मल्लिकार्जुचा शुद्ध झालेला भाव पाहून समर्थ जंगमाच्या मठात गेले त्याने श्री स्वामींस स्नान भोजन घालून त्यांचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण केले श्री स्वामींस प्रार्थना करुन तो म्हणाला महाराज माझ्या कन्येस गर्भ राहून आज तीन वर्षे झालीत परंतु गर्भ वाढतही नाही न पतनही पावत नाही या दुःखाने मी फार त्रस्त झालो आहे तेव्हा काय करावे समर्थ म्हणाले भिऊ नकोस गर्भ वाढेल मग चोळाप्पाने श्री स्वामींचा तीर्थप्रसाद त्या मुलीकरिता दिला श्री स्वामींनी त्यास आपले एक मुखवस्त्र दिले नंतर तो श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन घरी गेला व कन्येस श्री स्वामींचा तीर्थप्रसाद देताच कन्येचा गर्भ वाढू लागला योग्य वेळी तिला पुत्र झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

आता मल्लिकार्जुचा भाव शुद्ध झाला होता श्री स्वामींनी हे ओळखले म्हणून तर ते जंगमाच्या मठात गेले त्याने श्री स्वामीस त्याच्या मुलीच्या गर्भाबद्दल सांगितले श्री स्वामींनी लगेच त्याला भिऊ नको गर्भ वाढेल असे अभिवचन दिले चोळाप्पाकरवी त्याच्या मुलीस श्री स्वामींचे तीर्थप्रसाद देण्यात आला श्री स्वामी त्याच्यावर इतके बेहद्द प्रसन्न झाले होते की त्यांनी त्यास त्यांचे मुखवस्त्रही दिले यथावकाश त्याच्या कन्येचा गर्भ वाढून तिला मुलगा झाला या लीला कथेत मल्लिकार्जुनाच्या निरागस भक्तीने श्री स्वामींस जिंकले तो श्री स्वामींपुढे इतका लीन दीन झाला होता की त्याने श्री स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद ग्रहण केला त्याच्यात अमूलाग्र बदल होऊन त्याला आत्मज्ञान झाले ते त्याने टिकविलेही सद्यःस्थितीतही निर्गुण निराकार असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा वा अन्य उपासनेचा उपयोग होतो हाच इथला अर्थबोध आहे (प्रस्तुत लेखकाचे श्री स्वामी समर्थांची उपासना व फलश्रुती प्राप्ती हे पुस्तक अवश्य वाचावे).

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या