श्री वामनबुवांनी श्री स्वामी समर्थांकडे क्षमा मागितल्यानंतर समर्थ म्हणाले कुत्र्यास तुकडे घाल समर्थांच्या या बोलण्याचा अर्थ बुवास न समजल्यामुळे त्यांनी महाराजांस प्रश्न केला असता त्यांनी सेवेकर्यांकडे बोट दाखवून खूण केली त्यावरुन बुवांच्या लक्षात आले की सेवेकर्यांस माधुकरी घालण्याससमर्थ सांगत आहेत त्याप्रमाणे दुसरे दिवशी २५० सेवेकर्यांस माधुकरी घातली नंतर महाराज म्हणाले आम्हास ताट आणा अशी आज्ञा होताच यथासांग अन्नाचे पात्र महाराजांपुढे आणून ठेवले त्यावेळी सुंदराबाई आणिक काही पदार्थ घालीत असता पोळी दसर्याच्या दिवशी आणून घाल असे ऐकून वामनबुवास वाटले की दसर्यापर्यंत आपणास जाण्याची आज्ञा नाही विजया दशमीस बुवांनी श्री समर्थांस उत्तम प्रकारचा नैवेद्य करुन त्यांना भोजन घातले नंतर सायंकाळी राजेसाहेब बंबगार्डन व महाराज आणि इतर कारभारी मानकरी वगैरेंसह मोठ्या थाटाने स्वारी शमीपूजनास निघाली तिकडून येऊन महाराज राजवाड्यात गेले ते चार दिवस बाहेर आले नाहीत वामनबुवा श्री स्वामींची आज्ञा घेऊन परत बडोद्यास आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

गिरनार द्वारका सुदामपुरी वगैरे तीर्थयात्रा करुन आल्यावर वामनबुवांनी श्री स्वामींस त्या तीर्थयात्रांचा प्रसाद वस्तू आदि अर्पण केल्या पण त्यांना त्याचे कौतुक नव्हते कुत्र्यास तुकडे घाल म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांना जेऊ घाल असे बुवास निर्देश दिले यातून श्री स्वामींना बुवांसाठी हेच सूचित करावयाचे आहे की वामनबुवांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री बडवे पुजारी पंडे आदींना दानदक्षिणा आणि भोजने घातली ते सर्व ठीक आहे पण माझ्या सेवेकर्यांस जेवू घालशील तर त्याचे पुण्य शतपटीने वाढेल असा कुत्र्यांना तुकडे घाल याचा मथितार्थ आहे याप्रसंगी श्री स्वामींनी सेवेकर्यांकडे बोट दाखवून तसा निर्देश दिला श्री स्वामींच्या इच्छेनुसार बुवांनी २५० सेवेकर्यांस जेवू (माधुकरी) घातले सेवेकरी जेवून (माधुकरी खाऊन) तृप्त झाल्यानंतरच श्री स्वामी म्हणाले आम्हास ताट आणा किती ही श्री स्वामींची भक्तवत्सलता आपला एकही सेवेकरी उपाशी राहू नये याबद्दल ते सदैव दक्ष असत अगोदर सेवेकरी मग आपण ही त्यांची भावना होती असे सद्यःस्थितीत अनुभवास येते का अशा तर्हेची वृत्ती भावना तथाकथित सद्याच्या बुवा बापू माउली दादा महाराज आदिंकडून अनुभवास येते का महाराजांपुढे आणलेल्या ताटात सुंदराबाई काही पदार्थ वाढीत असतानाच पोळी दसर्याच्या दिवशी आणून घाल यातून श्री स्वामी असेच सूचित करीत होते की वामनबुवांना विजया दशमीपर्यंत जाण्याची आज्ञा नव्हती विजया दशमीपर्यंत बुवा थांबले त्या दिवशी बुवांनी श्री स्वामींनी निर्देशित केल्याप्रमाणे पुरणपोळीचा उत्तम प्रकारचा नैवेद्य श्री स्वामीस अर्पण केला वामनबुवा वैद्यांच्या संबंधीत असलेल्या वरील चारही लीला सद्यःस्थितीतही आपणास प्रबोधित करतात की १) श्री स्वामी समर्थांच्या सहज बोलण्यात वागण्यात आणि निर्देशित करण्यातही खूप आशयपूर्ण अर्थ दडलेला असायचा २) अनेक तीर्थयात्रा तेथील देव देवता यांची दर्शने पूजा अर्चा अनुष्ठाने पारायणे करीत श्रम वेळ पैसा खर्च करीत चंचल मनाने वामनबुवांसारखे (सुरुवातीस) फिरण्यापेक्षा एक देव एकच भगवंत श्री स्वामी समर्थ हाच का भजू पुजू व सदैव स्मरु नये बुवांनीही अनेक टक्के टोणपे धक्के खाऊन अखेरीस काय केले त्यांना श्री स्वामींचे देवत्व उमगलेच ना (२११-१-२-३-४) या अगोदर आलेल्या चारही विभागात विभागलेली ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकरांच्या संबंधातील लीला खूप सखोल आत्मचिंतन करावयास लावणारी आहे खूप काही प्रबोधित करणारी आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या