मोहोळाहून श्री स्वामी निघाले ते इ.स.१८५४-५५ साली सोलापूरला आले येथे ते रामभाऊ गुर्जर यांचे घरी राहत असत एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबररुपाने श्री दत्ताचे देवळात बसले असता सायंकाळच्या वेळी बहुत भक्त मंडळी दत्ताचे दर्शनास आली त्यात रा.रा.चिंतोपंत आप्पा टोळही आले दत्ताचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता श्री स्वामी महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले हे कोणी सिद्ध पुरुष असो की कोणी असो तुला काय करायचे आहे तू आपल्या वाटेने जा हे शब्द ऐकताच टोळास आश्चर्य वाटले हे कोणी मनकवडे असावेत त्यावर श्री स्वामी महाराजांनी उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो हे ऐकून टोळ फारच चकित झाले चमत्कार तेथे नमस्कार आहेच टोळांनी लगेच श्री स्वामी महाराजांचे पाय धरले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीला भागातील प्रसंगातून प्रथमतः मानवी वृत्ती प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश पडतो श्री स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी सोलापूरात त्यांना कोणतेही नाव गाव नव्हते कोठेही राहवे कोठेही झोपावे काहीही खावे काहीही प्यावे नाहीच मिळाले तर उपाशी राहवे असलीच तर लंगोटी असावी नसली तर त्याचेही सुख दुःख नसावे गोट्या कवड्या किंवा सागर गोट्या घेऊन खेळत बसावे नाहीतर एखाद्या देवळाच्या कोपऱ्यात बसून राहवे असा सारा मुक्त व्यवहार असा हा मुक्त योगी अवधूत एकदा दिगंबर अवस्थेतच श्री दत्तात्रयाचे देवळात बसला होता संसार प्रपंचात पूर्णतः गुरफटलेले दत्त दर्शनार्थी तेथे येत जात होते त्यात चिंतोपंत टोळासारखा एक जिज्ञासू होता प्रदक्षिणा घालता घालता त्या दिव्या अवधूताकडे त्यांचे लक्ष जाताच त्यांच्या मनात विचार आला हे कोणी सिद्ध पुरुष असावेत हा विचार मनात यायचा अवकाश होता ते दिव्य अवधूत लगेच म्हणाले आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो तुला काय करायचे आहे तू आपल्या वाटेने जा आता मात्र टोळ फारच अचंबित झाले हे दिव्य अवधूत हे कोणी मनकवडे असावेत असा विचार टोळांच्या मनात आला त्यावर लगेचच ते दिव्य अवधूत (श्री स्वामी) उत्तरले आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो आता मात्र चिंतोपंत टोळास त्या दिव्य तेजःपुंज अवधूताच्या दिव्यत्वाची अंतःसाक्षित्वाची पुरे पूर खात्री पटली दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या उक्तीनुसार टोळांनी श्री स्वामी महाराजांचे चरण लगेचच धरले त्यांना सन्मानाने घरी आणून त्यांची यथासांग सेवा केली या लीला भागातून श्री स्वामींच्या दिव्यत्वाची अंतःसाक्षित्वाची कल्पना येते पण त्याचबरोबर चिंतोपंत टोळासारखे देवदर्शन घेतांना जिज्ञासूपणा ठेवणारे मात्र थोडेच असतात पण बहुतेक प्रापंचिक पामर असतात काल मान परत्वे हे काही प्रमाणात ठीक आहे परंतु बहुतेक देव देवता दर्शनार्थी प्रपंचातले भोगी असतात देवळात जायचे हात जोडायचे हेतू ठेऊन पूजा अर्चा करायच्या पुन्हा संसार प्रपंचात पूर्णतः सदा सर्वदा गुरफटून जायचे सदैव संसार प्रपंचाचीच घाई या लीला भागात चिंतोपंत टोळास त्यांनी आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो तुला काय करायचे अशा शब्दात सांगितले त्यांचे हे असे सांगणे त्यांच्या अंतःसाक्षित्वाची खूण तर आहेच पण त्याचबरोबर श्री स्वामींचे हे उदगार मीच मूळ चैतन्य आहे माझे असणे आणि नसणे माझे दिसणे न दिसणे तुम्हास काय वाटते न वाटते यावर अवलंबून नाही तुम्हास वाटते म्हणून मी आहे असेही नाही आणि तुम्हास काही वाटत नसले म्हणून मी नाही असेही नाही असा मूळ चैतन्य शक्तीचा मथितार्थ आहे (श्री स्वामी समर्थांच्या भ्रमणाची अस्तित्वाची व्याप्ती या दोन पर्वात सुरुवातीस दिलेली आहे त्यावरून त्यांच्या व्यापकत्वाची अंतःसाक्षित्वाची आणि देवत्वाची कल्पना येते.)

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या