श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगदवंद्य पुरुष होऊन गेले चिंतोपंत आप्पा टोळ सोलापूरास मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून रजा संपवून सोलापूरास येताना पंढरपूरात मुक्कामी राहिले आपण कोण कोठे असता म्हणून गोपाळबुवांनी टोळाच्या त्या कारकुनास प्रश्न केला तेव्हा कारकुन म्हणाला आम्ही सोलापूरात मामलेदार कचेरीत कारकुन आहोत हो तुमचे मामलेदारास पत्र द्यायचे आहे असे बुवा म्हणाले काही दिवसांनी तुला (चिंतोपंत टोळ) महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयाची गाठ पडून दर्शन व सहवास होईल असा मजकूर लिहिलेले पत्र बुवांनी त्या कारकुनाजवळ देऊन मामलेदार टोळ यास देण्यास सांगितले त्याप्रमाणे पुढे सात आठ वर्षांनी चिंतोपंतांची व श्री स्वामी समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री स्वामी समर्थांचे निःस्सीम भक्त झाले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

वरील कथाभाग श्री स्वामी समर्थ व चिंतोपंत टोळ यांची पुढे भेट होणार हे सूचित करणारा आहे गोपाळबुवांना श्री स्वामींची व टोळांची भेट पुढे होणार आहे हे कसे कळले त्यांच्याकडे रजा संपवून टोळांचा कारकून का यावा त्याचेजवळ बुवांनी पत्र का द्यावे पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे सात आठ वर्षांनी तंतोतंत तसेच का घडावे विज्ञानाच्या तर्काच्याही पलीकडचे हे सर्व प्रश्न आहेत पण हे वास्तव मात्र घडले चिंतोपंत आप्पा टोळ तेव्हा सोलापूरात मामलेदार होते त्यांचा कारकून रजेवर गेला होता रजा संपवून परतताना त्याचा पंढरपूर क्षेत्रीच मुक्काम का व्हावा तेथे गोपाळबुवांशी त्याची भेट का व्हावी पत्रातील मजकुराप्रमाणेच का घडावे या सर्व प्रश्नांची उत्तरे सद्यःस्थितीतील प्रगत विज्ञानालाही देता येत नाहीत याचा अर्थ सध्याचे विज्ञान कुचकामी निरुपयोगी दुर्लक्षित करण्यासारखे आहे असे मुळीच नाही पण विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून आचार विचार असावा इतकेच कुठलाही अतिरेक नसावा विज्ञान आणि अध्यात्म हे दोन डोळे जीवन व्यतीत करताना असावीत पण त्या दोहोंचीही दृष्टी मात्र डोळस सकारात्मक सत्यम् शिवम् सुंदरम् स्वरुपाची असावी येथे एक मात्र मान्यच करावे लागेल की या सर्व घडणाऱ्या घडवून आणणाऱ्या घटनांवर नियंत्रण करणारी शक्ती ही असलीच पाहिजे योगा योग एकमेकांचे अनुकूल प्रतिकूल जुळणारे अथवा न जुळणारे प्राक्तन असे अव्यक्त काही असल्याशिवाय वरील लीलेतील प्रसंग कसे घडू शकेल पुढे चिंतोपंत टोळ आणि श्री स्वामी समर्थांची पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे भेट झाली त्या दोघांच्या दरम्यान अनेक लीला पुढे घडल्या.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या