सुंदराबाईने सर्व लोकांस अतिताप दिल्या कारणाने सेवेकर्यांनी मामलेदार कारभारी यांजकडे अर्ज केले परंतु बाईस राणीसाहेबांचे संरक्षण असल्याकारणाने त्यांच्या अर्जाचा उपयोग झाला नाही पुढे त्यांनी कलेक्टरांकडे अर्ज केले त्या प्रकारची चौकशी होऊन बाईला काढून टाकण्याबद्दल हुकूम आला तिच्या मालाची जप्ती झाली तिने आपल्या घराकडे जे काही लांबविले होते तितके मात्र राहिले अक्कलकोटातील सर्व जिन्नस पंचाचे ताब्यात गेले बाईचा इतका कडक अंमल असून तोअगदी पराधिनत्वात गेला नानासाहेब बर्वे कारभारी याजकडे कलेक्टरचा हुकूम आला असता त्यास तो हुकूम अंमलात आणण्याची भीती वाटली कारण बाई महाराजांच्या प्रीतीतली आहे तिला काढली तर महाराजांचा कोप होईल न काढावी तर हुकूम अमान्य होतो बर्वे संकटात पडून चार आठ दिवस विचारातच होते अशा स्थितीत एकदिवस श्री स्वामींच्या दर्शनास ते गेले असता महाराज म्हणाले काय रे असाच हुकूम बजावतोस का हे ऐकून बर्वे यास समाधान वाटले व धैर्य आले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

सुंदराबाईच्या गच्छंतीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला होता तिने लोकांना त्रस्त करुन सोडल्यामुळे मामलेदार कारभारी याजकडे लोकांनी तक्रार अर्ज केले होते सुंदराबाईस अक्कलकोटच्या राणीसाहेबांचेच संरक्षण असल्यामुळे त्यांच्या अर्जाचा काही उपयोग होत नव्हता भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही है या उक्तीनुसार कलेक्टरकडे केलेल्या अर्जाचा उपयोग होऊन बाईला काढून टाकण्याबद्दल हुकूमच आला आजपावेतो तिने मोह माया ममता लालसा याच्या अधिन जाऊन जेवढ्या म्हणून वेग वेगळ्या वस्तुंचा अतिरिक्त संग्रह साठा केला होता तो सर्व साठा पंचांनी ताब्यात घेतला बाईच्या सद्दीचा अखेरचा दुर्दैवी प्रवास सुरू झाला अर्थात अशा कृतीचा एक ना एक दिवस असाच शेवट होत असतो परंतु अतिशय लोभात अडकलेल्या जीवाला हा साठा अथवा संचय करीत असताना या कृतीचा अंत काय होईल याचेच भान राहत नाही लोभी वृत्तीने लावलेल्या जोपासलेल्या आणि वाढविलेल्या वृक्षास येणारी फळेही विषारीच असतात याचेच भान अनेकांना सत्ता संपत्ती अधिकार असताना राहत नाही अविवेकाने त्यांची देहबुद्धी कार्यरत असते सुंदराबाई हे तेव्हाचे प्रतीक आहे सद्यःस्थितीतही अशा प्रतीकांची कमतरता नाही शिक्षण ज्ञान याचा प्रचार प्रसार होऊनही कोणी त्यातून बोध घेत नाही हेच तर खरे मोठे दुर्दैव आहे यात कारभारी नानासाहेब बर्वेचा उल्लेख आलेला आहे बाई महाराजांच्या मर्जीतील असल्यामुळे हुकूमाची अंमलबजावणी करण्यास ते कचरत होते ते चार आठ दिवस हुकूम बजवावा की नाही अशा दोलायमान मनःस्थितीत होते त्यांना बाईबद्दलच सर्व वास्तव ठाऊक होते तिच्या विरुद्ध हुकूमही आला होता पण त्यांची स्थिती अशी दोलायमान का व्हावी सत्य असेल तर परमेश्वरासही घाबरू नये असे म्हणतात सत्यापुढे कुणाचाही मुलाहिजा ठेवता कामा नये याबाबत पुराणात इतिहासात अनेक उदाहरणे आहेत छत्रपती शिवाजीराजे किंवा न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे याबाबत विस्ताराने न लिहिताही सहज बोध होतो संभ्रमित अवस्थेत कारभारी बर्वे श्री स्वामींचे दर्शन घेऊन उभे राहताच श्री स्वामी त्यांना त्यांच्या कर्तव्या बाबत अतिशय परखड शब्दात फटकारतात काय रे असाच हुकूम बजावतोस काय श्री स्वामींच्या या उदगाराने कारभारी नानासाहेब बर्वे यास परम समाधान तर वाटलेच परंतु सुंदराबाई विरुद्ध हुकूम बजावण्याचे प्रचंड बळ त्यास मिळाले श्री स्वामींची ही कृती हेच प्रबोधित करते की सत्य असेल तर कशालाच डगृमगू नका सत्य सचोटी न्यायनिष्ठुरता सद्यःस्थितीत वेगाने हरवत असल्यामुळे आपल्यालाच आपल्या विकासाची प्रगतीची घसरण उघड्या डोळ्यांनी पाहवी लागत आहे ही घसरण टाळावयास हवी आपणास जे जे शक्य आहे ते मनापासून करावयास हवे यातच सुख समाधान शांती सामावलेली आहे हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या