श्री स्वामी समर्थ दर्शनास उसळलेली प्रचंड गर्दी पाहून सोलापूरातील चनबसाप्पा व्यापारी सिद्धाप्पा या दुसऱ्या व्यापाऱ्यास म्हणाला काय हो आज सर्व व्यापारी दुकानदार सोलापूरची मुले लेकरे स्त्रिया पुरुष त्या अक्कलकोटच्या संन्याशास पाहण्यास गेली केवढे हे मूर्ख अविवेकी लोक सिद्धेश्वरासारखा देव सोडून संन्याशाचे नादी लागले आहेत भाविक सिद्धाप्पा चनबसाप्पा म्हणाला आपण देव गुरू साधू यांच्या निंदेचे पातक घेऊ नये चला आपण समर्थांचे प्रत्यक्ष कौतुक पाहू ते दोघेही धर्मरावाचे बागेत आले तेथील उसळलेली गर्दी पाहून दोघेही चकितच झाले सिद्धाप्पा श्री स्वामीस साष्टांग नमस्कार घालून चनबसाप्पा श्री स्वामीस पाहतो तो तेथे पार्वतीसह सिद्धेश्वर कैलासनायक प्रत्यक्ष दिसू लागले चनबसाप्पा भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पश्चात्ताप पूर्वक दोन्ही हातांनी स्वतःच्या तोंडात मारुन घेऊ लागला भयाने थरथर कापत तो म्हणाला अहो साक्षात शिव शंकरा मी महापातकी आहे श्वान सुकराहूनही नीच आहे आपले भगवंत स्वरुप न ओळखून धनमदाने प्रत्यक्ष आपणास वाईट शब्दांनी ताडन केले आज लक्षावधी लोक घरदार सोडून दर्शनास येऊन कृतार्थ झाले अशा लोकांस मी दूषण ठेविले या महान अपराधास देहांत प्रायश्चित मिळाले त्यावर समर्थ हसून म्हणाले तुला खरा पश्चात्ताप झाला आहे पश्चात्ताप हेच मुख्य प्रायश्चित आहे पश्चात्तापाने पाप नाहीसे होते चित्तशुद्धी होते सर्व दुर्वासनांचा क्षय होतो अनायासे मनोजय होतो संसार प्रपंचाचा अनुताप तेच वैराग्य चनबसाप्पास पश्चात्ताप झालेला पाहून सर्वांस आश्चर्य वाटले नंतर श्री स्वामींनी त्यास प्रसाद दिला तो त्याने ताबडतोब भक्षण केला चनबसाप्पाने श्री स्वामीस उत्तम प्रकारचे शिवलिंग पिंडीसह अर्पण केले ते श्री स्वामींनी स्वहस्ते बुधवार पेठेतील मठात स्थापन केले समर्थ कृपेने चनबसाप्पास पुत्रसंतानही झाले श्री स्वामींच्याच आज्ञेने त्याचे नाव मल्लिकार्जुन ठेविले दिवसेंदिवस त्याची समर्थ कृपेने भरभराट होऊन त्याला राजदरबारी मोठा मानही मिळाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला कथा भागात मुख्य पात्र आहे चनबसाप्पा तोही तुमच्या आमच्या सारखाच प्रापंचिक आहे त्यामुळे षडरिपूग्रस्त आहे श्री स्वामींच्या दर्शनास लोटलेल्या प्रचंड गर्दीला पाहून त्याने काढलेले उदगार काय हो आज सर्व व्यापारी दुकानदार सोलापूरची मुले लेकरे स्त्रिया पुरुष त्या अक्कलकोटच्या संन्यास पाहण्यास गेली केवढे हे मूर्ख अविवेकी लोकं सिद्धेश्वरासारखा देव सोडून संन्याशाचे नादी लागले आहेत यातून त्याचा स्वतःचाच मूर्ख आणि अविवेकीपणा दिसतो चनबसाप्पासारखी काही माणसे आजही समाजात आहेत आपणास फारसे माहित नसेल तर चनबसाप्पासारखी उथळ आणि अविवेकी प्रतिक्रिया तरी देऊ नये पण काहींचा स्वभावच तसा असतो त्याला कोण काय करणार सिद्धाप्पासारखेही काही लोक असतात की जे सांगतात देव गुरू साधू सज्जन यांच्या निंदेचे पातक घेऊ नये आपण सिद्धाप्पा सारखी मनोवृत्ती ठेवण्यात कोणते नुकसान आहे परंतु जो चनबसाप्पा सिद्धेश्वराचा उपासक भक्त होता त्याला श्री स्वामी समर्थांच्या ठिकाणीच त्याचे उपास्य दैवत दिसू लागले चमत्कार तेथे नमस्कार या न्यायाने त्याने श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घातला त्यांच्या पुढे हीन दीन लीन होऊन तो पश्चात्तापाने म्हणू लागला अहो साक्षात शिव शंकरा मी महापातकी आहे श्वान सुकराहूनही नीच आहे आपले भगवंत स्वरुप न ओळखून धनमदाने प्रत्यक्ष आपणास वाईट शब्दांनी ताडन केले आज लक्षावधी लोक घरदार सोडून दर्शनास येऊन कृतार्थ झाले अशा लोकांस मी दूषण ठेविले या महान अपराधास देहांत प्रायश्चित मिळाले पाहिजे लीलेतल्या त्याच्या या पश्चात्ताप दग्ध मनोगतातून श्री स्वामींच्या त्या सिद्धेश्वर स्वरुपाचा त्याच्या मनावर किती मोठा परिणाम झाला याची कल्पना येते कुणीही माणूस व्यक्ती चुका करीत असते पण त्याबद्दल त्याला पश्चात्ताप होणे म्हणजे चित्तशुद्धी होणे त्याबाबत श्री स्वामींनी चनबसाप्पास ऐकविलेले तुला खरा पश्चात्ताप झाला आहे पश्चात्ताप हेच मुख्य प्रायश्चित आहे पश्चात्तापाने पाप नाहीसे होते चित्तशुद्धी होते सर्व दुर्वासनांचा क्षय होतो अनायासे मनोजय होतो संसार प्रपंचाचा अनुताप तेच वैराग्य आपण सर्वांस प्रेणादायी आणि प्रबोधन करणारे आहे येथे चनबसाप्पा हा कट्टर एकांतिक सांप्रदायिक पंथिक मनाभिमानाचे प्रतीक आहे सिद्धाप्पा हा उदार मतवादाचे प्रतीक आहे श्री स्वामींनी लीलेत वर्णन केलेला चमत्कार दाखवून त्याचा पूर्वग्रह नाहीसा केला तो श्री स्वामींचा एकनिष्ठ भक्त बनला त्यामुळेच त्याने श्री स्वामींस शिवलिंग पिंडीसह अर्पण केले श्री स्वामींनी ते बुधवार पेठेतील चोळाप्पा मठात स्थापन केले श्री स्वामी कृपेने त्यास मुलगाही झाला श्री स्वामींच्याच आज्ञेने त्याचे नाव मल्लिकार्जुन असे शिवस्वरुपाचेच ठेवण्यात आले पुढे चनबसाप्पाची श्री स्वामी कृपेने भरभराट होऊन राजदरबारी त्यास मानसन्माही मिळाला श्री स्वामी कृपेचा चनबसाप्पावर झालेला केवढा वर्षाव श्री स्वामी जेव्हा सदेह होते तेव्हा ठीक पण आता काय मैं गया नही जिंदा हूँ याची प्रचिती ते आजही त्यांची निरपेक्ष निर्मळ पवित्र आचार विचार आणि व्यवहाराने उपासना करणाऱ्यास देतात.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या