अहमदनगरच्या नानाजी रेखींनी श्री स्वामी समर्थांची पत्रिका स्वामीसुताच्या आदेशावरुन तयार केली स्वामीसुतांनी ती पत्रिका पाहून संतोष व्यक्त केला अक्कलकोटास जाऊन ती पत्रिका महाराजांपुढे सादर करण्याचा नाना रेखींना आदेश दिला त्यानुसार नाना रेखींनी ती पत्रिका महाराजांपुढे बंद लखोट्यातून ठेवली त्यावेळी महाराज दर्ग्यात होते महाराजांनी नाना रेखीस क्या देखता है नौबत बजाव असे सांगून त्यांच्या हातावर टाळी दिली टाळी देताच नानाजींच्या हातावर आत्मलिंग उमटले ते त्यांच्या अंतकाळापर्यंत कायम होते नानाजींनी महाराजांच्या आज्ञेनुसार दर्ग्यातील नौबत वाजविली.

(टीपः गोपाळबुवा केळकर लिखित श्री स्वामी समर्थांच्या बखरीत जी माहिती प्रसिद्ध झाली आहे त्यापेक्षा वेगळी माहिती कै.गं.बा.मुळेकर लिखित चरित्रात व पुणे वैभव साप्ताहिकाच्या भाद्र.व.१४ शके १८१५ च्या अंकात आहे ही लीला स्वतः नाना रेखींनी मुंबईस जाऊन जशी श्री स्वामीसुतांना निवेदन केली तशीच ती श्री मुळेकरांनाही लिहून कळवली होती.)


अर्थ भावार्थ मथितार्थ 

नाना रेखी मुंबईस काही कामानिमित्त इ.स.१८६९ मध्ये आले होते स्वामी सुतांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यास ते कामाठीपुर्यात गेले दोघांचाही एकमेकांशी पूर्वपरिचय नव्हता तरीही प्रथम भेटीतच स्वामीसुतांनी नगरचे नाना जोशी तुम्हीच काय असे त्यांना विचारले त्यामुळे नाना चकित झाले तेव्हा स्वामी सुतांनी नानास तुम्ही आजपासून समर्थांचे जोशी (ज्योतिषी) झालात तुमचे पागोटे जाऊन समर्थांची झोळी तुम्हास मिळेल व नगरात मोठा मठ होईल असा आशीर्वाद दिला स्वामीसुतांच्या आदेशावरुन नानांनी श्री स्वामी समर्थांची पत्रिका तयार केली त्यासाठी तिथी महिना शके वार व वेळ इत्यादी आवश्यक ती माहिती नानांनी स्वामीसुतांनी लिहिलेल्या अवतार काण्डातून घेतली (समर्थांचा अवतार शके १०७१ चैत्र शु.द्वितीया रोज गुरुवार अश्विनी नक्षत्र प्रितियोग प्रातःकाळी दोन घटका दिवसास मेषलग्नी हस्तिनापुराहून बारा कोसावर छेलीखेडे ग्रामी वडाचे झाडाखाली गणपतीमूर्ती सन्निध झाला) नानांनी गणित मांडून श्री स्वामी समर्थांची पत्रिका तयार केली ती पत्रिका पाहून स्वामीसुतांनी समाधान व्यक्त केले हीच पत्रिका अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी महाराजांपुढे सादर करण्याचा आदेश दिला त्यानुसार नानाजींनी अक्कलकोटास येऊन श्री स्वामी समर्थांपुढे बंद लखोट्यातून ती पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली सर्वज्ञानी असलेल्या महाराजांना बंद लखोट्यातून सादर केलेली पत्रिका उघडून पाहण्याची वा वाचण्याची आवश्यकता नव्हती त्यांनी नानास क्या देखता है नौबत बजाव असे म्हणून सम्मती दर्शक नानाच्या हातावर टाळी देऊन नानाच्या हातावर आत्मलिंग उमटविले क्या देखता है नौबत बजाव याचा मथितार्थ असा आहे की नाना जोशी उर्फ रेखींनी आता येथेच न थांबता स्वामी कार्याचा झेंडा (डंका) उभारावा नानांच्या माध्यमातून भक्तिधर्माची पताका त्या प्रतिकूल काळात दूरवर फडकवता येईल हे त्यांनी जाणले होते म्हणूनच दर्ग्यातील नौबत वाजविण्यास नानास सांगितले होते श्री स्वामीसुताकडून नानास महाराजांच्या प्रासादिक पादुका मिळाल्या होत्या त्यांनी त्या अहमदनगरमध्ये श्री स्वामींचा मठ बांधून त्यात त्या पादुका स्थापन केल्या श्री महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या नानांनी अल्पावधीतच नामवंत ज्योतिषी म्हणून लौकिक मिळवला समाजातील सर्व जाती धर्म पंथ वर्गातील लोकांना ते ज्योतिषाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत श्री स्वामी कार्याचा प्रचार प्रसार त्या काळात ते करीत सद्यःस्थितीत सुप्रसिद्ध ज्योतिषी नाना रेखी यांचा मठ अहमदनगर येथे गुजर गल्लीत आहे त्यांचे वंशज आज तेथील सर्व व्यवस्था बघतात.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या