निजाम सरकारचे दप्तरदार श्रीमंत शंकरराव साहेब यास बह्यसमंध होता आणि क्षयरोगही झाला होता दिवसेंदिवस त्यांची शक्ती क्षीण होत गेली औषधोपचार पुष्कळ करुनही गुण नाही गाणगापुरास जाऊनही तेथे त्या उभयतांनी विविध प्रकारची धार्मिक सेवा केली पण गुण नाही एक दिवस त्यांना अक्कलकोटास जाण्याचा दृष्टांत झाला पण श्री स्वामींवर त्यांची निष्ठा नसल्यामुळे अक्कलकोटास न जाता पुन्हा तेथेच तशी सेवा करु लागले पुन्हा त्यांना दृष्टांतात स्पष्टपणे अक्कलकोटास जा म्हणून सांगण्यात आले निरुपाय म्हणून ते अक्कलकोटास आले श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते खाली बसले त्यांनी सुंदराबाईस मी व्याधीने फार पिडलो आहे त्याकरिता श्री स्वामींजवळ माझ्याबद्दल प्रार्थना करावी त्यावर सुंदराबाई म्हणाली तुम्हास आरोग्य झाल्यास तुम्ही काय द्याल शंकरराव म्हणाले तुम्ही मागाल ते देऊ शंकररावांच्या निस्तेजत्वामुळे बाईस ते सामान्य मनुष्य वाटून ती म्हणाली दोन हजार रुपये द्या ते म्हणाले मी बरा झालो तर दहा हजार रुपये देईन बाई चकित होऊन श्री स्वामी महाराजांस शंकररावांबद्दल प्रार्थना केली श्री स्वामी समर्थ काहीही न बोलता ते उठून शेखनूर साहेबाच्या दर्ग्याकडे चालते झाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

शंकरराव निजाम सरकारचे एक श्रीमंत दप्तरदार होते म्हणजे त्याच्याकडे त्या काळात हे मोठे अधिकारपद होते त्या अनुषंगाने त्यांच्याकडे सत्ता संपत्ती नोकर चाकर होते त्यांना चांगला मान सन्मान प्रतिष्ठा होती पण त्यांचे प्रारब्ध भोग काही चुकले नव्हते तसे ते कुणाचेही चुकत नसतात त्यामुळेच त्यांना ब्रह्यसमंधाची बाधा आणि क्षयरोगाची पीडा होती या सर्वांच्या निराकरणासाठी त्यांनी सर्व प्रकारचे उपाय केले होते पण गुण मात्र येत नव्हता त्यामुळे ते त्रस्त झाले होते ते शरिरानेही क्षीण आणि निस्तेज झाले होते औषध उपचाराचा परिणाम होत नसल्यामुळे ते काही धार्मिक सेवा करण्यासाठी गाणगापूरला गेले तेथे त्यांना जेवढी शक्य होती तेवढी धार्मिक सेवा त्यांनी केली पण त्यांची ही धार्मिक सेवा म्हणजे ब्राह्यणाद्वारे अनुष्ठाने दानधर्म अभिषेक तीर्थस्नान ब्राह्यणभोजने श्राद्धतर्पण इ. गाणगापुरात त्यांना अक्कलकोटास जाण्याचा स्वप्नदृष्टांत झाला पण त्यांची श्री स्वामींवर निष्ठा नसल्यामुळे त्यांनी त्या स्वप्न दृष्टांतातील आदेशाकडे कानाडोळा केला पुन्हा वरील प्रमाणेच झापडबंद पद्धतीने धार्मिक सेवा चालू ठेवली अक्कलकोटास जा असा स्पष्ट आदेश झाल्यावरच ते अक्कलकोटास यायला निघाले हे ते सुरुवातीसच करु शकले असते पण त्यांची श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा दृढ होण्याची वेळ यावयाची होती यात सुंदराबाईचाही उल्लेख आलेला आहे प्रत्यक्ष परब्रह्याचा सदैव सहवास आणि सेवेत राहूनही तुम्ही काय द्याल असा स्वार्थी प्रश्न सुंदराबाईने विचारलाच शंकररावांच्या निस्तेजामुळे बाईस शंकरराव सर्वसामान्य मनुष्य वाटणे आणि तिने त्यामुळे दोन हजार रुपयाची मागणी करणे दहा हजार देईन हे शंकररावांचे शब्द ऐकून चकित होणे इ. वरुन सुंदराबाईची अध्यात्मातील ही वृत्ती आणि वर्तन निश्चितच तुच्छनीय आणि लांछनीय आहे अशी सौदेबाजी आणि व्यवहार अनेक धार्मिक स्थळावर तेव्हाही होते आताजास्त प्रमाणात पहावयास मिळतो यावर श्री स्वामींची कोणती कृती काहीही न बोलता शेखनूर साहेबांच्या दर्ग्याकडे जाणे यातच सर्व काही आले.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या