प्रत्यक्ष दत्ताचा अनादर झाला म्हणून शंकराचार्यांनी श्री स्वामी समर्थांपुढे येऊन प्रार्थना केली की महाराज अपराधाची क्षमा करावी आपणच जगदगुरु आहात आम्ही अधिकारमदाने भुलून आपला भयंकर अपराध केला आहे आता क्षमा करुन सिंहासनावर बसावे श्री समर्थ शिव्या देऊन म्हणाले आम्ही संन्यासी भ्रष्ट आहोत परंतु आपल्या बरोबरच्या तीन शास्त्र्यांची उत्पत्ती महमद यवनापासून झाली आहे ती कथा यास व यांचे मातेस विचारा आपण धर्म संस्थापक जगदगुरु आहात असे दुष्ट लोक पंक्तीस कसे बसवता केशवपन करुन बोडके झाले म्हणजे संन्यास होतो काय शास्त्र पढले असले म्हणून जातिभ्रष्ट होत नाही की काय सांगा हे श्री स्वामींचे भाषण ऐकून त्या शास्त्र्यांनी माना खाली घातल्या आणि एकदम जाऊन स्वामींचे चरण धरले सर्वांनी अपराधाची क्षमा मागितली श्री स्वामींस दया येऊन अन्नात जे किडे दिसत होते ते नाहीसे होऊन अन्न पूर्ववत दिसू लागले सर्वांस आनंद होऊन भोजने झाली जगदगुरु शंकराचार्यही श्री स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या स्थानी गेले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

प्रत्यक्ष दत्तप्रभूचा अपमान झाल्याची जाणीव शंकराचार्यांना करुन देण्यात आली पानात अगोदरच किडे निर्माण झालेच होते त्यामुळे खुद्द शंकराचार्यही आश्चर्यचकित झाले होते त्यांनी श्री स्वामींची क्षमा मागितली स्वतःच्या उच्च सिंहासनावर श्री स्वामींना सन्मानपूर्वक बसविले शंकराचार्यांना श्री स्वामी महाराजांचे अवतारित्व प्रत्ययास आले श्री स्वामी समर्थ हेच खरेखुरे जगदगुरु आहेत आपण स्वतः नामधारी जगदगुरु आहोत याची त्यांना मनोमन कल्पना आली परंतु श्री स्वामींनी शंकराचार्यांच्या पंक्तीत बसलेल्यांची कुलगंडी अतिशय कडक आणि रोखठोक शब्दात सर्वांसमोर काढली आम्ही संन्यासी भ्रष्ट आहोत परंतु आपल्या बरोबरच्या तीन शास्त्र्यांची उत्पत्ती महमद यवनापासून झाली आहे ती कथा यास व यांचे मातेस विचारा आपण धर्म संस्थापक जगदगुरु आहात असे दुष्ट लोक पंक्तीस कसे बसवता केशवपन करुन बोडके झाले म्हणजे संन्यास होतो काय शास्त्र पढले असले म्हणून जातिभ्रष्ट होत नाही की काय सांगा असे लोक आपणास कसे चालतात अशा तीव्र शब्दात ते जगदगुरु शंकराचार्यांस विचारीत होते या सर्व लीला भागातून शंकराचार्यांसारखे जगदगुरुसुद्धा आपल्या संगतीला आणि पंक्तीला कोणते लोक घेत असत याची कल्पना श्री स्वामींच्या वरील कडक उदगारावरुन येते धार्मिक अथवा अन्य कोणत्याही उच्च पदस्थाने कसे वर्तन करावे कसा विवेक ठेवावा याचे आकलन होते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या