मोगलाईतील अब्दुलपूर गावच्या देशपांडे जहागीरदारास वयाच्या साठ वर्षांपर्यंत संतान नव्हते म्हणून ते त्यांच्या पत्नीसह गाणगापुरी येऊन सेवा करु लागले त्यांना दोन स्त्रिया होत्या एके दिवशी त्यास दृष्टांत झाला की आम्ही प्रत्यक्ष अक्कलकोटात यतिवेष धारण करुन जगदोद्धार करीत आहोत तेथे जा मनोरथ पूर्ण होईल श्री देशपांड्यांनी जागे झाल्यावर त्यांच्या स्त्रियांना स्वप्नदृष्टांत सांगितला देशपांडे स्त्रियांसह अक्कलकोटी आले भगवंत सुताराच्या घरीच श्री स्वामींचे दर्शन घेताना त्यांना खात्री पटली की स्वप्नातील मूर्ती ती हीच ते श्री स्वामींपुढे हात जोडून उभे राहताच समर्थ म्हणाले शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल असा आशीर्वाद देऊन त्यांच्या ज्येष्ठ स्त्रीच्या पदरात श्रीफळ टाकले व ते श्रीफळ कनिष्ठ स्त्रीच्या पदरात घालण्यास सांगितले उभयतांनी श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करुन ब्राम्हण भोजन घातले व ते स्वामींची आज्ञा घेऊन आनंदाने आपल्या गावी आले पुढे त्यास एक कन्या व पुत्र अशी दोन अपत्ये झाली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीला कथेत मोगलाईचा उल्लेख आहे याचा मथितार्थ भोग लालसेच्या हुकूमशाहीने निर्माण झालेले अंदाधुंद प्रशासन राज्यकारभार अब्दुलपूर म्हणजे षडविकारांचेच थैमान असलेली नगरी तेथील साठ वर्षे वयाचा देशपांडे जहागीरदार म्हणजे विषयांनी लिप्त असलेला अथवा विषयांत आकंठ बुडालेला एक सामान्य जीव त्याला दोन बायका म्हणजे त्याच्या पूर्वजन्मातील संचित कर्मगती आणि दुसरी म्हणजे त्याच्या विद्यमान जन्मातील प्रारब्धगती या दोघींबरोबर वयाची साठ वर्षे होईपर्यंत तो संसाराच्या आसक्तीस चिकटून आहे पुत्र संतान नसल्यामुळे देशपांडे कंटाळून दोघी पत्नींसह (कर्मगती व प्रारब्धगती) गाणगापूरला दत्तप्रभूंच्या सेवेसाठी आला सेवेचे काहीना काही फळ हे मिळतच असते या नियमानुसार त्याला अक्कलकोटला जाण्याचा निर्देश मिळतो तो अक्कलकोटला आल्यावर त्याने स्वप्नात पाहिलेली मूर्ती आणि येथे असलेली मूर्ती सारखीच दिसते त्यामुळे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि दत्तप्रभू वेगळे नाहीतच याची त्याला खात्री पटली सर्वसाक्षी श्री स्वामींना अगोदरच कल्पना आलेली असल्यामुळे श्री देशपांडे काही बोलण्याच्या आतच ते सांगतात शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल श्री स्वामींना मुद्रिकांची लालसा वा हाव होती का मुळीच नाही शंभर द्याल तर बैंगण होईल याचा अर्थ श्रद्धेने हळूहळू विरक्ती होईल आणि हजार द्याल तर हत्ती होईल याचा अर्थ निर्माण झालेली विरक्ती बळकट होईल निष्ठापूर्वक पुढे वाटचाल चालू ठेवल्यास विवेकाची प्राप्ती होईल आणि विवेक हाच व्यक्तीच्या आचार विचार धर्मावर अप्रत्यक्षपणे अंकुश ठेवतो विवेकच सत्यम शिवम सुंदरम निर्मितीचाही कारक आणि पूजक असतो परमार्थ वा अध्यात्माची वाटचाल करण्याची सर्वांचीच इच्छा असते पण प्रत्यक्ष वाटचाल करणे अवघड खडतरच त्यासाठी विवेक हवाच या लीलेत देशपांड्यांना श्री स्वामी जे सांगतात ते ते मान्य करतात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांच्या कृपाबोधाचे श्रीफळ ज्येष्ठ स्त्रीच्या म्हणजे संचित गतीच्या पदरात टाकून तिलाच ते कनिष्ठ स्त्रीच्या म्हणजे प्रारब्ध गतीकडे सोपविण्यास सांगतात देशपांडेरुपी जीवाचा विषयांची भोगलालसा हाच मूळ रोग होता त्यावर सदगुरु श्री स्वामी समर्थांचा उपदेश शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल हाच उपाय असतो त्यामुळेच प्रारब्ध गतीच्या पोटी विरक्ती ही कन्या आणि विवेक हा पुत्र अशी दोन अपत्ये जन्मास येऊन देशपांडेरुपी जीवाचा मोक्ष मुक्तीचा मार्ग मोकळा होतो थोडक्यात म्हणजे विरक्तीने आणि विवेकाने उपासना करावी त्याचे फळ अंतिमतः मिळतेच हा इथला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या