्यांचे वर्तन सर्वसामान्य रयतेसारखेच होते श्री स्वामींसमोर त्यांनी आपल्या राजेपणाचा तोरा मिरवला नाही हेच श्री स्वामींना विशेष भावले जयाजीराव शिंदे यांची वृत्ती जाणूनच श्री स्वामी राजवाड्याबाहेर येऊन वडाखाली बसले हे शिंदे यांना कळताच त्यांनी आपला मान सन्मान बाजूला ठेवून सरंजामशाही लवाजमा बरोबर न घेता एकटेच पायी पायी श्री स्वामींच्या दर्शनास एखाद्या सर्वसामान्य माणसासारखे आले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने ते दिपून गेले त्यांच्या अंतःसाक्षित्वाने व अवतारीपणाने शिंदे प्रभावित झाले येथे श्री स्वामींनी कोणतीही लीला केली नाही परंतु श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व श्री जयाजीराव शिंद्यास जसे भावले ते वर्णन आणि शिंदे यांचा आचार विचार निश्चितच मननीय व आचरणीय आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या