या अगोदरच्या लीला भागात सांगितल्या प्रमाणे समंध म्हणाला महाराज....म्हणजे मी जाईन त्यावर महाराज म्हणाले अरे तो दरिद्री आहे हे ऐकून तो म्हणाला मीच याला दरिद्री व संतानहीन केले तरी आता माझे रुपये द्यावेत श्री समर्थ म्हणाले त्याने सेवा केली आहे हे रुपये तुला पोहचले नाहीत काय तो रागाने संतप्त होऊन म्हणाला रुपये दिल्याखेरीज मी त्याला कधीही सोडणार नाही ते ऐकून महाराज हसू लागले त्यांनी पागोट्याचे एक टोक वाटोळ्या छिद्राच्या लाकडी घरात घालून एका मनुष्यास ओढावयास सांगितले तो पागोट्याचे टोक जस जसा ओढू लागला तशी समंधी उपद्रवी ब्राम्हणाच्या अंगास पायास व हातास कळ लागू लागली आणि तो जमिनीवर मुटकळा होऊन पडला तेव्हा समंध मोठ मोठ्याने रडून विनंती करु लागला महाराज मला सोडवा मला सोडवा मी इतःपर पैसे मागणार नाही आपण सांगाल तसे ऐकेन महाराजांनी काहीही न बोलता तौया छिद्रातून सगळे पागोटे काढले समंधाच्या तोंडातून फेस येऊन तो मूर्छित होऊन पडला डोळे पांढरे करुन तो निःश्चेष्ट झाला घाबरलेल्या त्याच्या बायकोने श्री स्वामींचे पाय धरून रडत रडत प्रार्थना केली महाराज मला चुडेदान द्यावे मि अनाथ आहे मजकडे पाहावे हे ऐकून दयाघन स्वामींनी समंधाच्या अंगावर जोडा फेकताच तो उठून म्हणाला मला आता काय आज्ञा होत आहे श्री स्वामींनी उत्तर दिले त्या समोरच्या झाडावर बैस इकडे तिकडे वळवळ करुन समंध ब्राह्यणाला सोडून गेला ब्राम्हण शुद्धीवर आला बाईस आनंद झाला श्री स्वामींची पाद्यपूजा करुन त्यांना नैवेद्य अर्पण करुन ती म्हणाली महाराज माझे जन्माचे संकट निवारण केले या अनाथ अबलेवर महान उपकार केले ते आम्ही वर्णन करु शकत नाही महाराज आता आम्ही काय करावे असे बाईने विचारल्यावर श्री स्वामींनी आपले जोडे तिचे अंगावर टाकले ते तिने प्रसाद म्हणून घेऊन ती तिच्या बिर्याडी आली त्या जोड्याची ती पूजन करु लागली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

समंधाने श्री स्वामी समर्थ आपण त्या ब्राह्यणास का छळीत आहोत आणि आपण केव्हा जाऊ हे या अगोदरच्या लीलाभागात आले आहे ब्राम्हण दरिद्री आहे असे श्री स्वामींनी सांगताच मीच त्याला दरिद्री आणि संतान हीन केल्याचे समंधाने सांगितले रुपये घेतल्याशिवाय समंध त्या ब्राह्यणास सोडावयास तयार नव्हता पण श्री स्वामींच्या सहवासात राहून जी सेवा त्या समंधबाधित ब्राम्हणाने केली होती ते दैवी धनच होते ते स्वीकारुन त्या गरीब ब्राह्यणास सोडावे असे श्री स्वामी महाराज त्या समंधाला सांगत होते पण त्यांचे सांगणे त्या समंधाला पटत नव्हते माझा अव्हेर न करता यथार्थ न्याय करावा म्हणजे माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन हे त्याचे पालुपद श्री स्वामींपुढे सारखे चालूच होते त्या ब्राम्हण दांपत्याची सेवा लक्षात घेऊन स्वामींनी त्या समंधबाधित ब्राह्यणाला समंधापासून मुक्त करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांनी पागोट्याचे एक टोक गोल छिद्र असलेल्या लाकडी घरातून त्यात घातले ते टोक एका सेवेकर्यांस ओढावयास सांगितले जस जसे पागोटे छिद्रातून ओढले जाऊ लागले तस तशा त्या समंधास वेदना होऊ लागल्या समंधकिंचाळू लागला त्याच्या हाता पायास पीळ पडला त्याचा मुटकुळा होऊन तो जमिनीवर पडला शरणागती पत्करुन श्री स्वामींस सोडविण्याबद्दल तो विनंती करु लागला रुपये न मागण्याचे व श्री स्वामी सांगतील तसे वागण्याचे कळवळून सांगू लागला श्री स्वामींकडे आज्ञा मागू लागला श्री स्वामींनी समोरच्या झाडाकडे बोटाने निर्देश करुन त्यावर बसण्यास समंधास सांगितले श्री स्वामींच्या या कृतीचा मथितार्थ असा की गोल छिद्राचे लाकडी घर ही एक नीरस शुष्क विचारहीन वस्तू आहे पिशाच्चाच्या निरर्थक अवस्थेचे ते प्रतीक आहे त्या शुष्क निरस वस्तूच्या गोल छिद्रातून जस जसे पागोटे ओढले जात होते तस तसा पागोट्याच्या घर्षणाने दाह निर्माण होत होता तो त्या समंधाला जाणवत होता त्याची अगतिक अवस्था होऊन तो जमिनीवर धाडकन पडला अखेरीस तो समंध ब्राह्यणाचा देह सोडून द्यावयास तयार झाला (समंधाचे लीलेतील उदगार महाराज मला सोडवा मला सोडवा मी इतःपर पैसे मागणार नाही आपण सांगाल तसे ऐकेन) त्या समंधाने ब्राह्यणाचा देह सोडताच तो ब्राह्मण शुद्धीवर आला त्याच्या देहाला आता जाग आली होती तो आता निवांत आणि स्वस्थ झाला होता समंध अथवा ते पिशाच्च श्री स्वामी आदेशानुसार झाडावर जाऊन बसले बाईच्या चुडेदानाची विनंती मान्य करुन श्री स्वामींनी आपले जोडे तिच्या अंगावर फेकले अशक्यही शक्य करतील स्वामी त्यांची सेवा करणाऱ्यांना सद्यःस्थितीतही याची प्रचिती येते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या