राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्तउपासक होते अक्कलकोटास ते सेवा करीत असता एकदा श्री स्वामी समर्थ त्यांच्या बिर्याडी अकस्मात आले गोविंदरावांनी महाराजास बसण्यास पाट मांडला गाणगापूरहून आणलेल्या पादुका श्री स्वामी समर्थांच्या पायास लावल्या समर्थांच्या चरणावर गंधपुष्पे वाहून श्री स्वामींचे पूजन केले गोविंदरावांनी श्री समर्थांची प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान ह्रदयात राहावे विसर पडू नये प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलविली गोविंदरावांनी श्री स्वामीस प्रश्न केला की महाराज आपण गाणगापूरास संगमावर असता काय महाराज म्हणाले होय आम्ही तेथे असतो असे सांगून महाराज उठून गेले त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्रीक्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रय नृसिंहसरस्वतीच्या पादुका आहेत त्या देव्हार्यात श्री स्वामी समर्थ बसले आहेत व चरणी निजपादुका घातल्या आहेत पुजारी मंडळी जवळ बसली आहेत गोविंदरावांनी पुजार्यास स्वप्नात विचारले की देव्हार्यात कोण बसले आहे पुजारी म्हणाले अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

गोविंदराव टोळ हे दत्तोपासक होते त्यांचे वडील राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ हे श्री स्वामी समर्थांचे भक्त होते ते श्री स्वामींनाच देव मानीत पण गोविंदरावांच्या मनात श्री स्वामी हे देव असल्याबाबत किंतू होता त्यांच्या वडीलांना श्री स्वामी हे देवतुल्य वाटतात म्हणून गोविंदराव एक उपचार म्हणून श्री स्वामींचे आदरातिथ्य करीत श्री स्वामी समर्थ हे खरेच दत्तावतार असू शकतील काय ही शंका गोविंदरावांच्या मनात होतीच श्री स्वामींना त्यांच्या या शंकेचे निरसन करावयाचे होते म्हणून ते दत्तपूजा करत असताना श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी अकस्मात आले गोविंद रावांनी रितीप्रमाणे महाराजास बसावयास आसन दिले गाणगापूरहून आणलेल्या पादुका श्री स्वामींच्या चरणास लावून त्यांच्या चरणावर गंध पुष्पे वाहून पाद्यपूजा केली त्याने औपचारिकपणे अक्षयी आपल्या चरणाचे ध्यान ह्रदयात राहवे विसर पडू नये अशी श्री स्वामींची मोघम प्रार्थना केली अंतर्ज्ञानी श्री स्वामींनी त्यास मान डोलावून मूक संमती दिली पण गोविंदरावाच्या मनात श्री स्वामींच्या देवत्वाबद्दल शंकेची मळमळ होतीच म्हणून त्यांनी श्री स्वामींस विचारलेच महाराज आपण गाणगापूरास संगमावर असता काय त्यावर श्री स्वामींनी होय आम्ही तेथे असतो असे सांगून ते तेथून निघून गेले गोविंदरावाच्या मनातील अवताराबद्दलचे द्वैत अद्यापही आहे हे श्री स्वामींच्या लक्षात आले होते ते द्वैत नाहीसे करुन गोविंदरावाचे मन निःशंक करण्यासाठी त्या रात्री त्यास स्वप्नदृष्टांत दिला त्याचे सविस्तर वर्णन वर लीलेत श्रीक्षेत्र गाणगापूर अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत आले आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत याची खात्री पटून गोविंदराव निःशंक झाले.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या