बिर्हाडी आलेल्या हरिभाऊस त्याच रात्री श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह झाला त्या रात्री गावाबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ श्री स्वामी समर्थ वस्तीस होते हरिभाऊ आणि अन्य मंडळीही महाराजां समवेत होती रात्र गेल्यावर सर्व मंडळी निजलेली असता महाराज एकटेच उठून बसले व हातात काठी घेऊन त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहून म्हणाले तू साले यहाँ से निकल जा नीचे हमारे बाल गोपाल सोये है असे तीन वेळा म्हणत त्यांनी काठी उगारली त्याबरोबर त्या पिंपळाचे झाड सळसळ हलले व त्यातून मशालीचे उजेडाप्रमाणे प्रज्वलित गोळा निघून गेल्या सारखे दिसले हरिभाऊंनी व पंडितांनी निजलेल्या ठिकाणाहून गुपचूप हे पाहिले काही वेळाने हरिभाऊ हळूच उठून श्री स्वामी सन्निध जाऊन त्यांचे पाय चेपू लागले त्यावेळी श्री स्वामींच्या ळ हरिभाऊंच्या गुप्त गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या शेवटी महाराजांनी त्यांची छाटी व कफनी हरिभाऊंच्या अंगावर फेकून त्यास सांगितले की आपला सर्व संसार लुटून टाक दुसरे दिवशी प्रातःकाळी आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करुन हरिभाऊ त्यांच्या मित्रा समवेत मुंबईस आले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

आता हरिभाऊ तावड्यांचे श्री स्वामीसुत झाले होते त्यांना श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह झाला होता त्याच रात्री महाराजांनी आणखी एक विलक्षण लीला केली गावाबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामी महाराज वास्तव्यास होते हरिभाऊ पंडित गजानन यांच्यासह काही सेवेकरीही महाराजांसमवेत होते मध्यरात्रीपर्यंत महाराज सोडून काहीजण झोपी गेले होते आनंद विभोर अवस्थेत असलेले ते तिघे डोळे मिटून झोपेचे सोंग घेऊन पडले होते मध्यरात्रीच्या सुमारास महाराज एकाएकी उठून बसले हातात काठी घेऊन ती उगारत पिंपळाच्या झाडाकडे पाहात ते कडाडले तू साले यहाँ से निकल जा नीचे हमारे बाल गोपाल सोये है हे उदगार श्री स्वामी महाराजांची सर्वांच्या प्रती असलेली पितृ वत्सलता दर्शवितात त्या तिघांनीही त्या पिंपळाच्या झाडाची सळसळ ऐकली त्यातून मशालीच्या उजेडा सारखा एक प्रज्वलित आगीचा लोळ निघून गेल्याचे पाहिले तसे ते तिघेही भयचकित झाले होते थोड्याच वेळात हरिभाऊ भानावर आले सदगुरुप्रती त्यांची ओढ तीव्र होती त्या दृश्यमय लीलेने ती अधिकच तीव्र झाली त्या तीव्र ओढीने म्हणा अथवा श्री स्वामींच्या पूर्व नियोजनाने समजा हरिभाऊ त्या मध्यरात्री श्री स्वामींपाशी जाऊन त्यांचे पाय गुरुभक्तीने सम्मोहित होऊन चेपू लागले तेव्हा त्या दोघांच्यात काही गुह्य गोष्टी बराच वेळ चालल्या काय असतील आपल्या सर्वांच्या आकलना पलीकडच्या त्या आहेत परंतु श्री स्वामीसुतांनी दूरवर समुद्र किनारी जाऊन काय करावे याबाबत श्री स्वामींनी निश्चितच मार्गदर्शन केले असावे असा तर्क बांधण्यास वाव आहे कारण श्री स्वामी पुढे अनेकांना मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबईस पाठवित दूरवर अक्कलकोटी येण्या ऐवजी श्री स्वामीसुताकडे जाण्याचे सुचवित त्याचा सबळ पुरावा म्हणजे श्री स्वामींनी उशाखाली असलेली छाटी आणि कफनी हरिभाऊच्या अंगावर घालत ते म्हणाले आपला सर्व संसार लुटून टाक म्हणजे आतापर्यंत स्वतःचा संसार प्रपंच केला तो पुरे येथून पुढे रंजल्या गांजलेल्यांचा दुःखी पिडीतांचा संसार कर आणि आमची ध्वजा उभी कर हेच हरिभाऊ तावडे पुढे स्वामीसुत म्हणून नावारुपास आले.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या