एकदा श्री समर्थांची स्वारी सेवेकर्यांसह वाडी गावी गेली तेथे केज धारुरचे महारुद्रराव देशपांडे यांनी येऊन सर्व सेवेकर्यांस भोजन घातले सर्व सेवेकरी भोजन करुन निद्रिस्त झाले तेथे एका देवीचे उग्र स्थान होते ती देवी उग्ररुप धारण करुन जिकडे तिकडे त्रास देऊ लागली त्यामुळे सर्व सेवेकर्यांस त्रास होऊ लागला इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले देवीला उशास घेतो त्यानंतर त्या देवीचा त्रास कोणासही झाला नाही.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

एकदा श्री स्वामी समर्थांचा मुक्काम वाडी गावाच्या देवळात पडला त्यांच्या सोबत सुमारे दीडशे सेवेकरी होते त्या सर्वांनाच सामावून घेण्याइतके देऊळ मोठे नव्हते श्री स्वामी महाराज त्यांचा पलंग आणि श्रीपाद भट महादेव भट यांसारखी काही मंडळी देवळात तर काही सेवेकरी देवळाच्या बाहेरच्या प्रांगणात विसावली श्री स्वामी समवेत असणारे मोजकेच सेवेकरी वगळता बहुतेक सेवेकरी अडाणी अशिक्षित व अज्ञानीच होते त्यांना वेद पुराणे उपनिषद आदि अवगत नव्हते यज्ञ याग जप तप अनुष्ठाने पारायणे आदि उपासना कर्मे हा त्यांचा प्रांतच नव्हता मात्र ते साध्या भोळ्या सरळ पद्धतीने तन मनाने श्री स्वामींच्या सेवेत रमलेले होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांस सोडून सहसा ते राहत नसत अशा या सेवेकर्यांच्या जथ्याचे श्री स्वामी समवेत राहणे देवीस आवडले नसावे त्यामुळे तिने तिचे शक्ती स्वरुप दाखवण्यास सुरुवात केली तिच्या प्रतापाने श्री स्वामीं समवेत आलेले सेवेकरी अस्वस्थ झाले त्यांना त्रास होऊ लागला सेवेकर्यांना होणारा त्रास श्री स्वामींस कसा सहन व्हावा त्यामुळे श्री स्वामी देवीला उशास घेतो असे सूचक म्हणाले व ए उशी डोक्याखाली घेऊन ते झोपी गेले त्या साध्या भोळ्या सेवेकर्यांना श्री स्वामींच्या या कृतीचा अर्थ काही लक्षात आला नाही श्री स्वामी समर्थ उशीवर डोके ठेवून झोपले आहेत आणि त्यांना होणारा देवीचा त्रास थांबला होता एवढेच त्यांना दिसत होते आणि कळत होते त्यांच्या निस्सीम भक्त सेवेकर्यांस प्राणापली कडेही जपणे हे श्री स्वामींचे ब्रीदच आहे या ब्रीदाला अनुसरुन त्यांनी देवीच्या त्रास देणाऱ्या शक्तीलाच आवर घालून आपल्या सेवेकर्यांची पाठराखण केली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वचनाची प्रचिती देणारी ही लीला आहे भक्त वत्सल भक्ताभिमानी असणारे श्री स्वामी समर्थ या लीलेतून प्रत्ययास येतात.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या