सुंदराबाईचा श्री स्वामी समर्थ सेवेत असताना पैसे मिळविण्याचा असा घाट होता की श्री स्वामी दर्शनास यात्रेकरू आले म्हणजे त्यांच्याकडून महाराजांच्या गंधास केशर पाहिजे बुडाखू पाहिजे कापूर पाहिजे बैलास पेंड पाहिजे नैवेद्यास साखर पाहिजे इ. अनेक बाबींसाठी श्री स्वामींच्या नावाने पैसे देत जर कोणी पैसे दिले नाही तर त्यास ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ द्यायची नाही ती नेहमी फाटके लुगडे नेसून लुगड्याकरीता पैसे मागायची यात्रेकरुंना तिची ही अवस्था पाहून दया येत असे बाई श्री स्वामी महाराजांची सेवा करीत आहे म्हणून लोक तिला पैसे देत असत पैसे मिळविण्याचा तिचा हा उद्योग सतत सुरू असे जिकडून साधेल तिकडून ती द्रव्य मिळवित असे तिने असे बरेच द्रव्य मिळविले होते.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
सुंदराबाई प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थांच्या सेवेत होती हेच तिचे परमभाग्य होते परंतु तिचे मूळ प्राक्तन इतके बाधित होते की तिला सेवेची संधी मिळूनही श्री स्वामींच्या कृपेचा चिरकालीन लाभ मिळवता आला नाही ती एकटीच होती तिला घर प्रपंच असा नव्हता श्री स्वामी सेवा एके सेवा हा सरळ मार्ग तिच्या पुढे उपलब्ध होता तशी ती परमभाग्यवान होती कैकयी रावण दुर्योधन आदि आपणास ज्ञात आहेत प्राक्तन म्हणा अथवा पूर्व कर्म म्हणा प्रदूषित असेल तर त्यास कोण काय करणार ते निष्काम सेवेने सौम्य करता येते अशावेळी परमेश्वर विविध माध्यमातून दृष्टांताद्वारे अथवा काही प्रसंगातून प्रबोधित करण्याचा अथवा सूचना देऊन सजग सावध अगर जागृत करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु अशा जिवांचे पूर्वकर्म प्रारब्धच इतके दूषित असते की त्यांना चांगले काही करु देत नाही तसे करण्याची बुद्धीच होत नाही श्री स्वामींना अनेकदा या ना त्या प्रकरणावरुन सुंदराबाईस सजग करण्याचा प्रयत्न केला प्रसंगी कठोर शब्दात तिला फटकारले सुद्धा भविष्यसूचक काही संकेतही दिले परंतु ती द्रव्यलोभात इतकी बुडालेली होती की कोणकोणत्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या नावे पैसे मागत होती ते सर्व वरील लीला भागात आले आहे सद्यःस्थितीत अनेक मठ मंदिर केंद्रे आश्रम धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्री पावलो पावली सुंदराबाईच्या वृत्तीचे दर्शन घडते अनुभवसुद्धा येतो तरीही आपल्यातील अनेक त्यास बळी पडतात परमेश्वर साधनेचा मंगलमय पवित्र उत्सव होण्याऐवजी बहुतेक ठिकाणी यात्रेकरुंच्या अज्ञानाचा श्रद्धेचा गैरफायदा घेऊन विविध मार्गाने लुटालूट केली जाते या सर्वाचे आकलन परिशीलन हाच या कथा भागाचा अर्थ भावार्थ मथितार्थ आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या