शृंगेरी मठाचे शास्त्री श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटी आले श्री स्वामींच्या बालचेष्टा पाहून ते बावडेकर पुराणिकास म्हणाले अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहिला यांच्याजवळ तुमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही याकरिता आमच्याजवळ राहल तर तुम्हास शास्त्र शिकवू असे शास्त्राचे भाषण ऐकताच बावडेकर पुराणिक त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले ही हकीकत समर्थांनी अंतःसाक्षित्वाने जाणून रात्री बावडेकर झोपले असता महाराज दरवाजाजवळ येऊन दरवाजास हात लावताच दरवाजाची कडी पडून दरवाजा उघडला पुराणिक जागे झाले पाहतात तो श्री स्वामी समोर उभे पुराणिकांनी श्री स्वामींचे चरण धरले तेव्हा महाराज म्हणाले अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार असे पाहा की ह्या शास्त्र्यांनी कामादी षडरिंपूस जिंकले आहे काय असे सांगून समर्थ एकाएकी गुप्त झाले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
बावडेकरांचा आणि श्री स्वामींचा निकटतम सहवास होता बावडेकर स्वतः चांगले विद्वान व पट्टीचे प्रवचनकार होते श्री स्वामी समर्थ हे साक्षात परमेश्वराचे स्वरुप आहे याचा त्यांनी अनुभवही घेतला होता आणि मनोमन तसे मान्यही केले होते एवढे सर्व असूनही जेव्हा शृंगेरी मठाच्या शास्त्र्याचे श्री स्वामीं विषयीचे उदगार पुराणिकाने निमूटपणे ऐकून घेतले त्या शास्त्र्याशी त्याबाबत कोणताच प्रतिवाद केला नाही अथवा त्यास असे बोलण्यास रोखले नाही पुराणिक बुवांच्या या विद्वत्तेस काय म्हणावे कोणत्या स्वरुपाची ही विद्वत्ता म्हणायची वास्तविक पुराणिक बुवास श्री स्वामींनी काय दिले नव्हते तरीही आमच्या जवळ राहाल तर तुम्हास शास्त्र शिकवू या त्या शृंगेरी मठातील शास्त्रीबुवांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले वास्तविक शास्त्री आणि पुराणिकबुवांची अल्पकालीन एकच भेट होती तरीही पुराणिक डळमळीत अस्थिर झाले येथे शृंगेरीच्या शास्त्रीबुवांबद्दल तुम्हाला तक्रार करण्यास अथवा त्यास नावे ठेवण्यास खूपच कमी वाव आहे कारण ते प्रथमतःच श्री स्वामींस पाहत होते श्री स्वामींस जाणून न घेता अथवा त्यांच्यासंबंधी इतरांकडून माहिती न घेता अगर स्वतः अनुभूती न घेता मत व्यक्त करणे हे त्यांच्या शास्त्रीपदास न शोभणारेच आहे कुठल्या बाबीचा सर्वांगीण सारासार विचार करुन अनुभव घेऊन मत बनवणे हा बोध येथे मिळतो एखाद्या अडाणी अशिक्षिताकडून असे मत व्यक्त झाले तर ते एक वेळ क्षम्य असते पण शास्त्री तेही शृंगेरी मठाचे पुराणिकबुवांचे जाण्यास तयार होणे हे त्यांच्या लौकिकास श्री स्वामींच्या सहवासात सेवेत राहाणार्यांस निश्चितच भूषणावह नाही समाजात सद्यःस्थितीतही शास्त्रींच्या आणि पुराणिकांच्या वृत्तीची माणसे आपणास आढळतात कधी कधी तुम्ही आम्हीही तसे वागतो तर तसे न वागता सारासार विचार करुन अनुभव घेऊन मत व्यक्त करावे निकटचा सहवास सोडून म्हणजे काहीही अनुभव न घेता हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे ही सर्वथा मोठी चूक आहे हा बोध यातून मिळतो.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या