श्री स्वामींनी त्यास डोकीवरचे पागोटे आणि अंगरखा काढून भुईवर अंथरण्यास सांगितले बाबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केले पण आपणासही दिगंबर करतात की काय अशी भीती वाटली पण तसे काही घडले नाही श्री स्वामींनी त्यास आज्ञा केली की रावण्णाचे कानात त्याचे नाव घेऊन हाक मार त्याने हाक मारली पण जबाब मिळाला नाही मोठ्याने हाक मार म्हणून श्री स्वामींनी पुन्हा त्यास आज्ञा केली तरीही काही उपयोग झाला नाही दोन्ही कानात मोठ्याने हाक मार अशी तिसऱ्यांदा त्यास आज्ञा केली तेव्हा बाबासाहेबाने रावण्णा रावण्णा म्हणून मोठ्याने दोन्ही कानात हाका मारल्या त्यासरसी रावण्णा सावध होऊन डोळे उघडून लोकांकडे पाहू लागला थोड्याच वेळात तो सावध होऊन भूक लागली म्हणून खाण्यास मागू लागला त्याला खाण्यासकाय द्यावे असे श्री स्वामीस विचारताच त्यास बोटव्याची खीर द्यावयास सांगितले तत्काळ रावण्णास बोटव्याची खीर व महाराजांस खीर आणि इतर पदार्थांचे ताट भरुन आणले रावण्णाने खीर खाल्ली व तो चांगला हुशार झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या अगोदरच्या लीलाभागात मुडद्याच्या डोक्यावर जोडा ठेवल्यामुळे श्री स्वामी समर्थ कसे संतापले त्यांनी काय कृती केली आदि बाबतचे वर्णन आले आहे त्यांच्या संतापण्याचा मथितार्थही आला आहे आता श्री स्वामींना रावण्णास जिवंत करावयाचे होते कारण त्यांचा लाडका सेवेकरी अजाणतेपणाने का होईना त्यांचा जोडा मुडद्यावर ठेवण्याची कृती करुन बसला होता त्यासाठी त्यांनी यमलोकात पोहचलेल्या रावण्णाला बाबासाहेब जाधवाकरवी एकदा दोनदा नव्हे तिनदा हाका मारावयास लावून यमाच्या तावडीतून परत बोलाविले होते श्री स्वामींच्या या लीलेमागे दोन उद्देश दिसतात बाबासाहेबास सावरुन घेणे मृत झालेल्या रावण्णास जिवंत करणे त्या दिवशी श्री स्वामी मारुतीच्या मंदिरात उपाशीच झोपले होते त्यांच्या या कृतीची संगती ही मोठी मजेशीर आहे पुढे काय घडेल हे त्यांना कसे ज्ञात होते याचा संकेत देणारे आहे रावण्णा सावध झाल्यावर खाण्यास मागू लागला त्याला बोटव्याची खीर देण्यास श्री स्वामींनी सांगितले वास्तविक सर्पदंशाला दूध व दूधाचे पदार्थ त्यातही बोटव्याची खीर विषवत असल्यामुळे निषिद्धच असते विषावर विषाचाच उतारा म्हणून त्यास खीरच खावयास दिली ही सर्व लीला इडगीगावच्या मारुतीच्या मंदिरात घडली रावण्णा जिवंत झाला ही त्या चिरंजीव मारुतीचीच कृपा मारुतीलाही नैवेद्य देण्यास सांगितले बाबासाहेब जाधवांना खाऊ घालून त्याच्यावरजो कठोर स्वरुपाचा राग श्री स्वामींनी व्यक्त केला होता त्याचीही भरपाई केली श्री मारुतीरावास नैवेद्य दाखविण्यास सांगितला मारुती सारख्या दैवताला श्रेय देऊन ते स्वतः मात्र नामानिराळे राहिले वरील अ) आणि ब) ह्या दोन लीला मुळातच मनापासून वाचल्या त्यावर चिंतन मनन केले तर श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याची कल्पना येते बाबासाहेब जाधवासारखा अतिरेक करणेही चूक आहे हे समजते श्री स्वामी तेव्हा सदेह होते म्हणून निभावले जन्म आणि मृत्यू हा सृष्टीचा आणि मानवी जीवनाचा क्रम आहे त्यात ढवळा ढवळ म्हणजे कुणाही मृतास केव्हाही जिवंत केले तर सृष्टीतील जीवन चक्राचा समतोल बिघडेल तरीही काही अपवादात प्रसंगात देव त्यात हस्तक्षेप करतो पण असे वारंवार होत नाही.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या