शके १७९१ (इ.स.१८६९) च्या कार्तिक मासात नगरचे नाना जोशी (रेखी) काही कामाकरिता मुंबईस आले ते स्वतः जिज्ञासू होते श्री स्वामी समर्थांचा शिष्य कामाठीपुर्यात असल्याचे ऐकून नाना जोशी तेथे त्यांच्या दर्शनास गेले तेथे जाताच श्री स्वामीसुत त्यास म्हणाले नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय हे ऐकून नानास आश्चर्य वाटले कारण या अगोदर नानांची व श्री स्वामीसुतांची ओळख नव्हती नानांनी सदगदित अंतःकरणाने स्वामीसुताच्या पायावर डोके ठेविले व त्या दिवसापासून नाना स्वामीसुताबरोबर राहिले व त्यांनी स्वामीसुताचा अनुग्रह घेतला स्वामीसुतांनी शके १७९३ (इ.स.१८७१) चैत्रमासाचा उत्सव अक्कलकोटात प्रथम केला तेव्हा तेथील सेवेकरी त्यांची थट्टा करु लागले शिवूबाई भुजंगा यांनी श्री स्वामीस उत्सवाबद्दल विचारले की स्वामीसुत काय करीत आहेत त्यावर समर्थांनी उत्तर दिले हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे त्यावेळेस स्वामीसुत जे जे अभंग म्हणत त्याप्रमाणे महाराज गोट्या खेळणे वगैरे लीला स्वतः करुन दाखवित.
अर्थ भावार्थ मथितार्थ
अहमदनगरचे नाना जोशी (रेखी) हे त्यावेळचे सुप्रसिद्ध पिंगला ज्योतिषी होते त्यांनी श्री स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती त्या कुंडलीस श्री स्वामींनी सम्मतीही दिली होती त्यासंबंधीची लीला याच ग्रंथात पुढे दिली आहे असे नाना जोशी काही कामानिमित्त मुंबईस आले होते या अगोदर त्यांची व श्री स्वामीसुतांची अजिबात ओळखही नव्हती परंतु नानांनी श्री स्वामीसुतांचे दर्शन घेताच त्यांनी नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय असे विचारुन स्वतःच्या अंतरज्ञानाची चुणूक नानास दाखविली नानासही श्री स्वामीसुतांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली त्यामुळे नानांनी सदगदित अंतःकरणाने श्री स्वामीसुतांच्या पायावर डोके ठेवले याच नानांनी पुढे श्री स्वामीसुतांचा अनुग्रह घेतला त्यांच्या सुचनेवरुनच नानांनी श्री स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती पुढे शके १७९३ (इ.स.१८७१) चैत्रमासात स्वामीसुत अक्कलकोटला आले त्यांनी संपूर्ण अक्कलकोट गावात श्री स्वामी समर्थ प्रगटीकरणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने केला ह्या चैत्रशुद्ध दितीयेच्या दिवशी त्यांनी डोक्यावर भगर खजुराची टोपली घेऊन तो फराळ प्रसाद म्हणून घरोघरी वाटला त्यांच्या या कृतीची काही रिकामटेकडे भोजनभाऊ सेवेकरी टिंगल टवाळी थट्टा करु लागले श्री स्वामीसुतास वेडा समजून हसत होते पण त्या अज्ञजनास काय माहिती की श्री स्वामी सुतास श्री स्वामी समर्थ भक्तीचे वेड लागले आहे म्हणून पण श्री स्वामीस स्वामीसुताची ती कृती पूर्ण ज्ञात होती स्वामीसुत काय करीत आहे असे जेव्हा शिवूबाई भुजंगा यांनी श्री स्वामींस विचारले त्यावर हा आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करीत इहे असे उत्तर त्यांनी त्यांना दिले लग्नाचा उत्सव हा आनंददायी असतो यातून महाराजांनी स्वामीसुत जे काम करीत होते त्यास अनुकूलताच दाखवून एक प्रकारे पसंतीच दिली शिवाय त्या प्रसंगी स्वामीसुत जे जे अभंग म्हणत त्यानुसार गोट्या खेळणे व अन्य लीला ते करीत होते त्यामुळे चैत्रशुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणून आजही साजरा केला जातो तो स्वामीसुताच्या या आगळ्या वेगळ्या कृतीने त्याबद्दलचा त्यांची एक अभंग व छेली खेडग्रामी ही आरतीही सुप्रसिद्ध आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या