चिंतोपंताची भक्ती श्री स्वामी समर्थांवर बसली होती श्री स्वामींची मर्जी लहर पाहून ते श्री स्वामींस अधून मधून आपल्या घरी घेऊन जात असेच एकदा टोळांनी श्री स्वामींस घरी नेले श्री स्वामी समर्थ ओटीवर बसले हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात तर त्यास पंक्तीस घेणे बरोबर नाही त्यांचे पान एका बाजूस मांडावे असे बोलून टोळ धोतर नेसत नेसत ओटीवर आले तितक्यात श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले तुझे मनात कांक्षा आली आम्ही तुझे घरी जेवत नाही असे म्हणून ते उठून चालते झाले टोळास आपल्या भाषणाचा पश्चात्ताप झाला त्याने श्री स्वामींचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

चिंतोपंत सोलापूरात त्यांना झालेल्या श्री स्वामींच्या दिव्य तेजाने आणि अंतःसाक्षित्वाने कमालीचे प्रभावित झाले होते साधारणतः चमत्कार दिसला की नमस्कार करण्याची वृत्ती असते पण असा नमस्कार करण्यात भक्ती नसते तो नमस्कार चमत्कारास असतो चमत्काराची नवलाई संपली की भक्तीही पातळ होऊ लागते भक्ताच्या मूळच्या वासना वृत्ती प्रवृत्ती पुन्हा उचल खातात निःस्सीम भक्तीचा पडदा विरु लागतो मनात शंका कुशंकांचे भोवरे निर्माण होऊ लागतात चिंतोपंत आप्पा टोळाबाबतीत असेच काहीसे झाले होते श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाचा हा प्रभाव ओसरल्यावर टोळ पुन्हा त्यांच्या मूळ वृत्तीवर आले होते त्यांना अजून श्री स्वामी समर्थांच्या स्वरुपाची खरीखुरी ओळख पटली नव्हती श्री स्वामींचे आचार विचार लोकरुढी विरुद्ध होते असे चिंतोपंत टोळास वाटले म्हणून तर सोहनीबरोबर बोलताना श्री स्वामींविषयी म्हणाले हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात तर त्यास पंक्तीस घेणे बरोबर नाही त्यांचे पान बाजूस मांडावे यावरुन टोळच्या अज्ञानाची आणि बुरसटलेल्या विचाराची कल्पना येते दूर दूरच्या सूक्ष्मातली सूक्ष्म संवेदना बोलणे घटना सहज पकडणार्या श्री स्वामींना चिंतोपंताचे व दाजिबा सोहनींचे बोलणे कळल्यावर ते तेथे भोजनासाठी थांबतीलच कशाला जगाचा पोशिंदा असणाऱ्या श्री स्वामींना काय टोळाच्या घरी पंक्तीत भोजन घ्यायचे होते का त्यांना भूक अनावर झाली होती पण अज्ञानी आणि उथळ मानवी मनास कळत नाही हेच मोठे अज्ञान आहे सगुण सदेह स्वरुपात वावरणार्या श्री स्वामींमधील देवत्वाची प्रत्यक्ष प्रचिती येऊनही टोळाची निष्ठा डगमगली स्नान करता करता सोवळे ओवळे स्पर्श अस्पर्शाचे विचार तरंग त्याच्या मनात निर्माण झाले हाच टोळाच्या कच्च्या भक्तीचा पुरावा त्यासाठी आपण हाच अर्थबोध घ्यावयास हवा की आपली भक्ती विवेकाने कशी परिपक्व होत राहील हे सतत बघावे आत्मनिरीक्षण करत राहवे देवास कसलीही अपेक्षा नसते जेथे मनात विकल्प आप परभाव संशय आहे तेथे देव क्षणभरही थांबत नाही देव शुद्ध भक्तीचा भुकेला असतो हे अनेकदा तुम्हा आम्हाला सांगून ऐकवूनही झाले आहे पण आपल्या देव जाणण्याच्या अज्ञानास काय म्हणावे त्यासाठीच तर देवाला कोणता आचार विचार अपेक्षित आहे देवत्व कशात आहे कशात असू शकते याचे आकलन आपल्याला संसार प्रपंच करता करता ही करुन घेता यावयास हवे टोळास महाराजांनी क्षमा केली त्यांच्यातला बदल पश्चात्ताप लक्षात घेऊन पुन्हा त्याच्या विनंतीवरुन ते त्याच्या घरी गेले खरे तर आपल्याकडून टोळासारखी चूक व्हावयास नको जर कळत नकळत झालीच आणि आपण कळवळून बेंबीच्या देठापासून आणि ह्रदयाच्या तळापासून श्री स्वामी समर्थांची क्षमा मागितली तर ते निश्चितच क्षमा करतील.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या