संन्याशाच्या त्या उन्मत्त भाषणाने वामनबुवास वाईट वाटले घोलपशास्त्रींकडे येऊन घडलेली सर्व हकिकत त्यांना सांगितली त्यावर ते म्हणाले त्या उन्मत्त संन्याशाची श्री स्वामी समर्थ खोड मोडल्या शिवाय राहणार नाहीत दुसऱ्या दिवशी ते सर्व गंगा स्नान करुन घोलपस्वामींकडे दर्शनास गेले त्यांना पाहताच घोलपशास्त्री म्हणाले त्या संन्याशाची शिष्यमंडळी आता येथे आली होती त्यांनी सांगितले संन्याशाने सोन्याची गोळी बनविण्याचा सकाळपासून पुष्कळ प्रयत्न केला पण सोन्याची गोळी न बनता केवळ काळ्या कोळशाची गोळी झाली त्यामुळे संन्यासी फार संतापला आहे स्वयंपाक झाला नाही त्याच्या जवळचे भांडवलच आटोपल्यामुळे बरेच बाया व पुरुष निघून गेले आहेत अक्कलकोटच्या सेवेकर्यांस ठार मारीन असा बडबडतो आहे घोलपस्वामींनी हे सांगितल्यावर वामनबुवा विचारात पडले धैर्य करुन त्या संन्याशाकडे गेले वामनबुवा व गोविंदरावस बघताच ती हातात मोठा धोंडा घेऊन त्या दोघांचे डोके फोडण्यास आला तो तोंडाने तुमारे माकी चूत मर जाव बहनचोद हमारा बस घात किया ओ मादरचोद खडे रहो देखो हरामखोर गद्धे नही मरते असे अर्वाच्य बडबडत तो धोंडा घेऊन त्या दोघांकडे आला ते दोघे अतिशय घाबरले होते त्यांनी श्री गुरुस्वामी समर्थ जय जय दत्तराज योगी असा अनन्यभावे भजनाचा मोठ्या झपाट्याने नामघोष चालविला अशा प्रसंगी तो संन्यासी घाबरा होऊन तो दगड त्याच्याच डोक्यात बसून तो एकाएकी निश्चेष्ट होऊन बेशुद्ध पडला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

संन्याशाच्या उन्मत्तपणाविषयी वामनबुवांनी घोलपस्वामीस सांगितल्यावर त्या उन्मत्त संन्याशाची खोड मोडल्याशिवाय श्री स्वामी समर्थ राहणार नाहीत असे खात्रीपूर्वक सांगितले आणि घडलेही तसेच त्या किमयागार संन्याशाने नेहमीप्रमाणे सोने बनविण्याचा खटाटोप केला परंतु सोने होण्याऐवजी त्याचे काळे कोळसे झाले खरे तर या घटनेचा त्याने सारासार विचार करावयास हवा होता त्याची कारण मीमांसा करावयास हवी होती पण तशी त्याने ती केली नाही कारण उन्मत्तपणा अहंपणा क्रोध यामुळे तो त्याची सारासार विचारशक्ती गमावून बसला होता तो जोपर्यंत सोने करीत होता तोपर्यंत काही लोक त्यास मानीत होते त्याच्या आश्रयाने राहिलेसुद्धा होते पण सोने निर्माण करण्याची त्याची सिद्धी श्री स्वामींनी त्याच्या उन्मत्त वागण्यामुळे काढून घेतली होती असतील शिते तर जमतील भूते या म्हणीप्रमाणे आता त्याची स्थिती झाली होती त्याच्या समवेत असलेले काही बायका पुरुष त्याला सोडून गेले सोन्याची निर्मितीच नाही तर स्वयंपाकही नाही त्याच्यासह त्याच्या समवेत जे थोडे फार स्त्री पुरुष होते त्यांची उपासमार सुरू झाली सोन्याऐवजी कोळसे सोडून गेलेले स्त्री पुरुष स्वयंपाक पाणी नाही आधीच मर्कट वृत्तीचा असलेला तो किमयागार संन्याशी संतापला अक्कलकोटच्या सेवेकर्यांस ठार मारण्याच्या गोष्टी संतापाच्या भरात तो करु लागला वामनबुवा आणि गोविंदराव स्वामी सेवेकर्यांना बघताच त्याचा संताप अनावर होऊन त्याचे डोके फोडण्यासाठी त्याने मोठा धोंडा हातात घेतला परंतु देवतारी त्यास  कोण मारी या उक्तीप्रमाणे श्री स्वामींनी अशी काही लीला केली की तो धोंडा त्याच्याच डोक्यात पडून तो एका एकी निश्चेष्ट होऊन जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या तोंडातील घाणेरड्या अश्लील शिव्या तशाच त्याच्या तोंडात राहिल्या या लीलेत वामनबुवास आणि गोविंदरावस त्यांची स्वामीभक्ती कामास आली तो किमयागार संन्याशी उन्मत्त झाला होता संन्यास धर्माच्या पूर्णतः विरुद्ध त्याचे वर्तन होते समाजहिताचे तो काहीच बोलत नव्हता सदैव सत्यम शिवम सुंदरमच्या निर्मितीत मग्न असलेल्या श्री स्वामींना तो अकारण आव्हान देत होता श्री स्वामींना त्याचे चुकीचे कृत्य कसे सहन व्हावे त्यांनी त्याच्यातली सोने करण्याची सिद्धीच काढून घेतली त्याची पूर्णतः फजिती झाली श्री स्वामी लीला दुसरे काय.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या