चिंतोपंत आप्पा टोळाच्या घरी असताना श्री स्वामी समर्थांनी चमत्कारिक खेळाची सुरूवात केली ते गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे आणत व त्याचे वीत वीत लांबीचे तुकडे करीत त्यात माती भरुन दुसऱ्या लाकडांनी ठासीत असत मग पाच पाच सात सात तुकडे त्रिकोणाकृती ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवीत असत त्याचप्रमाणे घोंगडीच्या दशा काढून त्या दशा एक ठिकाणी गाठून त्याची रांग लावून ठेवीत असा त्यांचा क्रम सात महिने पावेतो चालला होता महाराज हे काय करता असा प्रश्न कोणी केल्यास पलटणी तयार करतो म्हणून महाराज जबाब देत महाराजांच्या या कृतीचा अर्थ कोणास कळेना पुढे सन १८५७-५८ साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बनवून नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले तेव्हा महाराजांच्या या कृतीचा अर्थ सर्वांस समजला व मोठे आश्चर्य वाटले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या खेळात श्री स्वामी समर्थांनी बंदुका तयार करताना एरंडाची लाकडे वापरली याचा मथितार्थ काय तर एरंड हे आतून पोकळ व तसे तकलादू लाकूड असते एका अर्थाने एरंड हे निरर्थक निरुपयोगी असते एरंडाचे गुर्हाळ हा वाक्यप्रचार सर्व परिचित आहे तशात वीत वीत पोकळ दांड्यात त्यांनी माती भरुन ठेवली होती श्री स्वामींच्या अशा स्वरुपाच्या बंदुका करुन पलटणी तयार करण्यामागे निश्चितच काही संकेत होते ते असे.

  • १) लवकरच युद्धाचा प्रसंग ओढवेल 
  • २) ज्या पलटणी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढण्यासाठी उभ्या केल्या जातील त्यांचे लष्करी सामर्थ्य एरंडाच्या लाकडाप्रमाणेच पोकळ व तकलादू असेल 
  • ३) ते विखरुन इतस्ततः मांडले होते यावरुन इंग्रजसत्ते विरुद्ध उठाव करणाऱ्या पलटणीचे सामर्थ्य विखुरलेले असेल त्यांच्यात एकजुटीचा नियोजनाचा आणि शिस्तीचा अभाव असेल ४) यामुळे त्या सर्व पलटणी निष्प्रभ ठरतील अखेरीस पराभूत होतील मातीला वा धुळीस मिळतील हे त्यात माती भरण्याच्या कृतीतून दाखविले आहे थोडक्यात म्हणजे हिंदुस्थानातील या पलटणीचे कार्य अखेरीस मातीमोल ठरेल श्री स्वामींनी सूचित केलेल्या संकेताप्रमाणे घडलेही तसेच हा इतिहास सर्वज्ञात आहे इंग्रज सैन्याने इ.स.१८५७ - ५८ च्या बंडाचा पाडाव केला तो होणार होता हे श्री स्वामींनी वरील स्वरुपाच्या खेळातून अगोदरच सूचित केले होते परंतु यातून कुणास बोध घेता आला नाही अनेकदा सदगुरु देव आपणास सजग सावध करण्यासाठी संकेत देत असतात परंतु ते ग्रहण करण्याची आपली क्षमता कुवत कमी पडते हेच श्री स्वामींच्या या लीलेवरुन अधोरेखित होते.


श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या