एका वाईकर ब्राम्हणाने श्री स्वामींस आपणास एकाने फसविल्याबद्दल सांगितलेली हकिकत अशी काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला अनुष्ठानाची समाप्ती करुन श्री दत्त प्रित्यर्थ ब्राम्हण भोजन घालण्याचा त्याने बेत केला त्याचेजवळ पैसे नव्हते आपणाकडून त्याने समाराधनेबद्दल पंचवीस रुपये घेतले एक दोन दिवसात हुंडी आल्यावर रुपयांची फेड करीन असे तो म्हणाला समाराधना पार पडल्यावर रात्री त्या ब्राम्हणाने पोबारा केला माझे गरीबाचे रुपये बुडविले वाईकर ब्राम्हण आणखी म्हणाला महाराज मी आपल्या नावावर रुपये दिले त्याची अशी अवस्था व्हावी काय यावर महाराजांनी काही उत्तर दिले नाही दर्शनाकरता जमलेल्या गर्दीतील एका गृहस्थाकडे महाराजांनी बोट दाखविले त्याकडे त्या ब्राम्हणाने पाहताच त्याला फसविणार्याला ओळखून वाईकर ब्राम्हणाने त्याचा पदर धरला (पकडले) दोघांची बाचाबाची झाली शेवटी त्याने लबाडी कबुल केली त्याचेजवळ रोख पैसे नव्हते म्हणून गोविंदराव टोळ व दुसऱ्या दोन लोकांनी मध्यस्थी करुन पकडलेल्या ब्राह्यणाजवळील सकलातीची मोठी टोपी वाईकर ब्राम्हणास देऊन त्याची समजूत केली वाईकर ब्राम्हणाने महाराजास प्रार्थना केली की महाराज आपल्या कृपेने माझे रुपये मला मिळाले त्याचे काय करायचे त्याबद्दल आज्ञा व्हावी त्यावर महाराज उत्तरले आम्हास ठाऊक नाही आल्या वाटेने जा वाईकर ब्राम्हण निघून गेला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीला कथेतील वाईकर ब्राम्हण दत्तसेवेसाठी गाणगापूरात राहिला होता त्याच्या सेवेचे फळ देण्यासाठी भगवान दत्तप्रभूच अनुष्ठानी बुवाच्या स्वरुपात आले होते त्याची परीक्षा घेण्यासाठी बुवाने अनुष्ठानाच्या समाप्ती सांगतेसाठी पंचवीस रुपये वाईकर ब्राह्यणाकडून घेतले होते ते हेतूतःबुडवून बुवा गायब झाले होते हा इथला भावार्थ आहे या प्रसंगात दत्तसेवा करणाऱ्या वाईकरा सारखे लोक तेव्हाही होते आणि आताही आहेत वृत्ती प्रवृत्ती या कालातीत असतात त्या कमी जास्त असतात इतकेच वाईकर ब्राम्हणाने अनुष्ठानीबुवास श्री दत्त प्रित्यर्थ ब्राह्यणभोजन घालण्यासाठी म्हणजे देवकार्यासाठी खर्च करण्यासच पैसे दिले होते वाईकर स्वतः दत्तउपासक होते त्यामुळे ते पैसे बुडाल्याचे दुःख होण्याचे त्यांना तसे काहीच कारण नव्हते तरीही ते हळहळत होते थोडक्यात काय तर त्याला देवापेक्षाही पैसा मोठा व प्रिय वाटत होता त्याच्या अशा वृत्तीचा अतिरेक म्हणजे त्याने श्री स्वामी समर्थांना सांगितले महाराज मी आपल्या नावावर रुपये दिले त्याची अशी अवस्था व्हावी काय अध्यात्मातला अथवा परमेश्वर सेवेतला अविवेक आणि मूर्खपणा तो असा आपण कोणाकडे कोणती तक्रार गुदरवितो आहोत याचा साधा पाचपेच त्या वाईकर ब्राह्यणाजवळ नव्हता तो पूजाअर्चा मात्र करीत होता सारेच अविवेकी आणि वरवरचे होते या सर्व घटनांचा मथितार्थ कसा लावता येईल?
१)सकाम उपासनेच्या पलीकडे निष्काम उपासना असते आणि ती सर्वश्रेष्ठ असते हे त्या वाईकर ब्राम्हणास उमजले नव्हते २)अनुष्ठानी बुवाने पैसे उसने घेण्याचे कारण वाईकर ब्राह्यणास कळलेच नाही अनुष्ठानी बुवाच्या रुपात दत्तप्रभूच भेटले याची त्यास जाणीव झाली नाही ३)वास्तविक ते पंचवीस रुपये सत्कारणी एका धार्मिक कार्यास अनुष्ठानी बुवाच्या रुपाने खर्च झाले हे समजण्याची त्याची आध्यात्मिक परिपक्वता नव्हती ४)वाईकर ब्राम्हण उपासना करताना देवाचे स्वरुप त्याची अथांगता विविधता आणि व्यापकता अंतरमनाने समजावून न घेता त्याचे मन पैसे बुडवल्याच्या आसक्तीत गुंतवून तो बाह्यात्कारी दिखाऊ उपासना करीत होता या आसक्तीतूनच त्याने प्रत्यक्ष परमेश्वर स्वरुप असलेल्या श्री स्वामी समर्थांसमोर त्यांनी निर्देशित केलेल्या माणसास पैसे बुडविणारा तो हाच असे समजून त्याच्याशी हुज्जत घातली त्याच्या जवळ असलेल्या जिनसा घेतल्यावरच वाईकराचे पैसे मिळाल्याचे समाधान झाले श्री स्वामी समर्थांनी तो अनुष्ठानी बोटाने निर्देशित केला खरातर देव त्याला श्री स्वामींनी या निमित्ताने बोटाने निर्देशित करुन पुन्हा भेटविला होता पण उथळ बाह्यात्कारी उपासना करणाऱ्या वाईकराला आसक्तीच्या अंधपणामुळे त्या गृहस्थाच्या स्वरुपातील दत्तप्रभू दिसलेच नाहीत समजणे ओळखणे ही तर फार दूरची गोष्ट अशा त्या प्राप्त झालेल्या पैशाचे काय करावे म्हणून त्याने श्री स्वामींस विचारल्यावर आम्हास ठाऊक नाही आल्या वाटेने जा असे त्यांनी त्यास रोख ठोक उत्तर दिले जशी भक्ती तशी प्राप्ती या वचनानुसार पुन्हा वाईकर ब्राह्मण आसक्तीचा प्रपंच करण्यास निघून गेला कोणत्याही स्वरुपाची अतिरेकी प्रापंचिक आसक्ती इच्छा माणसाला दरिद्री भिकारी बनविते प्रपंच करता करता परमार्थही करावा प्रपंचात असावे पण त्यात गुंतून पडू नये आसक्ती गुंतावयास लावते तेच वाईकर ब्राम्हणाच्या बाबतीत घडले आता आपण कसे वागायचे ते आपणच ठरवायचे आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या