आपण कोण हे वेळोवेळी महाराजांनी सांगितले तरीही लोक त्यांना त्यांचे नाव गाव विचारीतच मग महाराज कधी कधी मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे असे म्हणत असत.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

प्रत्येकाच्या शरीरात जो प्राण असतो तोच आत्मा जो आत्मा तोच राम म्हणजे तोच आत्माराम आत्माराम हा मूलतः निर्भेळ आणि अविकारी असतो म्हणून तो पवित्र असतो प्राणरुप शिव म्हणजे आत्माराम तो जेव्हा देहातून निघून जातो तेव्हा विद्यमान जीवाचा अंत होतो जे जे दिसते त्या सर्वांना चालना देणारा आत्मारामच असतो प्राप्त झालेला देह जगविण्यासाठी नाना प्रकारचे विषय विकार तोच आकर्षित करतो म्हणून तो कृष्णही होतो प्रत्येक देहात कृष्णाची प्रचिती विवेक आणि वासना रुपाने ये असते जीव आणि शिव जसे एकच राम कृष्णही एकच विवेक आणि वासनाही एकच एकाचीच ही दोन रुपे पुरुष आणि प्रकृती गूळ आणि गोडी ज्योती आणि ज्योतीचा प्रकाश पाणी आणि पाण्याची लाट हे एकच आहेत सगुणात ध्येय आणि ध्याता पूर्णतः वेगळे असतात ज्याचे ध्यान करावयाचे ते ध्येय व्यक्तिगणिक ध्येय म्हणजे ज्याच्या त्याचा देव वेगळा असू शकतो ध्याता म्हणजे ध्यान करणारा भक्त व्यक्ती ध्येय आणि ध्याता यानुसार वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे देव पण हे सगुणातच म्हणजे दृश्य स्वरुपात घडू शकते अनेक भक्त अनेक देव त्यात भेदभाव श्रेष्ठ आणि कनिष्ठावरुन वादविवाद असतात अर्थात ते चुकीचे आहे तसे निर्गुणाबाबत नसते तसे तर सर्वच जाती धर्म पंथाचे परमेश्वरी तत्त्व एकच आहे कुणाही (जाती धर्म पंथ वर्ण भेद आदि) माणसाच्या शरीरातून प्राण गेल्यावर खाली काय उरते तेथे भेदाभेद असतो का अजिबात नसतो खाली उरतो तो निष्प्राण देह सम सकला पाहू याच वृत्तीने ते सदैव वावरले अनेकांना त्यांनी उपासकांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळी दर्शने घडविली त्यांच्या पुढे विविध देव देवतांच्या प्रतिमा वा मूर्ती ते दर्शनार्थी पुढे शेवटी परमेश्वरी तत्त्व एकच म्हणून सांगत मीच राम मीच कृष्ण होतो बरे परमेश्वराचे शुद्ध निखळ स्वरुप निर्गुण निराकार तत्त्व एकच आहे ते कळण्यातच मानवी जीवनाचे कल्याण आहे श्री स्वामींच्या मीच राम होतो मीच कृष्ण होतो या उदगाराचा मथितार्थ व अर्थबोध हा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या