एके वर्षी गुरुप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्व विहिरींचे पाणी आटले त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार झाला फक्त गावातील जंगमाचे विहिरीस नरोटीने पाणी भरण्यास मिळत असे मग सर्वांनीच श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली की महाराज पाणी कोठेही मिळत नाही काय करावे त्यावर समर्थ हसून म्हणाले चला तुम्हाला पाणी दाखवितो असे म्हणून त्यांनी जंगमाचे विहिरीत लघवी केली व ते मठात जाऊन बसले केशव देशपांडे वगैरे मंडळींनी त्या विहिरीत जाऊन पाहिले तर तेथे पुष्कळ पाणी झाले सर्वांस आनंद झाला नंतर ब्राम्हण भोजने झाली त्या दिवशी उत्सव चांगला झाला चमत्कार असा की पुन्हा दुसऱ्या दिवशी नरोटी सुरू झाली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलेत गुरुप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्वच विहिरींचे पाणी आटल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार झाला होता मग सर्वांनाच आठवण झाली ती श्री स्वामी समर्थांची कोठेही पाणी मिळत नाही मग काय करावे असे लोकांनी काळजीच्या स्वरात त्यांना विचारल्यावर दयाघन श्री स्वामींनी त्यांना हसून सांगितले चला तुम्हाला पाणी दाखवतो आणि वरील लीला करुन सर्वांना पाणी उपलब्ध करुन दिले गुरुप्रतिपदेचा उत्सव आनंदात पार पडला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्यासाठी नरोटी सुरू झाली श्री स्वामींनी त्यांच्या योग सामर्थ्याने त्या विहिरीत लघवी करुन उत्सवाच्या त्या दिवसासाठी भरपूर पाणी उपलब्ध करुन दिले उत्सव संपल्यानंतर पुन्हा नरोटीने पाणी भरण्याची वेळ लोकांवर दुसऱ्या दिवसापासून आली ती का आली याचा विचार अथवा चौकशी अगर चिकित्सा कुणासही कराविशी वाटली नाही त्याचा कार्यकारण भाव शोधणे तर फार दूरची गोष्ट याला कारण मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती आम्हाला कुणी तरी आयते आणून द्यावे मदत करावी ही लीला घडली त्या काळात मागसलेपण आणि अज्ञान होते हे खरे पण तेव्हाही प्रयत्न करणारी थोडी फार माणसे असतीलच ना श्री स्वामी समर्थ सर्वांना जागविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते पण देरे हरी खाटल्यावरी अशी प्रवृत्ती असेल तर कसला विचार कसला कार्यकारण भाव आणि कसली चिकित्सा या लीलाकथेत श्री स्वामी लोकांना सांगतात चला तुम्हाला पाणी दाखवतो हे विधान त्यांनी हसून केलेले आहे त्यांना यातून हेच सूचित करावयाचे आहे की ज्ञानाचे जल आणि कष्ट करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे विहीरही उपलब्ध आहे पण आळस विवेकाचा आणि कार्यकारण भाव शोधण्याचा अभाव हातात नरोटी शिवाय दुसरे काय देईल.
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या