सुंदराबाईच्या लोभी वृत्तीतून निर्माण झालेल्या कृतिमुळे महाराजांचे केव्हा केव्हा हालही होत असत एकदा दत्तजयंतीच्या यात्रेची गर्दी फार असल्यामुळे श्री स्वामींना पहाटे चार वाजता स्नान घालून भोजन घातले तेवढ्या पहाटेस श्री स्वामी दर्शनास आलेल्या एका गृहस्थाने श्री स्वामींनी आपला नैवेद्य ग्रहण करावा अशा इच्छेने पंचपक्वान्नाचे ताट भरुन श्री स्वामी सन्निध आणले महाराजांनी आंचवण्याची व हा नैवेद्य येण्याची एकच गाठ पडली ते पाहून तो गृहस्थ फारच हिरमुसला झाला त्याने सुंदराबाईस हात जोडून विनंती केली की कसेही करुन महाराजांचे मुखात या नैवेद्यातील एक घास तरी पडावा त्या बदल्यात त्याने बाईस दोन रुपये देण्याचे कबुल केले आता जेवण झाले दुपारी घालू म्हणून बाईने त्यास सांगितले आणि ते ताट आपल्याजवळ घेतले दत्तजयंतीचा दिवस म्हणून हजारो लोकांची दर्शनासाठी गर्दी म्हणून रात्री दहा वाजेपर्यंत महाराजांनी काहीच खाल्ले नाही सर्व आवराआवर झाल्यावर सुंदराबाईने बाळाप्पास सांगितले ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नको तिने पैशाच्या लोभाने त्या गृहस्थाचे शिळे अन्न श्री स्वामीस भरविले मुकाट्याने खात असता श्री स्वामी मात्र त्रिवार आता काय नबाब झाले श्री स्वामींच्या या शब्दांनी बाळाप्पास मरणप्राय दुःख झाले सदगदित अंतःकरणाने त्याने श्री स्वामींचे दोन्ही पाय पोटाशी घट्ट धरुन बाळाप्पा रडू लागला झालेल्या चुकीबद्दल श्री स्वामी महाराजांची माफी मागितली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
सुंदराबाईच्या वृत्ती प्रवृत्तीवर प्रकाश झोत टाकणारा या अगोदर बराच मजकूर आलेला आहे येथेही तिच्या लोभी वृत्तीचे दर्शन घडते पण त्याही पेक्षा दोन रुपयाच्या लालसेपोटी श्री स्वामींना पहाटे आलेला नैवेद्य रात्री दहा वाजेनंतर ती खाऊ घालते तिचे हे कृत्य कमालीचे घृणास्पद आणि तिरस्कारणीय आहे येथे सर्वांत दुर्दैवी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाळाप्पासारखा कट्टर स्वामी सेवक सुंदराबाईच्या वर्चस्वाखाली येऊन तिचे हे थेर खुलेआम खपवून घेत होता गुरुसेवेत मग्न असलेल्या बाळाप्पाने फक्त महाराजांच्याच सेवेचा विचार करावयास हवा होता तसा तो कुणीही एकनिष्ठ शिष्याने करणे अपेक्षित असते पुराणातील अरुणी एकलव्य यांची उदाहरणे पुरेशी आहेत कदाचित वादविवाद नको म्हणूनही बाळप्पा तिच्याशी हुज्जत घालू इच्छित नसेल पण पहाटे आलेला नैवेद्य रात्री दहापर्यंत निश्चितच शिळा झाला होता रात्री श्री स्वामींसाठी ताजा स्वयंपाक करुन त्यांना भोजन घालणेच योग्य होते परंतु काहीशा भिडस्त असलेल्या सुंदराबाउपुढे हतबल झालेला बाळाप्पा काही करु शकला नाही तिला दोन रुपये मिळणार होते म्हणून कोणताच धरबंध नसलेली सुंदराबाई बाळाप्पास नवीन स्वयंपाक नको म्हणून म्हणाली आणि बाळाप्पानेही तिचे ऐकले तो गुरुसेवेस येथे चुकला या प्रसंगी त्याने सुंदराबाईस विरोधही केला नाही आणि श्री स्वामींसाठी स्वयंपाकही केला नही तिच्याशी काहीही न बोलता नैवेद्य करुन श्री स्वामींस त्याने भरावावयास हवा होता ते बाळाप्पाने केले नाही स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः (गीता १८-४५) आपापल्या कर्तव्यात पूर्णपणे निमग्न असणाऱ्यालाच शेवटी यश मिळते श्रीमद भगवत गीतेतील नेमके हेच आचार विचार सूत्र बाळाप्पा विसरल्यामुळे श्री स्वामींनी बाळाप्पास आता काय नबाब झाले असे म्हणून नापसंती दाखविली व गीतेतील वरील श्लोकाची त्यास आठवण करुन दिली गुरुची अवहेलना करण्याइतके मोठे कधीपासून झालात असेच त्यांना म्हणावयाचे होते गुरुसेवेत असताना कोण काय म्हणेल याची पर्वा करायची नसते खंत बाळगायची नसते अथवा टीका टिप्पणीने विचलितही व्हायचे नसते गुरुसेवेत रत राहून गुरुकृपेची प्राप्ती हेच अंतिम ध्येय असावे लागते येथे बाळाप्पा जरी गुरुसेवेत होता पण सुंदराबाईच्या वर्चस्वाखाली अधिक दबलेला होता म्हणूनच त्याला श्री स्वामींचे आता काय नबाब झाले हे बोल ऐकावे लागले पण येथे हे ही लक्षात घेतले पाहिजे की सुंदराबाई संवेदनाहीन निर्लज्ज प्रसंगी स्वतःस श्री स्वामींपेक्षाही मोठी समजणारी होती तसे बाळाप्पाचे नव्हते तो संवेदनशील आज्ञाधारक सेवेकरी होता म्हणूनच त्याला श्री स्वामींच्या वरील चार शब्दांचे मरणप्राय दुःख झाले सदगदित अंतःकरणाने श्री स्वामींचे दोन्ही पाय पोटाशी धरून तो रडू लागला झालेल्या चुकीबद्दल त्याने महाराजांची माफी मागितली तेथून पुढे श्री स्वामींस शिळे अन्न खाण्याचा प्रसंग त्याने कधीही येऊ दिला नाही तुम्हा आम्हास आगळी वेगळी दृष्टी देणारी सावध करणारी आपल्या सदगुरुप्रती आपले आचरण कसे असावे हे प्रबोधित करणारी ही लीला आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या