एका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याकारणाने त्या बाईने नाना प्रकारचे उपाय केले पण गुण काही येईना अखेरीस पदराखाली त्या मुलास घेऊन ती अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे आली श्री स्वामींच्या चरणावर मुलास घालावे म्हणून त्याच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो तिला ते मूल गेलेले आढळले तिचा शोक अनावर झाला उर शिर बडवून तिने आकांत मांडला महाराज आपण समर्थ आहात कर्तृम् अकर्तृम अन्यथा कर्तृम् असे आपले वैभव आहे तेथे यत्किंचीत माझे संकट ते किती आपण मनात आणाल तर ते सहज दूर होईल म्हणून महाराजांनी कृपा करुन मला या संकृटापासून सोडवावे असे म्हणून रडून रडून तिने आकांत मांडला आसनावरुन उठून ते त्या बाईजवळ गेले आण तुझा मुलगा इकडे असे म्हणून मुलास घेऊन खाली डोके वर पाय करुन त्यास ते गिरगिर फिरवल्यावर जवळच उभ्या असलेल्या घोड्याच्या तोंडास लावून म्हणाले घोड्या रांडेचे पोर खा असे म्हणून त्यांनी जवळच्या चरात (खड्ड्यात) त्यास फेकले त्यासरशी ते मूल जिवंत होऊन रडू लागले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत वर्णन केलेली बाई भाविक आहे त्यामुळेच तिने विचार केला की अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ आहेत त्यांजकडे मुलास नेऊन पाहावे म्हणून ती अक्कलकोटला मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने आली परंतु मुलास श्री स्वामी चरणावर घालण्यासाठी त्याच्या तोंडावरील पदर काढताच तो मृत आढळला तिचा शोक अनावर होऊन ती आकांत करुन स्वतःचे कर्म प्रारब्ध आणि संचिताला दोष देऊ लागली पण त्या भक्तिमान बाईचा श्री स्वामींच्या कर्तृम् अकर्तृम् अन्यथा कर्तुम् या वैभववावर दृढ विश्वास होता सर्वसाक्षी श्री स्वामीस तिच्या भक्तीची आणि श्रद्धेची पुरेपूर जाणीव होती श्री स्वामी त्या पोरास खाली डोके वर पाय करुन गिरगिर फिरवून घोड्याच्या तोंडास त्या मृत मुलास लावून म्हणतात घोड्या रांडेचे पोर खा या कृतीत व उदगाराला सांकेतिक अर्थ आहे घोडा याचा अर्थ श्वासरहित अवस्था घोडा - अश्व श्वास काळ धन दौलत इत्यादीच्या अभावाची स्थिती म्हणजे अश्वस्थिती या श्वासरहित अवस्थेत प्राण नाहीत म्हणून गती नाही म्हणजे मृत्यूसमान अवस्था या अवस्थेला म्हणजे प्रत्यक्ष यमालाच सदगुरु श्री स्वामी समर्थांनी घोड्या रांडेचे पोर खा असे म्हणून डाफरले गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचेच नियामक नियंत्रक असल्यामुळे प्रत्यक्ष काळाला म्हणजे यमालाही त्यांची आज्ञा डावलणे शक्य नव्हते काळ (यम) हा सर्वभक्षक असल्याने सदगुरु श्री स्वामी उपरोधाने जवळच उभ्या असलेल्या घोड्याला घोड्या खारे रांडेचे पोर अशा स्पष्ट शब्दात आदेशच देतात त्या स्त्रीच्या स्वामीभक्तीने तिचे पोर जिवंत झाले तिचा आनंद गगनात मावेना अक्कलकोटला आल्याचे तिला सार्थक वाटले तिच्या डोळ्यातून श्री स्वामी महाराजांबद्दल कृतज्ञतेचे आनंदाश्रू दाटून आले कुत्सित पाखंडी टीकाकार आता जसे आहेत तसे ते तेव्हाही होते ते म्हणू लागले मूल जिवंतच होते महाराजांनी आपटताच ते रडू लागले इतकेच अशा अप्रस्तुत टीकाकारांची धिंड निघते तर संत ज्ञानोबा तुकाराम एकनाथ श्री स्वामी समर्थ गजाननमहाराज श्री साई यांच्या पालख्या निघतात श्री स्वामी तारक मंत्रात आज्ञेविना काळ ना नेई तयाला परलोकी ना भीती तयाला याची या लीलेत प्रचिती येते आणि १४० वर्षे होऊनही (इ.स.१८७८) ते सद्यःस्थितीतही चिन्मय स्वरुपात दर्शने संभाषण दृष्टांत साक्षात्कार रुपाने प्रचिती देत आहेतच.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या