श्री स्वामी समर्थांनी गजानन खत्री यास डोकीस धोतर बांधावयास सांगितले लक्ष्मण पंडितास रुमाल बांधण्याची आज्ञा दिली हरिभाऊस हातास धरून आपल्याजवळ ओढून घेत महाराज म्हणाले तू आपल्या कुळांवर पाणी सोड आणि माझा सूत हो नफ्यापैकी तीनशे रुपये तिघांनी आणले होते त्या पैशांचे सफेत सफेत घेऊन ये म्हणून हरिभाऊस आज्ञा झाली महाराज सफेत म्हणजे काय असा हरिभाऊंनी प्रश्न केला श्री स्वामींनी पाय पुढे केल्यावर हरिभाऊंच्या लक्षात आले की पादुका असाव्यात मुंबईहून आणलेली फळे श्री स्वामींपुढे ठेवली तेव्हा पंडिताच्या मनात आले की एक केळ आपण श्री समर्थांस भरवावे म्हणून केळाची साल काढून ते महाराजांपुढे केले तेव्हा महाराज क्रोधायमान होऊन म्हणाले तेरेकु ढाशी है उस वास्ते कुवेके आड होके तुम खा जाव तेथील लोकांनी त्यास सांगितले की तुमच्यावर प्रसाद झाला नंतर तिघेही श्री स्वामींची आज्ञा घेऊन मुंबईस आले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

लक्ष्मण पंडित हरिभाऊ तावडे व गजानन खत्री या तिघासही धनलालसा होती धनलालसे पोटीच लक्ष्मण पंडित गळ्यापर्यंत कर्जात बुडाले होते हरिभाऊ व गजानन हे दोघेही मुंबई नगरपालिकेत नोकरीस होते सट्टे बाजारात उतरुन ते दोघे चांगलेच गोत्यात आले म्हणूनच धनलालसेलाही अनेक पापाची व दुष्कृत्याची जननी म्हटले जाते आपल्यातील अनेकांना मनुष्यजन्म कशासाठी आपण आलोत कोठून जाणार कोठे आपल्या जन्माचे प्रयोजन काय हे कळत नाही प्रपंचाच्या धावपळीत त्यावर आपण गांभिर्याने विचारही करीत नाही असेच काहीसे या तिघांचेही झाले होते म्हणून तर नसती ऊठाठेव करता करता अविवेकाच्या वर्तनाने ते तिघेही अडचणीत आले होते त्या तिघांचेही प्रारब्ध अनुकूल अथवा नशीब बलवत्तर म्हणूनच की काय गोविंदरावाच्या मावंद्याच्या निमित्ताने का होईना पंडितामार्फत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे येण्याची सुबुद्धी त्या तिघांना झाली ते श्री स्वामीस काही सांगण्या अगोदरच महाराजांनी त्यांची समस्या जाणून ती उघड बोलून दाखविली ते चकित झाले रात्री त्यांचे कपडे चोरीस गेले सुंठी वाचून खोकला गेला असे महाराजांनी त्यांना सांगून निश्चित केले पुढे श्री स्वामींनी गजाननास खत्रीच्या डोक्यास धोतर बांधावायास सांगितले धोतर हे गृहस्थीपणाचे निदर्शक आहे कमरेभोवती नेसावयाचे धोतर डोक्यास बांधण्यास सांगण्यामागे श्री स्वामींचा उद्देश गजानन खत्रीचा व्यापार उद्योग हे अधर्मपणाचे आहे ते त्याचे काम नव्हे तो प्रापंचिक वृत्तीचा असल्याने त्याने अगोदर प्रपंच नेटका करावा असे त्यांना सूचित करावयाचे होते लक्ष्मण पंडिताला डोक्यास रुमाल बांधावयास लावून त्याने पुन्हा व्यापार उद्योग करावा असे त्यांनी सूचित केले पण त्या आनंदाच्या भरात लक्ष्मण पंडितास महाराजास केळे खाऊ घालण्याची इच्छा झाली म्हणून त्याने केळाची साल काढून ते महाराजांपुढे केले अर्थात पंडिताचा त्यामागे साधा सरळ भाग होता पण लगेचच एखाद्या अतिपरिचयासारखी त्याची ही कृती श्री स्वामींस रुचली नाही म्हणूनच ते क्रोधायमान झाले अंतःसाक्षी महाराजांना पंडिताचा त्यांचेकडे येण्याचा कर्ज फिटावे हा हेतू ज्ञात होता म्हणूनच ते गरजले तेरेकु ढाशी है उस वास्ते कुवेके आड होके तुम खा जाव या उदगाराचा मथितार्थ असा की प्रपंच हा विहिरीसारखा खोल आणि मर्यादित असतो त्यातून बाहेर पडणे अनेकदा कठीणच असते त्यात बुडून मरणाचेच अधिक असते पंडिताने असे प्रपंचात बुडू नये मरु नये उसके वास्ते कुवेके आड होके तुम खा जाव म्हणजेच सावधगिरीने वागून प्रपंच आनंदाने करावा असा संकेत त्यांनी दिला महाराजांनी हरिभाऊंना मात्र जवळ ओढून कुळावर पाणी सोडण्यास व त्यांचा पुत्र होण्यास सांगितले थोडक्यात म्हणजे हरिभाऊने गृहप्रपंचात अडकू नये त्यास सफेद सफेद आणावयास सांगितले श्री स्वामींनी पायाकडे बोट दाखवून चांदीच्या पादुका हरिभाऊंनी आणाव्यात असा निर्देश दिला यातूनच हरिभाऊ तावडे यांच्या उर्वरित आयुष्याच्या कार्यातील दिशा श्री स्वामींनी सूचित केली पंडितास पुन्हा व्यापार करावा गजानन खत्रीस प्रपंच नेटका करावा आणि हरिभाऊंनी प्रपंचात न अडकता भक्तिमार्ग स्वीकारावा असे श्री स्वामींनी सूचित केले श्री स्वामी समर्थ कुणासही मुद्दाम प्रपंच सोडावयास सांगत नसत कुणावर परमार्थ भक्ती लादत नसत प्रापंचिकांना ते सुखाने प्रपंच करु देत प्रपंच सोडा माझ्या भजनी लागा असे त्यांनी कुणासही कधीही सांगितले नाही उलट अनेकांना सचोटीने आणि विवेकाने प्रपंच करावयास सांगितला अशा त्रिगुणात्मक प्रबोध करणारा हा श्री स्वामींचा लीला भाग आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या