श्री क्षेत्र द्वारका येथे भुर्याबुवा म्हणून एक हटयोगी क्रिया करणारे वृद्ध सत्पुरुष होते त्रिकाल गोमतीचे स्नान करणे हा त्यांचा नित्य नियम होता द्वारकेस येणारे यात्रेकरू त्यांचे दर्शन घेत पौराणिक ग्रंथ किंवा वेदांत ग्रंथ यात कोणाला काही शंका असल्यास त्याचे ते निरसन करीत ते षडविकाररहित आणि आचार विचार संपन्न होते त्यांना श्री दत्तात्रयाचे दर्शनाचा ध्यास लागला होता त्याविना त्यांना चैन पडेना पुढे काही दिवसांनी समर्थांची स्वारी दत्तदिगंबररुपाने त्यांच्यापुढे उभी राहिली ती मूर्ती पाहून भुर्याबुवास समाधी लागली एक घटकेपर्यंत त्यांचे देहभान हरपले त्यांची काष्ठवत स्थिती झाली श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच ते शुद्धीवर आले त्यांनी श्री स्वामींस साष्टांग नमस्कार करुन त्यांची पुष्कळ स्तुती केली श्री समर्थ म्हणाले आता हटयोग सोडून आमच्या नामस्मरणात पुढील आयुष्य घालवून स्वस्थ बैस असे सांगून समर्थ तेथून निघून गेले श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे भुर्याबुवाने पुढील काळ श्री स्वामी समर्थांच्या भजनात घालविला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचा प्रभाव सर्वसामान्यां प्रमाणेच योगी हटयोगी स्वतःच्या तपोबळाने पराकोटीस पोहचलेल्या सिद्ध पुरुषांवरही होता हे श्री क्षेत्र द्वारका येथील भुर्याबुवाच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते स्वतः भुर्याबुवा हे हटयोगी वयोवृद्ध तपस्वी महान सत्पुरुष होते द्वारकेस येणारे यात्रेकरू त्यांचे न चुकता दर्शन घेत पौराणिक ग्रंथ किंवा वेदान्त ग्रंथावर असणाऱ्या शंका कुशंकांचे ते निरसन करीत ते षडविकाररहित शुद्ध आचार विचार संपन्न थोर योगी पुरुष होते त्यांना दत्तप्रभूंच्या दर्शनाची तीव्र आस लागली होती त्यासाठी ते बेचैन होते अशा भुर्याबुवास श्री स्वामी समर्थांनी दत्तप्रभूंच्या स्वरुपात दर्शन दिले त्या दर्शनाने बुवास समाधी लागली त्यांची काष्ठवत अवस्था झाली श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच त्यांची समाधी अवस्था भंग पावली नंतर श्री स्वामींनी त्यांना हटयोग सोडावयास सांगून त्यांचे नामस्मरण करण्याची उपासना सांगितली या लीलेवरुन आपणास असा मथितार्थ मिळतो की श्री स्वामी समर्थांच्या प्रभावास सामर्थ्यास कुणी म्हणून कुणाचाही अपवाद नव्हता याचा परिचय करुन देणारी ही लीला आहे म्हणूनच श्री स्वामी समर्थ योग्यांचेही योगी गुरुंचेही महागुरु होते याची खात्री पटते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या