कर्नाटकातील श्रीधर नावाचा ब्राम्हण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापूरास सेवेकरता राहिला होता एके दिवशी त्यास श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यास सुंठ व सैंधव घालून भक्षण कर म्हणजे पोटशूळ शांत होईल असे यतिरुपधारी दत्तप्रभूंनी स्वप्नात सांगितले श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्यास कळेना म्हणून त्याने वैद्य व दुसऱ्या अनुभवी लोकांस विचारले पण त्यांनाही सांगता येईना म्हणून तो सचिंत होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असता पुन्हा त्यास स्वप्नदृष्टांत झाला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील दुसरे दिवशी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या पायावर डोके ठेवून हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहताच महाराज त्यास म्हणाले अरे निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून ते मिश्रण तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाईल श्री स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्याने औषध घेतल्यावर तो आठ दिवसांत बरा झाला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्रीधराच्या पोटशुळाची व्याधी म्हणजे कोणत्याही मानवी जीवाच्या वासनेचा ठणक बिंदू मानवी जीव स्थूल देहामार्फत विविध भोग भोगीत असतो ते भोगताना हे सर्व भोग क्षणिक असतात हे त्यास कळत नाही कारण तो भोगात मग्न असतो भोगासाठी तो चटावतो भोगातील आनंदासाठी तो पुन्हा पुन्हा आसुसतो पण अनंत प्रकारांनी भोग भोगूनही अतृप्तीचे दुःख मनात कायम असते उपभोगाच्या या क्षणिक आनंदा पाठोपाठ शेवटी तो रिता रिता होतो नंतर तो परमार्थाकडे शांती मिळवून देणाऱ्या उपासनेकडे वळतो त्याचे हे जे वळण तेच या कथेतील कर्नाटकातील श्रीधर ब्राह्यणाचे गाणगापूरास जाणे होय येथील उपासनेनंतर त्यास झालेल्या स्वप्नदृष्टांता आदेशानुसार सदगुरु श्री स्वामी समर्थांकडे जाण्याची प्रेरणा मिळते आता त्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दिसू लागल्याचे संकेत मिळतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे श्रीधर एक साधा सुधा तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव त्याचा पोटशूळ म्हणजे विविध वासनांचा ठणका उपासनेचे फलित म्हणून स्वप्नदृष्टांत त्याचे श्रीपुरीबद्दल अज्ञान पुन्हा दृष्टांत प्रत्यक्ष सदगुरुची भेटझाल्याने पोटशूळ बरा होतो म्हणजे त्याच्या वासनांचा बिमोड चित्तशुद्धी हीच मोक्षप्राप्ती यासर्व घटनाक्रमाच्या मथितार्थासाठी श्रीधर ब्राम्हणाच्या पोटशूळाची ही श्री स्वामी समर्थ लीला पण सद्यःस्थितीत माहिती तंत्रज्ञान विज्ञानाच्या कालखंडात पोटशूळावर अत्याधुनिक वैद्यकीय उपचार करावेत श्री स्वामींची उपासनाही करावी म्हणजे कार्य सिद्धी लवकर व उत्तम होईल.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या