नागूआण्णास स्पष्ट आज्ञा होताच ते अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास गेले तेव्हा महाराज शालजोडी घेऊन पलंगावर निजले होते नागूआण्णांनी पायावर डोके ठेवून उभे राहताच शालजोडीच्या आतून ऐकू येण्यासारखे शब्द कानी पडले आमचेकडे हे लचांड का पाठविले उगीच स्वस्थ बसावे तर अशा उपाधी येतात नागूआण्णा आपली हकिकत सांगू लागताच श्री स्वामींनी तोंडावरचा पदर काढून येथे का आलास जा पंढरपुरास म्हणून आज्ञा देऊन पूर्ववत निजले चोळाप्पासह सर्व मंडळी त्यांना म्हणाली अहो अंधबुवा तुम्ही पंढरपुरास जावे काही शंका घेऊ नये असे महाराज कोणासही प्रत्यक्ष सांगत नाहीत तुमचे भाग्य थोर म्हणून तुम्हास तत्काळ आज्ञा झाली असे ऐकताच नागूआण्णास थोडा राग आला सहा महिने तुळजापुरास सेवा केली देवीने येथे पाठविले आता हे पंढरपुरास जा म्हणतात कष्टाने सहा महिन्यांची देवीची सेवा केली तेव्हाच देवीने मला सांगायचे होते की तुझे डोळे बरे व्हायचे नाहीत म्हणजे मी इतके कष्ट कशाला केले असते असे काही सांगत आहे तोच अरे जाव भानचोद पंढरपूर का मोठा भोसडीचा आम्हावर हुकूम घेऊन आला चल निकल चूप जाव पंढरपूरको असे सांगून महाराज पुन्हा तोंडावर पांघरूण घेऊन निजले जवळच्या मंडळींनी सांगितले की फार उत्तम झाले तुमचे मनोरथ पंढरपुरास सिद्ध होईल तुम्ही राहू नका जा.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
तुळजापूरच्या जगदंबेच्या सुस्पष्ट आदेशामुळे नागूआण्णा कुलकर्णी अक्कलकोटला आले श्री स्वामींच्या पाया पडून उभे राहतात तोच श्री स्वामी महाराज तोंडावरील पांघरूण बाजूला न काढता म्हणतात आमचेकडे हे लचांड (नागूआण्णा कुलकर्ण्यास) का पाठविले उगीच स्वस्थ बसावे तर अशा उपाधी येतात श्री स्वामींच्या या उदगारात तुळजापूरच्या जगदंबेवरील त्यांचा प्रेमळ रोष दिसून येतो पण जगदंबेनेही हक्काने ते लचांड (नागूआण्णा) श्री स्वामी समर्थांकडे पाठविले यावरुन जगदंबा ही श्री स्वामींचे सामर्थ्य देवत्व जाणून होती शक्तिपीठ म्हणून मानल्या गेलेल्या तुळजापूरच्या देवीचे आणि श्री स्वामी समर्थांचे संबंध भावा बहिणीसारखे असल्याचेच या लीला कथाभागातील घटनेवरुन दिसते नागूआण्णा हा तुमच्या आमच्यासारखा प्रापंचिक सर्वसामान्य जीव आहे त्यास श्री स्वामींच्या या उदगारातील अर्थ भावार्थ मथितार्थ कसा कळणार त्यास जगदंबेचा आणि श्री स्वामींचा जिव्हाळ्याचा संबंध कसा लक्षात येणार ती अपेक्षाही करणे अयोग्य आहे तोंडावरचे पांघरूण बाजूस सारुन ते नागूआण्णास पंढरपूरला जाण्यास सांगतात येथे कशाला आलास पण त्यास देवीनेच स्पष्ट आदेश देऊन येथे पाठवले होते अन्य दुसऱ्या सोम्या गोम्याने नव्हे देवीला हे पक्के ठाऊक होते की नागूआण्णाच्या अंधत्वावर उपचार करणारा या कलियुगातील एकमेव धन्वंतरी (डॉक्टर) श्री स्वामी समर्थ हेच होय पण नागूआण्णा हे तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य प्रापंचिक जीव आतापर्यंत तुळजापूरला सहा महिने उपासनेचा आटापिटा केला तर इथे अक्कलकोटला धाडले इथे मोठ्या आशेने उमेदीने आलो तर इथले स्वामी म्हणतात इथे कशाला आलास पंढरपूरला जा म्हणून सांगतात मला काय झाले माझे दुःखते काय असे काहीही माझे ऐकून न घेता असे फटकारतात वास्तविक नागूआण्णाचे दुःख का श्री स्वामींना कळले नसणार पण त्याचे अज्ञान अविश्वास म्हणून तो म्हणतो देवीने जर अगोदरच सांगितले असते तुझे डोळे बरे व्हायचे नाहीत तर मी कशाला इतके कष्ट घेतले असते नागूआण्णाच्या या अज्ञानाचा श्री स्वामींना संताप येताच ते कडाडतात अरे जाव भानचोद पंढरपूर को मोठा भोसडीचा आम्हावर हुकूम घेऊन आला चल निकल चूप जाव पंढरपूरको श्री स्वामी सहवासाचा अनुभव असलेली मंडळी मात्र नागूआण्णास फार उत्तम झाले पंढरपूरला गेल्यास कार्य सिद्ध होईल असे म्हणाले या कथा भागातून असे प्रबोधित होते की उपासनेत वृथा संशय शंका अविश्वास त्यातून निर्माण होणाऱ्या तक्रारी नकोत सारासार विवेक आणि तारतम्य हे त्रिकालाबाधित आचरण सूत्र उपासनेत तेव्हाही लागू होते सद्यःस्थितीतही ते लागू आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या