एकदा महाराज नळदुर्गात असताना रामेश्वरा कडील एक पुराणिक आला तो चांगला विद्वान आणि गाणाराही होता वीणा वाजवून तो पुराण सांगत असे नळदुर्गात पुराण व्हावे म्हणून त्याने पुष्कळ प्रयत्न केले पण सर्व मंडळी श्री स्वामींच्या सेवेत असल्यामुळे त्याची काही डाळ शिजेना त्याला विद्वत्तेचा ताठा होता आणि त्याचा तामसी स्वभाव असल्यामुळे आणि आपले पुराण तर काही होत नाही म्हणून त्याचा तीळपापड झाला अंगठ्याची आग मस्तकास लागली सर्व लोकांस श्री स्वामींच्या सेवेत पाहून तो समर्थांची अमर्याद निंदा करु लागला त्याचे शरीर अक्षरशः द्वेषज्वराने फणफणून मस्तक भडकून गेले तेव्हा समर्थ हसून लोकांस सांगू लागले की या पुराणिकाच्या द्वेषाने चित्तभ्रम झाला आहे करिता त्याचे पुराण करुन याला यथाशक्ति धन द्या आणि शांत करा लोकांनी श्री स्वामींचे हे बोलणे ऐकून पुराणिकाविषयी नाके मुरडली पण श्री स्वामींचे अंतःसाक्षित्वाचे बोल ऐकून तो लाजला तो श्री स्वामींचे पाय घट्ट धरुन म्हणाला महाराज मी विनाकारण आपला छळ केला माझ्यासारखा दुष्ट अभागी कोण आहे मी धनाच्या व प्रतिष्ठेच्या आशेने आपली निंदा केली महाराज धन तरी कशासाठी तर बायका मुलांचे पोटासाठी जळो ते धन मरोत ती बायका पोरे महाराज आपल्या सारख्या अवतारिक पूर्ण ब्रम्हाची माझ्या कडून हेलना होत होती परंतु पूर्वजन्मीच्या पुण्याईने वेळीच सावध केले महाराज दीनदयाळ हे नाव आपणास शोभते तरी श्री स्वामींनी अपराधाची क्षमा करावी असे म्हणून पुराणिक श्री स्वामीस शरण आला.


अर्थ भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथा भागात तुमच्या आमच्यासारखाच असलेला एक पुराणिकशतो चांगला विद्वान आणि गाणाराही होता पण त्याच्यात श्री स्वामींविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला होता त्यातूनच त्याच्या मनात त्यांच्याविषयी मत्सर निर्माण झाला होता हे सर्व का घडले ते वरील लीला भागात आले आहे श्री स्वामींच्या सेवेत सर्वच लोक गुंतल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळेना तो चांगला विद्वान वीणा वादक लोकांना पुराण सांगणारा असूनही त्याची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी झाली होती राग लोभ मद मोह मत्सर माया हे षडरिपू त्यात ठाण मांडून होते या लीलेतील पुराणिक षडरिपूलिप्त मत्सराचे प्रतीक आहे नळदुर्गात पुराण व्हावे म्हणून त्याने प्रयत्न केले पण त्याची तेथे डाळ शिजली नाही त्यातूनच त्याच्या मनात श्री स्वामींसारख्या दैवी विभूती बद्दल द्वेष मत्सर निर्माण झाला सर्वसामान्यांच्या मनात सतत राग लोभ मोह मत्सर माया द्वेष निर्माण होण्याची कारणे सर्व ज्ञात आहेत त्यापासून दूर कसे राहता येईल हा इथला बोध आहे या षडरिपूंमुळे बुध्दी भ्रमित होते हे सूत्र येथे लक्षात ठेवण्यासारखे आहे श्री स्वामींनी पुराणिकाची भ्रमित अवस्था जाणली होती म्हणूनच ते सर्वांना म्हणाले त्याला यथाशक्ति धन द्या आणि शांत करा लोकांनी श्री स्वामींच्या ह्या उदगारावर नापसंती दर्शविली का तर पुराणिकाचे वर्तन लोकांना रुचले नव्हते पणशपुराणिकाने श्री स्वामींचे ते उदगार ऐकल्यावर त्याला त्यांच्या अंतःसाक्षित्वाची कल्पना आली त्याने क्षमायाचना करत श्री स्वामींपुढे स्वतःचे अंतःकरण मोकळे केले आपण दुष्ट अभागी असल्याचेही मान्य केले आपला हा सारा खटाटोप कुणासाठी हे ही सांगितले श्री स्वामींचीही मनापासून दीनदयाळा म्हणून स्तुती केली हा लीलाभाग आपणास निश्चितच सजग बनविणारा आहे तुमच्या आमच्या कडून त्या पुराणिका सारख्या चुका कळत नकळत होत असतात पण श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक होऊन पश्चात्तापाने त्या चुका त्यांच्यापुढे प्रांजळपणाने मांडू शकतो स्वतः मधला अहंभाव सोडून त्यांच्या कृपेची याचना करु शकतो असा आपल्या आचार विचार व्यवहारात बदल व्हावा हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या