श्री स्वामींचे अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार असे पाहा की ह्या शास्त्र्यांनी कामादी षडरिपूस जिंकले आहे काय हे वाक्य ऐकून बावडेकरास मोठा पश्चात्ताप झाला दुसरे दिवशी त्यांच्याजवळ येऊन बावडेकरांनी श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून शास्त्रीबुवां बरोबर जाण्याचा बेत रद्द केला नंतर ते श्री समर्थांजवळ राहिले श्री स्वामींचे पुराणिकावर फार प्रेम होते त्यामुळे महाराजांनी देह सोडण्यापूर्वी त्यास बार्शी गावी पाठवून दिले होते कारण हे शरीर पडलेले पाहून त्यास फार दुःख होईल व त्याच्या नित्य ध्यानात विघ्न येईल पुढे अंतःकाळी श्री समर्थांनी त्यांची खेळणी जवळच्या एका सेवेकर्या जवळ देऊन सांगितले ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे श्री स्वामींच्या देहावसानंतर बावडेकर अक्कलकोटास आले तेव्हा ती खेळणी त्यांच्या स्वाधीन केली ती हल्ली बार्शी येथे पुराणिकाचे देवघरात आहेत असेच पूर्वी एकदा बावडेकर नृसिंहवाडीस गेले होते तेथे यज्ञ करावयाचा होता तेव्हा बाबडेकरांना टेंबेस्वामीनी सांगितले की तुमचे गुरू जे अक्कलकोटचे स्वामी ते प्रत्यक्ष दत्तावतार आहेत करिता अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या मग यज्ञ करा यावरुन टेंबेस्वामीही श्री स्वामी समर्थांस अवतारी मानीत असत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

अरे तू बावडेकर शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार असे पाहा की या शास्त्र्यांनी कामादी षडरिपूस जिंकले आहे काय मध्यरात्रीस श्री स्वामींचे पुराणिका समोर येऊन त्यास विचारणे हे पुराणिका बरोबरच तुम्हा आम्हाला अचंबित करणारे आहे श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाची ओळख करुन देणारे आहे पुराणिकास चूक उमजली एवढा समर्थ सदगुरु प्रत्यक्ष परमेश्वरच समोर पाहिल्यानंतर पुराणिकाने श्री स्वामी समर्थांजवळच राहण्याचा निर्णय घेतला श्री स्वामींच्या वरील उदगारातील एक खोच तुम्ही आम्ही येथे विचारात घेण्याजोगी आहे असे पाहा की या शास्त्र्यांनी कामादी षडरिपू जिंकले आहेत काय म्हणजे मार्गदर्शन करणार होते त्यांनी कामादी षडरिपू जिंकले होते का अन्यथा मार्गदर्शन करणारे शास्त्र शिकविणारे जीवन तत्त्वज्ञान सांगणारे शास्त्री बुवा बापू आदि आपण पुष्कळ पाहतो ऐकतो आणि त्यांच्या बद्दल वाचतोसुद्धा पण त्यांनी कामादी षडरिपूंवर मात केलेली नसते कमी अधिक प्रमाणात ते त्यात गुरफटलेले माखलेले असतातच तर मग अशा तर्हेचे हे लोक इतरांना काय शास्त्र शिकविणार स्वतः कोरडे भाषण असलेले इतरांना काय ब्रह्यज्ञान सांगणार याचाही बोध आपण घ्यावयास हवा श्री स्वामींचे वरील परखड मत पुराणिकास मनोमन पटले त्याने त्यांच्याजवळच राहण्याचा निर्णय घेतला पुराणिकाच्या मनात निर्माण झालेले भ्रम अस्थिरता नष्ट झाली मनातला गोंधळ शांत झाला बावडेकर पुराणिकास क्षणभर शास्त्रीबुवांच्या बोलण्याचे आकर्षण वाटले त्यातच आपले कल्याण आणि उत्कर्ष आहे असेही जाणवले कुणाही जीवाच्या मनाची अशी अवस्था निर्माण होणे हीच एक प्रकारची मध्यरात्री असते अशा बेसावध क्षणी जर प्रारब्ध बलवत्तर असेल तर सदगुरु विकार वश होऊ पाहणाऱ्यास सजग करतो जसे पुराणिकास श्री स्वामींनी वरील उदगारांनी सजग केले त्यामुळे विद्वान पुराणिकही भानावर आला असे भानावर येणे तुमच्या आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असते शास्त्र पुराणे वेद मंत्र आदि शिकूनही षडरिपूलिप्त राहणाऱ्या विद्वान पंडिताचे पाय मोराच्या पायाप्रमाणे कुरुपच असतात त्यांच्या नादाने अथवा त्यांच्या बाह्य उपचाराने शब्दांच्या आतषबाजीने आपले आयुष्य फुकट वाया घालवू नये हाच इथला बोध आहे श्री स्वामींचे पुराणिकावर किती अकृत्रिम प्रेम होते त्याचेही वर्णन या लीला भागात आहे श्री स्वामींचा वियोग बावडेकरांना सहन होणार नाही याची कल्पना श्री स्वामींस असल्यामुळेच त्यांना बार्शीस जाण्यास सांगण्यात आले त्यास खेळणी केव्हा द्यायची हे ही श्री स्वामींनी सेवेकर्यांजवळ सूचित केले होते एखादा गुरू आपल्या शिष्यावर किती प्रेम करतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे टेंभे स्वामीसारख्या अधिकारी माहात्म्याने श्री स्वामी समर्थांस ते प्रत्यक्ष दत्तावतार आहे असे म्हटले आहे याचा अर्थ भावार्थ मथितार्थ काय फार विस्ताराने न लिहिताही तुम्हाला आम्हाला सारे काही समजले आहे.
]
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या