रावसाहेब ढवळ्यांनी किबे यांची दिवाणगिरीची चाकरी सोडून सर्वसंग परित्याग करुन ते अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांजवळ सेवेला राहिले होते त्यांची मातोश्री श्रीकाशीक्षेत्री वासरुन होती पुढे ती आजारी पडल्याची तार रावसाहेबास आली त्यांनी श्री स्वामींजवळ काशीक्षेत्री जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा बैठ किधर जाता है असे महाराज म्हणाले त्यांचा श्री स्वामींवर विश्वास असल्यामुळे ते गेले नाही दुसऱ्या खेपेसही आजारी असल्याचे त्यांना पत्र आले यावेळीही श्री स्वामींनी त्यांना जाण्याची परवानगी न दिल्याने ते गेले नाही तिसऱ्या खेपेस आजारी असल्याचे पत्र आले ते श्री स्वामींस विचारण्यास गेले असता अब जाव असे महाराज बोलले ढवळे काशीस गेल्यावर त्यांची मातोश्री वारली उत्तरकर्म करुन ते अक्कलकोटला आले महाराजांचे दर्शन घेतले पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती असे महाराज म्हणाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

रावसाहेब ढवळे हे इंदूरचे सरदार किबे यांचे दिवाण होते सर्वसंग परित्याग करुन ते श्री स्वामी सेवेसाठी अक्कलकोटला आले त्यांची आई प्रपंचातून निवृत्त होऊन वानप्रस्थ जीवन जगण्यासाठी काशीक्षेत्री येऊन राहिली होती येथे येऊन ती देवदेव करीत होती पण तिचा जीव देवापेक्षाही मुलामध्ये म्हणजेच रावसाहेब ढवळ्यामध्ये अडकलेला होता ती आजारी असल्याची तार तिने रावसाहेबास पाठविली रावसाहेबांनी श्री स्वामींकडे काशीस जाण्याची परवानगी मागताच बैठ किधर जाता असे सांगून श्री स्वामींनी परवानगी नाकारली कारण अंतर्ज्ञानी श्री स्वामी रावसाहेब ढवळ्यांच्या मातोश्रीचा मृत्यू केव्हा होईल हे निश्चितच जाणून होते ती दुसऱ्यांदा आजारी पडल्याची तार आली तेव्हाही त्यांनी परवानगी नाकारली तिसऱ्यांदा आजारी पडली तेव्हा मात्र रावसाहेबांना अब जाव असे म्हणून काशीस जाण्यास अनुज्ञा दिली श्री स्वामींना म्हाताऱ्या आईची मृत्यू वेळ कळली असणार हे निश्चित कारण रावसाहेब ढवळे त्यांच्या मातोश्रीस भेटल्यानंतरच तिने प्राण सोडला समजा पहिल्याच वेळी रावसाहेब काशीस गेले असते तर दोन चार वर्षे मातोश्रीच्या समवेत अडकले असते म्हणून श्री स्वामींनी ढवळ्यांना या अगोदर दोनदा परवानगी दिली नाही दुसऱ्या वेळी मातोश्री अत्यवस्थ असताना श्री स्वामींनी तिला स्वप्नदृष्टांताद्वारे तिच्या मनाचे समाधान केले असावे तिची प्रपंचाची ओढ त्यातील वासना कमी केली असावी तिची मानसिक तयारी करुन घेतली असावी जर तिची अशी मानसिक तयारी झाली नसती तर तिची प्रपंचात जगण्याची आसक्ती तशीच शिल्लक राहिली असती जगण्यातील आसक्ती (वासना) ठेवून ती मेली असती तर पुन्हा जन्म घेऊन प्रपंचात अडकली असती जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडली असती म्हणून पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती असा श्री स्वामींच्या वचनाचा संक्षिप्त स्वरुपात अर्थ - भावार्थ - मथितार्थ आहे रावसाहेब ढवळ्यांचे आईजवळ जाणे माया मोह ममता यास पुन्हा अंकुर फुटणे तिच्या म्हातारपणी त्याच चिखलात रुतून तिने या जगाचा निरोप घेणे पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा हे श्री स्वामींना रावसाहेब ढवळ्यासारख्या सर्वसंग परित्याग करुन केवळ आणि केवळ एकनिष्ठेने सेवा करण्यास आलेल्या सेवेकर्यांच्या बाबतीत होऊ द्यायचे नव्हते म्हणून श्री स्वामी समर्थांनी ही लीला केली अखेरीस अब जाव असे म्हणून रावसाहेब ढवळ्यांच्या म्हाताऱ्या आईस मुक्ती व रावसाहेब ढवळ्यासारख्या लाडक्या सेवेकर्यांची इच्छापूर्ती त्यांनी केली असे हे अतर्क्य अवधूत याचा बोध होतो.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या