लक्ष्मण पंडितांनी हरिभाऊ तावडे व गजानन खत्री यांच्या हमीपत्रावर सही करुन ते तिघेही घरी आले त्यांनी पैशाची तजविज करण्याचे प्रयत्न सुरू केले गिरिधरलालच्या पेढीवरुन ईश्वर्या नावाचा मारवाडी आठव्या दिवशी पंडिताच्या घरी येऊन पंडिताची चौकशी करु लागला त्याने दोन तीन खेपा पंडिताच्या घरी घातल्या परंतु पंडिताची भेट झाली नाही मग हरिभाऊस ईश्वर्या मारवाड्याने सांगितले अफूचे व्यापारात दोन हजार रुपये नवीन सही करणारा पंडित यांच्या नावावर आले आहेत ते घेण्यास त्यास बोलाविण्यास पंडिताच्या घरी गेलो परंतु तो भेटला नाही करिता तुम्हाकडे आलो आहे तिघांनी पेढीवर येऊन दोन हजार रुपये घेतले त्या तिघांनाही खूप आनंद झाला त्यांनी निश्चय केला की यातील रक्कम अक्कलकोटास जाऊन आल्याशिवाय खर्चावयाची नाही आणि आपण नवस केला त्याप्रमाणे आपल्यास आठ दिवसाच्या मुदतीत दोन हजार रुपये मिळाले हाच त्याचा अनुभव निश्चय केल्याप्रमाणे लक्ष्मण पंडित हरिभाऊ तावडे आणि गजानन खत्री अक्कलकोटास गेले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले तो महाराज व्यापार केला तोटा आला मला नवस केला दोन हजार रुपये नफा झाला हे ऐकून त्या तिघांनाही आश्चर्य वाटले.
अर्थ भावार्थ मथितार्थ
लक्ष्मण पंडितांनी गोविंदरावांसमक्ष श्री स्वामी समर्थांस नवस केला की आठ दिवसांत श्री स्वामींच्या कृपेने जर आपण कर्जमुक्त झालो तर अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी चरणाचे दास होऊ पुढे आठ दिवसात आश्चर्यकारकरित्या त्यांना व्यापारात नफा होऊन त्यांचे कर्ज फिटले श्री स्वामी समर्थांचे नियोजन प्रयोजन याचा प्रत्यय या लीला भागात येतो ईश्वर्या नावाचा मारवाडी पंडिताकडे आला जामीन म्हणून सही करणाऱ्याच्या नावे दोन हजार रुपये आले असे त्यास सांगितले पंडिताला श्री स्वामींचा हा रोकडा अनुभव आला त्या दोन हजार रुपयांमुळे हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित हे तिघेही ऋणमुक्त झाले ही सर्वच किमया कशी घडली कोणी घडविली अर्थातच श्री स्वामी समर्थांनी श्री स्वामींनी त्यांचे काम केले आता श्री स्वामींशी केलेला वायदा पाळण्यासाठी ते तिघेही अक्कलकोटास आले श्री स्वामींचे दर्शन घेऊन महाराजांपुढे उभे राहताच श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले व्यापार केला तोटा आला मला नवस केला दोन हजार रुपये नफा झाला ते तिघेही काय समजायचे ते समजून गेले प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज ईश्वर मारवाड्याच्या रुपाने आले याची त्यांना खात्री पटली लक्ष्मण पंडितासह ते दोघेही श्री स्वामीचरणी लीन झाले आजही श्री स्वामी समर्थ कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून अनेकांना सहकार्य करीत असतात त्या संबंधात डॉ.वि.म.भटांनी योग सिद्धी व साक्षात्कार या ग्रंथात पृ.३८९ माझा ह्रदयरोग यात व वैद्यांच्या श्री स्वामी समर्थ कोषात प्रचितीचे बोल यात अशा विविध ठिकाणी चिकित्सक अभ्यासू विद्वानांनी आपली मते नोंदविली आहेत श्री स्वामींचे आद्य चरित्रकार ना.ह.भागवत हे कमालीचे नास्तिक होते तरीही श्री स्वामी चारित्र्य लिहिण्यास का उद्युक्त झाले (इ.स.१८७९) ते त्यांनी प्रांजळपणे सांगितले आहे मुख्य मुद्दा व त्याचा मथितार्थ हाच आहे की श्री स्वामी चांगल्या गोष्टीस विविध माध्यमे प्रसंगाद्वारे सदैव मदतच करतात श्री स्वामींच्या व्यक्तिगनिक क्लृप्त्या वेगवेगळ्या असतात त्या समजण्यास या आकलनास आपल्या गाठी थोडे तरी पुण्यकर्म सतत वाढता ठेवावा लागतो अनेकदा कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचा योग्य समन्वय साधून सदसदविवेकाने प्रपंच करावा लागतो तो करताना श्री स्वामीप्रती सतत साक्षीभाव ठेवावा लागतो प्रपंचात अडीअडचणी दुःख खाच खळगे येतच असतात येत राहणार परंतु श्री स्वामी त्यातून निश्चित तारुन नेतील हा दृढविश्वास असावा लागतो कदाचित एखाद्या गोष्टीस उशीर होईल पण अंतिम सुख समाधान निश्चित नवस (वायदा) आणि दृढविश्वास यात फरक आहे इच्छित कार्य झाले नवसाची (वायद्याची) पूर्तता केली नवस फेडला की देव विस्मृतित जातो पण मनाशी पक्का दृढ निश्चय असेल तर देव कायम स्मरणात राहतो येथे आपणास दृढ निश्चय करण्याचा बोध घ्यायचा आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या