वरीलप्रमाणे त्या संन्याशाचे भाषण झाल्यावर वामनबुवा व गोविंदबुवांनी त्यास विचारले की आपण सन्यास का घेतला पुडी कोठे करता किमया म्हणजे काय संन्याशाने धातुस्पर्श करावा काय हे प्रश्न ऐकून संन्यासी क्रोधित होऊन त्यांचे अंगावर मारण्यास धावला व विचारु लागला की तुझे नाव काय तुझा गुरु कोण वामनबुवांनी उत्तर दिले की माझे नाव वामनबुवा वाम्बोरीकर व आमचे गुरु अक्कलकोटचे महाराज आहेत सर्वांनी श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष केला तेव्हा तो संन्यासी उन्मत्तपणे शिव्या देत त्यांच्या अंगावर चवताळून जात म्हणाला तुम्ही गधे लोक उगीच त्यांची स्तुती करता तुमचा गुरु सोने करतो काय वामनबुवा निःशंक उत्तरले अरे किमयागारा तू व्यर्थ निंदा करु नकोस श्री सदगुरुंच्या कृपेने खरी किमया समजली म्हणजे तुला सर्व सोनेच दिसेल व यतिवेष घेतल्याचे सार्थक होईल परंतु आता एकमेव अक्कलकोटास जाऊन पाहा त्यावर संन्यासी म्हणाला मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची जरुरी नाही येथेच चमत्कार झाला तर मी खरे मानीन उगाच पोकळ ढोंगाच्या गोष्टी मी ऐकत नसतो.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

वामनबुवा आणि गोविंदराव हे काही कच्चा गुरुचे शिष्य नव्हते त्यांनी किमयागार संन्याशास न घाबरता वरील लीलेतील मार्मिक प्रश्न विचारले हे प्रश्न ऐकून त्यास प्रचंड क्रोध आला क्रोधित होऊन तो त्या दोषास मारण्यास धावला वास्तविक त्याचे आचार विचार पूर्णतः संन्यास धर्माच्या विरुद्ध असल्याचेच त्याच्या कृतीमधून दिसते तरीही तो स्वतःस संन्यासी म्हणवून मिरवित होता त्याने रागाने वामनबुवास तुझे नाव काय तुझा गुरु कोण असे प्रश्न विचारले वामनरावांनी त्यास निर्भयपणे उत्तरे दिली अक्कलकोटचे स्वामी महाराज आमचे गुरु आहेत असे अमिमानपूर्वक सांगितले तेथील सर्व लोकांनीच श्री स्वामी समर्थांच्या नावाचा मोठ्याने जयजयकार केला तो जयजयकार ऐकून तो अधिकच क्रोधित झाला उन्मत्तपणे शिव्या देत तो त्यांच्या अंगावर चालून गेला सर्वांनाच गाढव संबोधून त्याने गर्विष्ठपणे विचारले तुमचा गुरु सोने करतो का त्याचे हे सर्व वर्तन संन्यासाच्या यम नियमात बसणारे नव्हते अहंकाराने उन्मत्त झालेला तो संन्याशी सर्वांनाच कःपदार्थ समजत होता काम क्रोध अहंकाराने त्याची विचार शक्ती पूर्णतः नष्ट झाली होती पण वामनबुवांनी न डगमगता न घाबरता त्याचा अरे किमयागारा तू व्यर्थ निंदा करु नकोस श्री सदगुरुंच्या कृपेने खरी किमया समजली म्हणजे तुला सर्व सोनेच दिसेल व यतिवेश घेतल्याचे सार्थक होईल परंतु आता एकमेव अक्कलकोटास जाऊन पाहा अशा शब्दात त्याचा समाचार घेतल्याचे वरील लीलाभागात आले आहे पण तो अहंभावी संन्याशी तेथेच चमत्कार पाहू इच्छित होता त्या सर्व पोकळ ढोंगाच्या गोष्टी आहेत असे संबोधून तो बुवांचेच काय पण कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हता थोडक्यात त्याचे वर्तन संन्याशाच्या नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या वर्तनापेक्षाही हीन दर्जाचे व खालच्या पातळीचे होते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या