दर्याकिनारी जाऊन किल्ला बांध या श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार स्वामीसुतांनी कामाठी पुर्यात मठ स्थापन केला स्वामीसुताची भक्ती व वैराग्यामुळे या मठाची भरभराट झाली पारशी प्रभू सोनार पांचकळशी वाणी वगैरे सर्व लोक येऊन समर्थांची भक्ती करु लागले चिमाबाई बेलवाली सेवेकरणीने स्वामीसुतास कांदेवाडीयेथील चाळीत आणले तेथेही शेकडो लोक नित्य दर्शनास येऊ लागले अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शनास भक्तजन गेले असता त्यांना दर्याकिनारी जाण्याकरिता आज्ञा होत असे मुंबईचे मठात ती मंडळी आली म्हणजे स्वामीसुत अक्कलकोटास घडलेल्या गोष्टींविषयी खुणा देत असत त्यामुळे येणाऱ्या लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली व श्री स्वामीसुताची योग्यता फारच वाढली परंतु काही लोकांस हे सर्व थोतांड वाटे ते मठात येऊन छळ करीत स्वामीसुत हसतमुखाने अभंगाद्वारे त्यास स्वामीभक्तीचा उपदेश करीत व त्यांचे मन समर्थांकडे वळवित असत बाबा शेणवाई गोविंदपंत केतकर बाबा सिकाका हरिश्चंद्र वगैरे बहुत लोकांस समर्थांची दीक्षा देऊन त्यांनी भक्तीस लावले.
अर्थ भावार्थ मथितार्थ
हरिभाऊ तावडे तथा स्वामीसुतांनी श्री स्वामी समर्थांची आज्ञा तंतोतंत पाळून मुंबईतील कामाठीपुर्यात मठाची स्थापना केली तेथे येणाऱ्या हजारो लोकांना श्री स्वामी भक्तीस लावले स्वतःच्या नावाचा गाजा वाजा नाही की जाहिरातबाजी नाही स्वतः कडकडीत वैराग्य पाळून व्रतस्थ वृत्तीने स्वामी कार्याची पताका ते उंचावित होते स्वतःकडे कमालीचे लीनत्व व गौणत्व घेऊन दर्याकिनारी श्री स्वामीभक्ती वाढविण्याचे काम ते करीत होते नाहीतर अलीकडे आपण पाहतो श्री स्वामी समर्थांचा फोटो अथवा अन्य माहिती नावापुरती स्वतःचाच उदोउदो व्यक्तिस्तोमच अधिक कामाठी पुर्यानंतर कांदेवाडीतही त्यांनी स्वामीभक्तीचा मळा फुलविला सर्वत्र स्वामीभक्तीची पताका डौलाने फडकू लागली मठात सर्व जाती धर्म पंथ गरीब श्रीमंत यांना प्रवेश खुला होता म्हणून तर दर्शनार्थींमध्ये पारशी प्रभू सोनार पंचकळशी वाणी वगैरे सर्व प्रकारचे लोक असत समसकला पाहू हे श्री स्वामींचे तत्त्व येथेही स्वामीसुत अवलंबित अक्कलकोटास गेलेल्या लोकांना दर्याकिनारी म्हणजे स्वामीसुताकडे जाण्यास आज्ञा होत असे यावरुन स्वामीसुत भक्तिमार्गात कोणत्या पायरीला पोहचले होते याची कल्पना यावी स्वामीसुत मुंबईमधून अक्कलकोटास घडलेल्या गोष्टींच्या खुणा सांगत त्यामुळे दिवसेंदिवस स्वामीसुतावरील लोकांची श्रद्धा वाढू लागली साधू संतांचा छळ करणारे लोक अनेक शतकांपासून आहेत ज्ञानेश्वर संत तुकाराम एकनाथ यांच्या प्रमाणेच स्वामीसुतांच्या कार्यास थोतांड समजून त्यांचा छळ करीत परंतु साधुत्वाच्या पूर्णावस्थेत पोहचलेले स्वामीसुत हसतमुखाने अभंगाद्वारे त्यांना स्वामी भक्तीचा उपदेश करीत स्वामीनिष्ठा म्हणजे काय मूर्तिमंत वैराग्य कशास म्हणावे श्वासापेक्षाही स्वामीभक्ती किती महत्त्वाची इत्यादी अनेक बाबींची उकल स्वामीसुताविषयीच्या माहितीतून होते संसार प्रपंच धन दौलत हे सारे तसे अल्पजीवी परंतु भक्ती परमार्थ सदैव चिरंजिवी स्वामीसुतांनी स्वतःचा भरला संसार लुटवून भक्तीचा चिरंजिवी मार्ग अवलंबला आपणास पूर्णतः स्वामी सुतासारखे जरी होता आले नाही तरी त्यादृष्टीने त्या वाटेने वा दिशेने दोन पावले सहज टाकता येतील तसा निश्चय करु या.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या