जमिनीवर निश्चेष्ट होऊन पडलेला संन्यासी थोड्या वेळाने सावध होऊन म्हणू लागला अक्कलकोट स्वामी भला स्वामी सच्चा है असे काहीसे बडबडत त्याने तो दगड गंगेत टाकला आणि गंगेत स्नान करुन तो शांत झाला नंतर त्या दोघांना हाका मारुन तुम भी स्नान करो त्याचे हे नम्र शब्द ऐकून त्यांनी स्नान केले नंतर त्यांना अच्छा आव सेवाधारी असे म्हणून त्यांना त्याच्या बिर्हाडी घेऊन आला त्याला पश्चात्ताप होऊन त्या दोघांजवळ तो बसला तेव्हा वामनबुवा त्यास म्हणाले ज्या दिवशी अक्कलकोट स्वामी पाहू त्या दिवशी भोजन करु नंतर त्याने विचारले तुम्ही अक्कलकोटास केव्हा जाणार आहात वामनबुवा उत्तरले आम्ही बडोद्यास जाऊन मग अक्कलकोटास जाऊ संन्याशाने त्यांचा पत्ता लिहून घेतला व जे काही अक्कलकोटास होईल ते तुम्हास बडोद्यास लिहून कळविन असे वचन दिले नंतर तो संन्यासी म्हणाला ज्यांच्या श्रवणाने माझ्यासारख्या नीच मदोन्मत्ताला पश्चात्ताप होऊन शांती प्राप्त झाली त्या महतपुरुषाच्या प्रत्यक्ष दर्शनाने काय न होईल दुसरे दिवशी तो रामचरण नावाच्या शिष्यास बरोबर घेऊन अक्कलकोटास गेला जे काय घडले ते त्याने बडोद्यास लिहून कळवले.
अर्थ भावार्थ मथितार्थ
किमयागार संन्याशी शुद्धीवर आल्यानंतर अक्कलकोटचे स्वामी भले आहेत सच्चे आहेत असे म्हणू लागला श्री स्वामींचे महात्म्य आणि सामर्थ्य त्याला समजले त्याला श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती आली म्हणून आता त्याचे कर त्यांच्या चरणाशी जुळले होते त्याने मारण्यास घेतलेला तो दगड गंगेत टाकला त्यानेही गंगेत स्नान केले त्याच्यात आता परिवर्तन झाले होते उन्मत्तपणाची जागा आता नम्रतेने घेतली होती त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता हे त्याच्या कृतीतून व बोलण्यातून जाणवत होते वामनबुवा जेव्हा त्यास प्रसाद भोजनाबाबत विचारीत होते तेव्हा त्याने अक्कलकोट पाहिल्यावरच भोजन करु असे निश्चयपूर्वक सांगितले निश्चयाच्या बळाला नेहमीच चांगली फळे येतात त्याने अक्कलकोटला जे काय घडेल ते वामनबुवास कळवण्याचे सांगून तो त्याचा शिष्य रामचरण याचे बरोबर अक्कलकोटला लगेच जाण्यास निघाला श्री स्वामींची किमया कशी होती याची प्रचिती त्या किमयागार संन्याशामध्ये झालेल्या परिवर्तनातून लक्षात येते श्री स्वामी समर्थांना त्याची किमया का काढून घ्यावी लागली तर त्या संन्यासी किमयागाराने त्याच्या उद्धट आणि उद्दामपणाची परिसीमा गाठली होती ही लीला जेव्हा गंगातिरी नाशकात घडली तेव्हा महाराज अक्कलकोटात होते यावरुन श्री स्वामी समर्थ हे संपूर्ण विश्वात कणाकणात चैतन्यरुपाने सर्वत्र असतात याचा बोध व्हावा शरणागतास तर ते सदैव अभय देतात व सन्मार्गास लावतात याचे किमयागार संन्यासी हे ठळक उदाहरण आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या