सोलापूरचे बापूराव हे भगवद् भक्त होते ते गाणगापुरास किंवा अक्कलकोटास जाणारा यात्रेकरू भेटल्यास त्याचे चांगले आतिथ्य करीत एकदा ते अक्कलकोटास जात असता दोन गृहस्थ भेटले त्यातील एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा दारिद्रयाने फार पीडलेला होता वाटेत जाताना पहिला गृहस्थ म्हणाला अवतारी आहे असे म्हणतात माझे वय चाळीस वर्षांचे असून माझेजवळ पैसेही पुष्कळ आहेत परंतु लग्न होत नाही दुसरा म्हणाला मला लिहिणे वाचणे वगैरे येत असूनही चाकरी मिळत नाही आमची कार्ये झाल्यास स्वामी अवतारी आहेत असे आम्ही म्हणू बापूरावांनी त्यांना सांगितले पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही तुम्ही काही तरी नवस करा हे ऐकून ते दोघे म्हणाले आमची कार्ये झाल्यास आम्ही श्री स्वामींची वारी करु इतके बोलून ते अक्कलकोटास गेले श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते तिथेही हात जोडून उभे राहिले तोच श्री स्वामी म्हणाले रंडी लेव तू एके ठिकाणी बैस संन्याशाची काय परीक्षा करतो लंडाची हे ऐकून ते दोघेजण थरथर कापू लागले मनात खूण पटताच ते दोघे श्री मुखावर स्वहस्ते मारुन घेऊन कानास दाबून चिमटे घेऊ लागले श्री स्वामींची वारंवार क्षमा याचना करु लागले तेव्हा श्री स्वामींनी त्या तिघासही प्रसाद आणि आशीर्वाद दिला दोन चार दिवस तेथे राहून ते आपापल्या गावी निघून गेले पुढे दोन महिन्याचे आत एकाचे लग्न झाले आणि दुसऱ्यास उत्तम रोजगार मिळाला तेव्हापासून ते स्वामीरायाची वारी करीत असत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेत बापूराव नावाचे साधे सरळ निरपेक्षवृत्तीने वागणारे श्री स्वामी समर्थांचे निष्ठावान सेवेकरी आहेत अक्कलकोट अथवा गाणगापूरला जाणाऱ्या गरजू यात्रेकरुंचे ते चांगले आतिथ्य करीत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनास जाणाऱ्या त्या दोघा यात्रेकरुंचे बोलणे ऐकून बापूराव त्यांना ऐकवतात पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही तुम्ही काही तरी नवस करा त्यांच्या या ऊदगारातूनच त्यांच्या वृत्तीतील जात कुळी लक्षात येते नवस बोलणे अथवा करणे ही एक कनिष्ठ दर्जाची उपासना का असेना पण त्यात देवाशी बांधिलकी असते देवाशी केलेला तो एक करार असतो सामान्य माणसाला भावणारी मानवणारी ती एक जनरीत आहे हेतू सफल होण्यासाठी देवाशी हा नवसाचा करार उपासक करीत असतात या कथेतील त्या दोघांनी आपला हेतू सफल झाल्यास अक्कलकोटची वारी करु असा नवस केला आपण यातून कोणता अर्थ बोध घेऊ शकतो बापूरावांसारखी वृत्ती अंगी बाणण्याची की त्या दोघां गृहस्थासारखी मनोवृत्ती निर्माण होणार नाही याची सध्या या जगात आपणास असेही काही लोक भेटतात की जे म्हणतात देव जर सर्वत्र आणि सर्वज्ञ आहे तर त्याला आमची दुःखे का कळत नाही त्यासाठी त्यास हाक का मारावी लागते त्याचा धावा का करावा लागतो आम्ही सुखात आहोत की दुःखात हे तो सर्वज्ञ आहे म्हणून त्यानेच जाणावे आम्ही दुःखात असल्यावर आपण होऊन धावत यावे आणि आम्हाला दुःखमुक्त करावे परंतु या अशा प्रकारची मनेधारणा असणे सर्वथा चुकीचे आणि कृतघ्नपणाचे आहे आम्ही देवासाठी काहीच करायचे नाही (अर्थात देवदेवतास कुणी काही त्यांच्यासाठी करावे अशी अपेक्षाही नसते) त्याने मात्र आमच्या मदतीसाठी सदैव तत्पर रहायचे हा कुठला न्याय अर्थात काही लोक देवभक्ती उपासना करतात पण १.ती मनापासून नसते २.ती हिशोबी मनात काही तरी इच्छा ठेवून केलेली असते ३.ती एखाद्या भयापोटी अथवा कोणत्याही प्रकारच्या असुरक्षिततेतून सुरक्षितता मिळावी म्हणून केलेली असते ४.ती निर्धाराने सातत्याने निर्मोहीपणे केलेली नसते अशी उपासना देवाकडे रुजूच होत नाही तर तिचे फळ कसे मिळणार मग देवालाच दोष देणार दुसरे काय करणार अशी दिखाऊ उत्सवी प्रदर्शनी भक्ती सध्या तरी फार ठिकाणी पाहावयास मिळते हे सर्व आपणास टाळता येणार नाही का येईल तसा जाणिवपूर्वक प्रयत्न करावयास हवा या लीला कथेतील एका जवळ भरपूर पैसाअडका असूनही त्याचे लग्न झाले नव्हते दुसऱ्याला लिहिता वाचता येत असूनही म्हणजे तो सुशिक्षित असूनही त्यास नोकरी नव्हती त्यांनी श्री स्वामी समर्थांचीच काय पण अन्य कोणत्याही देवदेवतेची उपासना केल्याचे दिसत नाही फक्त देव देवतांनी आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशा त्यांच्या वांझोट्या इच्छा होत्या त्यातही त्यांचा उद्दामपणा होता एक प्रकारची मग्ररी होती आमची कार्ये झाल्यास स्वामी अवतारी आहेत असे आम्ही मानू त्या ब्रह्यांड नायकास त्यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती पण अशी काही नमुनेदार अविवेकी काहीही न करता सर्व काही मिळावे अशी इच्छा असणारी माणसे या जगात तेव्हाही होती आताही आहेत देवालाही हे ठाऊक असते स्वतःच्या खात्यात उपासना रुपी पुण्याईची कोणतीही शिल्लक नसताना देवाकडून अपेक्षा देवावरच संशय देवालाच आव्हान पण त्यांच्याबरोबर असलेल्या बापूरावाने त्यांना कसे बजावले त्याचा सविस्तर उल्लेख वर आला आहे श्री स्वामी समर्थांनी अंतःसाक्षित्वाने त्यांचे हेतू जाणले होते जो अविवाहित होता त्यास रंडी लेव म्हणजे बायको मिळेल असा आशीर्वाद दिला दुसरा जो सुशिक्षित असूनही बेकार होता त्यास एके ठिकाणी बैस म्हणजे नोकरी मिळून स्थिर स्थावर होशील असा आशीर्वाद दिला पण या अगोदर बापूरावांबरोबर येताना त्यांनी श्री स्वामी समर्थांबद्दल जी मुक्ताफळे ऊधळली होती त्याबद्दल सर्वज्ञ श्री स्वामींस कळल्या वाचून का राहिले असेल श्री स्वामींनी त्या दोघांना अतिशय कठोर शब्दात सुनावले संन्याशाची काय परीक्षा करतोस त्यांच्या या सज्जड दमाने ते दोघेही थरथर कापू लागले पश्चात्तापाने स्वतःच्याच तोंडात मारुन घेऊ लागले ते भयचकित झाले पण पुढे श्री स्वामींच्या आशीर्वादाने त्या दोघांचे दोनच महिन्यात काम झाले परमेश्वर भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थ विश्व व्यापक आहेत ते सर्व काही जाणतात त्यांची परीक्षा पाहण्याइतके अथवा त्यांनाच आव्हान देण्या इतके वा त्यांच्यावर संशय व्यक्त करण्याइतके आपण मोठेही नाही आणि समर्थही नाही याची सुस्पष्ट समज देणारी ही लीला आहे अंतिमत श्री स्वामी समर्थ हे किती दयाळू करुणेचे सागर आणि क्षमाशील वृत्तीचे आहेत याचेही दर्शन या लीलेतून घडते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या