एक गोविंद नावाचा शूद्र होता त्यास वेड लागल्यामुळे तो भलभलते चाळे करीत असे एके दिवशी श्री स्वामी समर्थ भांडारखान्यात विहिरीवर पलंगावर झोपले होते गोविंद वेड्याने हे पाहून श्री स्वामींच्या दोन्ही पायास दोरी बांधून ती दोरी त्याने त्याच्या गळ्यास बांधली व तो श्री स्वामींस फराफरा ओढू लागला तेव्हा सुंदराबाईने आरडा ओरडा केला त्यासरशी गिरी गोसावी इत्यादी मंडळी धावून आली त्यांनी श्री स्वामींच्या पायास बांधलेली दोरी सोडली व ते गोविंद वेड्यास मारु लागले तेवढ्यात महाराज म्हणाले अरे त्यास मारु नका जाऊ दे असे म्हणून ते तेथून चालते झाले त्यांच्या आज्ञेनुसार त्या सर्व मंडळींनी त्याला सोडून दिले काही दिवसांनी तो वेडा विहिरीत पाणी पीत असता एका एकी खाली पडून मरण पावला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांची ही एक साधी सरळ लीला आहे एक वेडा येतो काय भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांच्या दोन्ही पायास दोरी बांधून त्यांना फराफरा ओढतो काय तरीही ते त्या वेड्यास दटावीत नाहीत की त्याच्यावर रागावत नाहीत खुशाल त्याला ओढू देतात याचा खोलवर अर्थ शोधू गेल्यास तो गोविंद हा जरी लोकांच्या दृष्टीने वेडा असला तरी श्री स्वामींचा चरणस्पर्श दोरी बांधण्याच्या निमित्ताने का होईना त्यास होतो ते त्यास खुशाल ओढू देतात म्हणजे त्याच्यावर त्यांची एक प्रकारे मर्जीच होती कोठेही प्रगट होण्याचे अथवा कोठूनही अदृश्य होण्याचे सामर्थ्य असलेले श्री स्वामी त्यास फराफरा ओढू देतात याचाच अर्थ त्याच्यावर कोणत्याही प्रकारची का होईना त्यांची कृपा होती शिवाय त्या वेड्यास ते असे करु देतात हा त्यांच्या वृत्तीतला किती मोठेपणा गोविंदाचा अन्तसुद्धा तो वेडा असूनही दयनीय झाला नाही तो एकाएकी विहिरीत पडून मरण पावला ही सर्व श्री स्वामींची त्याच्यावरील कृपा नाही तर वेड्याचा अंत कसा होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे या लीलेतून वेगळाही मथितार्थ निघू शकतो आपण सर्वजण या लीलेतील गोविंदासारखेच प्रापंचिक वेडे आहोत प्रपंचातील समस्यांची त्यातील चढ उतारांनी आपण वेडे होऊन देवाचे पाय धरतोच ना त्याची करुणा भाकतोच ना त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करतोच ना म्हणजे त्याचीही आपण एक प्रकारे फरफटच करतो स्वतःच्या क्षणभंगूर स्वार्थासाठी देवास एक प्रकारे ओढतोच ना परंतु करुणासागर असलेला परमेश्वर आपणास सोडवतोच ना आणि आपण सारेच वेडे आपल्या आयुष्यात अंतिमत क्षणभंगूर गोष्टी मिळविता मिळवता मरतोच संसार प्रपंच कर्तव्य भावनेने जागरुकतेने तटस्थतेने त्यासाठी फारसे वेडेपिसे न होता नेकीने चोख श्री स्वामी समर्थांची उपासना करीत तो करावा असा या लीलेचा मथितार्थ आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या