एकदा एका थोर घराण्यातील बाई पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून श्री स्वामी समर्थांकडे अक्कलकोटास आली तिच्या बरोबर तिच्या दास दासी सेवकजन पुष्कळ होते त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली त्या थोर घराण्यातील बाईकडे पाहत महाराजांनी सांगितले अगं मजजवळ कशाचा मुलगा तो तुझा यार बसला आहे तो तुला मुलगा देईल सदर गृहस्थाचा व या बाईचा फंद असल्याचे मग कळून आले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांच्या सर्वसाक्षी ज्ञानावर त्यांच्या परखड रोख ठोक स्वभावावर प्रकाशझोत टाकणारी ही घटना आहे डोळे मिटून दूध पिणार्या मांजराला अनेकदा वाटतं की आपणास कुणीच बघत नाही परंतु जेव्हा त्याच्या पेकाटात काठीचा तडाखा बसतो तेव्हा ते हेलपटतं म्यॉव म्यॉव करीत पळत जातं तसेच आपले उपासकांचे होत असते अनेकदा आपण आपले स्वतःचेच स्वतः परखड त्रयस्थपणे आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण न करता आपण खूप चांगले सज्जन आहोत अशी स्वतःचीच समजूत करुन घेतो इतर लोकांस आपण बाह्यात्कारी तसे दाखवण्याचा खटाटोप करीत असतो पण खरेच आपण तसे असतो का असली आणि नकली असे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि आचार विचारांचे दोन भाग असतात पण आपण सदैव खोटे मुखवटे धारण करुन स्वतःसाठी नव्हे तर समाजाने आपणास चांगले सज्जन म्हणावे म्हणून तसे वागत असतो नटवी नाटकी माणसे अनेकदा फसवी आणि खोटी असतात याचा विसर तुम्हा आम्हास पडतो म्हणून अनेकदा आपली फसगत होते पुत्रप्राप्तीच्या आसक्तीने अंध झालेल्या त्या बाईचा असा समज होता की श्री स्वामींना आपले व्यभिचारी कृत्य काय माहीत असणार म्हणून मोठ्या थाटामाटात डामडौलात दास दासी सेवकांसमवेत ती थोर घराण्यातील बाई श्री स्वामी समर्थांसमोर आली श्री स्वामी आपल्या या देखाव्यास दिपून जातील प्रभावित होतील असे तिला वाटले खुळी अज्ञानी बिचारी तसे काहीही घडले नाही उलट श्री स्वामींनी सर्वांसमक्ष कठोर वाणीत तिला सांगितले अगं मजजवळ कशाचा मुलगा तो तुझा यार बसला आहे तो तुला मुलगा देईल या परखड वाणीने तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पना सहज येण्यासारखी आहे स्वतःच्या अज्ञानामुळे अथवा जाणून बूजून धारण केलेल्या अज्ञानामुळे आपण देवाला फसवित आहोत हे तिच्या लक्षात आले नाही हेच तुमचे आमचे अज्ञान आहे देवाची काठी दिसत नाही पण तिचा मार मात्र बसतो याची जाणीव होणे हा इथला अर्थबोध आहे उपासनेत शुद्ध चारित्र्याला किती महत्त्व असते याची कल्पनाही येते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या