एकदा श्री स्वामी समर्थ व राज असे उभयता राजवाड्यातील देवघरापुढे असलेल्या झोपाळ्यावर बसले दोघांच्या काही गोष्टी चाचल्या होत्या देवघरात आप्पा सलबते पुजारी गंध उगाळीत होता तेव्हा एक उंदीर तेथे येऊन निरांजनातील वाती खाऊ लागला तसा तो उंदीर नेहमीच निरांजनातील वाती खात असे त्यामुळे पुजारी आप्पाचा उंदरावर राग होताच त्या दिवशीही उंदीर वाती खात असल्याचे बघताच आप्पाने राग येऊन त्या उंदरावर हातातील खोड फेकले त्यासरशी उंदराचा प्राण गेला मग आप्पा पुजारी उंदराचे शेपूट धरून त्यास बाहेर टाकण्या करिता निघाला श्री स्वामी समर्थांनी ते पाहताच आप्पास उंदीर इकडे आण म्हणून सांगितले आप्पाने तो मृत उंदीर श्री स्वामींजवळ दिला श्री स्वामींनी त्या मृत उंदरास झोपाळ्याच्या कड्यातून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी पाच दहा वेळा काढ घाल केली मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव असे त्यांनी म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताडकन उडी मारुन बिळात पळून गेला श्री स्वामींची ही लीला पाहून राजास चमत्कार वाटला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

एकेदिवशी श्री स्वामी समर्थ राजवाड्यात आले सर्वांनाच आनंद झाला मालोजीराजांनी सामोरे येऊन त्यांना मोठ्या सन्मानाने देवघरासमोरच असलेल्या झोपाळ्यावर बसविले स्वतः नम्रपणे त्यांच्या समोर उभे राहिले देवघरात पुजारी आप्पा सलबत्यांची पूजा चाचली होती तो सहाणेवर चंदनाच्या खोडाने चंदन उगाळत होता तेव्हा तेथे एक उंदीर आला आणि निरांजनातील तुपाने भिजलेल्या फुलवाती खाऊ लागला आप्पा पुजार्याने ते पाहिले देवघरातील बरेच पदार्थ उंदीर अलीकडे वारंवार खातात याचा त्यास अगोदर पासून राग होताच त्या रागाच्या भरातच त्याने त्याच्या हातातील चंदनाचे खोड त्या उंदराकडे फेकून मारले फटका वर्मी लागून उंदीर जागच्या जागी गतप्राण झाला प्रत्येक जीवास जन्म आणि मृत्यूच्या साखळीतून जावेच लागते जन्मानंतर मृत्यू तसा मृत्यूनंतर जन्म ठरलेला असतो येथे आप्पा पुजार्याने उंदीर मारला तो त्या उंदराचा अपमृत्यू होता मृत उंदीराच्या अन्य साथीदारांनी तो मृत्यू पाहिला भेदरून ते सर्व पळून गेले श्रीगुरुलीलामृतकार वामनबुवा वैद्य यांनी याबाबत सांगितलेल्या श्लोकाचा सारांश असा देवा आम्हाला दुःख झाले आपण आम्हाला या मूषक योनीत का जन्माला घातले आमचा असा हा चोर स्वभाव आम्ही लोकांना फार उपद्रव देतो म्हणून ते आमचा जीव घेतात खाणे नाश करणे फोडणे कुरतडणे या आमच्या जन्मजात स्वभावामुळे आम्ही दुःख भोगतो आम्ही कुणासही उपद्रव देतो त्रासवितो अशा आम्हा दुष्ट ओढाळ चोरांना ईश्वरा तुजविण कोण सांभाळील 

(अ.४८ श्लो.१४९ ते १५२ पृ.५९५ आ.१९ सप्टें २००८) मूषकांच्या या प्रार्थनेची दखल दयाघन श्री स्वामींनी घेतली मृत उंदराला शेपटीस धरून बाहेर फेकण्यास निघालेल्या पुजारी आप्पा सलबतेच्या कृतीकडे श्री स्वामींचे बारीक लक्ष होते त्यांनी पुजार्याकडून तो मृत उंदीर घेतला झोपाळ्याच्या कडीतून इकडून तिकडे व तिकडून इकडे पाच दहा वेळा काढ घाल केली तुजला काय झाले म्हणून उंदराच्या कानी श्री स्वामी वदले बच्चा जाव असे ते म्हणताच तो उंदीर तत्काळ जिवंत झाला ताडकन उडी मारुन बिळात पळून गेला देव आणि गुरु तळमळून जिवाच्या आकांताने केलेल्या प्रार्थनेला वा विनंतीला प्रतिसाद देतात मदतीला धावून येतात हे उंदरांच्या वरील प्रार्थनेवरुन लक्षात येते त्याचप्रमाणे मूषकासारखी उपद्रवी नाशकारी दुष्ट ओढाळ इतरांना त्रासविणारी वृत्ती सोडली पाहिजे अन्यथा त्या मूषकासारखा अपमृत्यूही ओढवतो हा ही मथितार्थ येथे अधोरेखित होतो 

"आम्ही लोकांसि देतो फार उपद्रव  !!
खातो नाशितो फोडितो !
या जन्म स्वभावे आम्ही दुःख भोगितो !!
अन्यायावाचूनि उपद्रव देतो !
त्रासवितो सर्व लोकांसि !!"

असेच तुमचे आमचे बहुतेकांचे वर्तन अनेकदा असते फरक इतकाच की ते उंदीर मूषक योनीतील व आपण मानव योनीतील आता यातून कसा बोध घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या समजदारीच्या मगदुरावर अवलंबून आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या