एकदा संकेश्वर मठाचे श्रीमत शंकराचार्य फिरत फिरत अक्कलकोटी आले श्रीमंत मालोजीराजांनी जगदगुरुंची सर्व व्यवस्था चोख ठेवली होती त्यांच्या भोजन पंक्तीस मोठ मोठे विद्वान पंडित ज्योतिषी इत्यादी ब्राम्हण होते जगदगुरुस उत्तम उच्च सिंहासनावर बसवू त्यांची षोडशोपचारे पूजा करण्यात आली हा सर्व समारंभ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थांची स्वारी चोळाप्पासह तेथे आली मात्र त्याठिकाणी श्री स्वामींचे कोणीही आदरतिथ्य केले नाही अथवा त्यांना बसण्यास आसन दिले नाही परंतु तेथे असलेल्या एका वृद्ध ब्राम्हणाने श्री स्वामींस हात धरुन पाटावर बसविले तेव्हा पंक्तितील असलेले सर्व आपापसात कुजबूज करु लागले की हे संन्यासी पाहिजे त्याकडे अन्न खातात करीता त्यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेवा भोजनापूर्वी संकल्प सुटण्याची वेळ आली सर्वजण पात्रावर बसले तोच पक्वान्नांनी वाढलेल्या त्या पात्रात अन्नाऐवजी किडे सर्वत्र दिसू लागले हे पाहून सर्वजण चकित झाले हे अदभुत काय झाले असा विचार करता त्यांनी त्या वृद्ध ब्राम्हणास विचारले त्याने सांगितले की प्रत्यक्ष दत्ताचा अनादर झाला म्हणून असे झाले!.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

हे शंकराचार्य संकेश्वर मठाचे मठाधिपती होते त्यांचे स्थान निश्चितच पूजनीय आणि वंदनीय होते परंतु त्यांच्या भोवती त्यांचा वृथा उदोउदो करणाऱ्यांचे कोंडाळे जमा झाले होते त्यातील बहुतेक भोजनभाऊ होते त्यांना धर्मनीती आदिंशी काही घेणे देणे नव्हते शंकराचार्य हे अशा लोकांमध्ये गुरफटले गेले होते वेदविहित धर्माचरणाचा पुरस्कार करणारे ते होते सर्वमान्य अशा गुरुपिठाचे परंपरेनुसार ते पिठाधिपती होते त्यामुळेच अक्कलकोटच्या श्रीमंत मालोजीराजाने त्यांची सर्व प्रकारे चोख व्यवस्था ठेवली होती शंकराचार्यांसारखी व्यक्ती गावात येणार म्हटल्यावर राजाने व राजाच्या कारभार्यांनी राजशिष्टाचारानुसार श्री स्वामी समर्थांची शंकराचार्यांबरोबर भेट ठरविणे आवश्यक होते निदान शंकराचार्यांना श्री स्वामी समर्थांविषयी कल्पना द्यावयास हवी होती श्री स्वामी महाराजांना सन्मानपुर्वक शंकराचार्यांच्या स्वागत समारंभाकडे न्यावयास हवे होते अथवा त्यांना श्री स्वामी महाराजांच्या भेटीस आणावयास पाहिजे होते पण यांपैकी काहीही करण्यात आले नाही परंतु श्री स्वामी समर्थ शंकराचार्यांचे पिठासीन म्हणून महत्त्व आणि परंपरा जाणून होते स्वतःचे ब्रम्हांड नायकत्व बाजूला ठेवून मनाच्या मोठेपणाने रितीरिवाज पाळण्याच्या हेतूने जगदगुरु शंकराचार्यांचा मान राखण्यासाठी श्री स्वामी स्वतः तेथे आले परंतु मान सन्मान घेण्याच्या गडबडीत सभोवतालच्या उत्सवी आणि स्वागतशील वातावरणामुळे जगदगुरु शंकराचार्यांचेही लक्ष श्री स्वामी महाराजांकडे गेले नाही तेथे जमलेल्या सर्वांनीच श्री स्वामींकडे दुर्लक्ष केले तरीही ते चकार शब्द बोलले नाहीत त्यांचे कुणी आदरातिथ्य केले नाही याबद्दलही त्यांची काही तक्रार नव्हती मात्र पंक्तीत असलेले मोठ मोठे विद्वान ब्राम्हण पंडित ज्योतिषी आदिंना श्री स्वामींचे पंक्तीत बसणे रुचले नाही ते आपापसात श्री स्वामींविषयी कुजबूज करु लागले की हे संन्यासी (श्री स्वामी समर्थ) पाहिजे त्याकडे अन्न खातात करिता यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेवा तेव्हा मात्र श्री स्वामींनी त्या उथळ लोकांच्या वर्तनाचा बुद्धीचा झालेला कडेलोट पाहून चमत्कार दाखवला पंक्तीत बसलेल्या त्या सर्वांच्याच पात्रात वाढलेल्या पक्वांन्नाऐवजी किडे बुजबुजू लागले श्री स्वामींना हा चमत्कार का करावा लागला तो करण्यास कोणी भाग पाडला तसल्या वृत्तीचे दृढ्ढाचार्य विद्वान मठाधिपती आजही आहेत रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणणारे किती श्री स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून जगणारे आणि तसे वर्तन करणारे किती या सारख्या प्रश्नांची उत्तरे त्याचा अर्थ मथितार्थ आपण शोधायचा आहे त्यातून बोध घ्यायचा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या