सुंदराबाईस सारेच कंटाळले होते श्री स्वामी महाराजांनी तिच्या गछंतीचे संकेत द्यावयास सुरूवात केली होती एके दिवशी ती खारका वाटीत असता महाराज म्हणाले अग खारका वाटू नको बरे पुढे लिंब्याकडून मागून घ्याव्या लागतील त्याचप्रमाणे बावडेकर पुराणिकांनी एक जरीकाठी छाटी आणली होती ती रंगवून बाईजवळ महाराजांचे अंगावर घालण्यास दिली ती बाईने महाराजांच्या अंगावर घातली महाराजांनी ती छाटी परत तिचे अंगावर टाकली तिने परत महाराजांच्या अंगावर घातली तेव्हा महाराज म्हणाले अगं पुढं छाटी मिळावयाची नाही आताच पांघरूण घे हे ऐकून सर्वांस वाटले की बाईची कारकीर्द आता फार दिवस राहवयाची नाही राजवाड्यात श्री समर्थ बसले असता राणीस म्हणाले आजपावेतो सुंदराबाईस आम्ही सांभाळले आता तुम्ही सांभाळा बरे त्यावर राणीसाहेब म्हणाल्या बरे आम्ही सांभाळतो.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

सुंदराबाईला हाकलण्याचे संकेत श्री स्वामी समर्थ वारंवार देत होते ती डोक्यावर मिरे वाटील हे ती सेवेत आल्या आल्याच त्यांनी सांगितले होते आता मात्र तिची हकालपट्टी होणार हे स्पष्ट झाले होते बाईची कारकीर्द आता काही फार दिवस राहणार नाही हे सर्वांनाच कळून चुकले होते या अगोदर श्री स्वामी तिचे वर्तन खपवून घेत होते ते तिच्या पूर्वजन्माच्या कर्मफलामुळेच पण तो कर्मफलाचा साठा आता संपुष्टात आला होता एखाद्याची सद्दी असली म्हणजे त्यास किंवा तिला सुगीचे दिवस असतात पण सद्दी संपली की हालच हाल तसेच आता सुंदराबाईचे झाले होते उदा.१) ती महाराजांच्या अंगावर छाटी घालीत असताना ती काढून तिला परत करताना ते म्हणाले अगं आताच पांघरूण घे पुढे छाटी मिळावयाची नाही २) श्री स्वामींपुढे आलेली फळे बर्फी ती गोळा करु लागली की ते म्हणत अगं आताच खाऊन घे पुढे खावयास मिळणार नाही ३) अखेरीस ते अक्कलकोटच्या राणीसाहेबास म्हणाले हिला आजवर आम्ही सांभाळले आता तुम्हीच सांभाळा हे सर्व उदगार काय सुचवितात तिच्या पूर्व प्रारब्धातील पुण्याई आता संपत आली होती सुंदराबाईला सुधारण्याची संधी अनेकदा मिळूनही ती सुधारली नाही सुंभ जळाला पण पीळ काही सुटला नाही अशी तिची स्थिती झाली होती श्री स्वामींचे संकेत तिला अखेरपर्यंत समजलेच नाही अखेरीस श्री स्वामींना राणीसाहेबास सुंदराबाईबद्दल निर्वाणीचे सांगावे लागले या देहबुद्धीला (सुंदराबाईला) आम्ही आजवर सांभाळले यापुढे इतर जिज्ञासू जिवांच्या बाबतीत तिचे थेर चालू देणे आम्हास जमणारे नाही तिला तुम्हीच सांभाळावे बरे राणीसाहेबासही श्री स्वामींच्या या सूचक बोलण्याचा अर्थ कळला नाही बरे आम्ही सांभाळतो एवढेच त्या सहजपणे या लीलाकृतीवरुन श्री स्वामी देत असलेल्या संकेताचा करीत असलेल्या कृतीचा प्रसंगाचा मथितार्थ नीट समजावून घेतला पाहिजे सद्यःस्थितीत निर्गुण निराकार स्वरुपात असलेल्या श्री स्वामी महाराजांची मनोभावे सेवा करताना असे अनुकूल प्रतिकूल शुभ अशुभ संकेत प्रसंग परत्वे मिळत असतात ते आपण जाणून घेतले पाहिजे त्यामुळे निश्चितच योग्य दिशा सापडेल.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या